Dhule Agriculture News : परतीच्या पावसाचा (Rain) राज्यातील शेतकऱ्यांचा (Farmers) पिकांना मोठा फटका बसला आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांच्या हाती आलेली पीक वाया गेली आहे. तर काही ठिकाणी जी उरली सुरली पीक आहेत, त्यामध्ये देखील मोठी घट आली आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. धुळे (Dhule) जिल्ह्यातही परतीच्या पावसाचा मोठा फटका पिकांना बसला आहे. अतिवृष्टीमुळं मिरीचीच्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे, त्यामुळं उत्पादन घटलं आहे. उत्पादनात घट झाल्यानं मिरचीच्या (Chili) दरात मोठी वाढ झाली आहे. आवक घटल्यानं मिरचीला दराचा तडका मिळाला आहे.


रसगुल्ला मिरचीला किलोला 700 रुपयांचा दर


धुळ्यातील दोंडाईचा बाजार समितीत आंध्र प्रदेशातील गुंटूर येथून मिरचीची आवक होत आहे. धुळ्यात अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीचा फटका लाल मिरचीला बसला आहे. उत्पादनात घट झाल्यामुळं मिरचीची आवक घटली आहे. त्यामुळं मिरचीला महागाईचा तडका बसला आहे. रसगुल्ला मिरचीला किलोला 700 रुपयांचा दर मिळाला आहे. तर फापडा मिरचीला किलोला 340 रुपये भाव मिळत आहे. एकीकडे लाल मिरचीचे उत्पादन कमी झाले असताना दुसरीकडं मागणी वाढल्यानं लाल मिरची खरेदी करण्यासाठी ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. 


दोंडाईचा हे लाल मिरचीचे आगार


धुळे जिल्ह्यात दोंडाईचा हे लाल मिरचीचे आगार समजले जाते. राज्याच्या विविध भागात मिरचीचे उत्पादन होते. त्या भागात अतिवृष्टीमुळं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून दोंडाईच्या परिसरात देखील मिरचीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र, या मिरचीवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं मिरचीचे उत्पादन घटल्याचे सांगण्यात येत आहे.


परतीच्या पावसाचा पिकांना मोठा फटका


राज्याच्या विविध भागात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला होता. जाता जाता जोरदार पाऊस कोसळल्यानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. यामुळं राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. अतिवृष्टीमुळं सोयाबीनसह कापूस, फळबागा, मिरची, पालेभाज्या या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली लाल मिरचीही खराब झाली आहे. मिरचीला पावसाचं पाणी लागल्यानंतर मिरची काळी पडली आहे. त्यामुळं व्यापारी देखील देखील चिंतेत आहेत. या पावसाचा मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्राला मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेली पिकं वाया गेली होती. 


महत्त्वाच्या बातम्या:


Pakistan's Red Chilli : अशियातील मिरची राजधानीला पुराचा मोठा फटका, पाकिस्तानात दर वाढण्याची शक्यता