Jitendra Awhad on CM Eknath Shinde : सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जितेंद्र आव्हाडांकडून कोतुक
Jitendra Awhad on CM Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे. आज एका सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला, असं सांगत राष्ट्रवादीचे नेते जिंतेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं.
मुंबई : "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा प्रवास मी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिला आहे. आम्ही दोघे एकाच वेळी राजकारणात आलो. आमच्या दोघांमध्ये चांगली मैत्री आहे. माझ्या मतदारसंघासाठी निधी देताना त्यांनी कधीच मनाचा कोतेपणा दाखवला नाही. आम्ही कायम एकमेकांना सहकार्य केले. एकनाथ शिंदे यांच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे. आज एका सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला, असं सांगत राष्ट्रवादीचे नेते जिंतेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं.
विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदन प्रस्तावावर जितेंद्र आव्हाड बोलत होते. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांचे तौंडभरून कौतुक केले.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, "एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळाल्याने सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला. एकनाथ शिंदे यांच्या विरोधात तीस वर्षे आमदार म्हणून उभा राहिलो. परंतु, कधीही मनात वैरभाव नव्हता. त्यामुळे येथून पुढील काळात देखील कोणत्याही प्रकारचा सूड, आकस, ठेवणार नाही."
एकनाथ शिंदे कधीच बंड करतील असं वाटलं नव्हतं
"एकनाथ शिंदे हे जास्त बोलत नाहीत. त्यांना जे काम करायचं आहे ते खूप शांतपणे करतात. परंतु, गेल्या 15 दिवसांपासून एकनाथ शिंदे शांत होते. ते माध्यमांसोबत देखील काही बोलत नव्हते. त्यांच्या कामाची पद्धत वेगळीच आहे. परंतु, एकनाथ शिंदे बंड करतील असे कधीच वाटलं नव्हतं, असे जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांना टोला
जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील टोला लगावला. "देवेंद्र फडणवीस यांचे भाषण मी गेल्या 20 वर्षांपासून पाहत आहे. देवेंद्र फडणवीस यांची भाषण करण्याची पद्धत इतरांपेक्षा वेगळी आहे. परंतु, आज भाषण करताना त्यांची ही पद्धत दिसली नाही. आज त्यांच्या भाषणात आक्रमकपणा दिसला नाही, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी लगावला.
महत्वाच्या बातम्या