एक्स्प्लोर

'मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतं' वक्तव्यावर जयंत पाटलांचं स्पष्टीकरण, म्हणाले...

राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत केलेलं एक वक्तव्य चर्चेत आहे. या वक्तव्याबाबत जयंत पाटील यांनी ट्वीट करत स्पष्टीकरण दिलं आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या एका वक्तव्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होत आहे. एका स्थानिक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्री व्हायची इच्छा व्यक्त केली. पण राजकीय संख्याबळ लक्षात घेता ते सध्या शक्य नसल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र जयंत पाटील यांनी या वक्तव्याबाबत ट्वीट करत स्पष्टीकरण दिलं आहे. माझ्या विधानाची मोडतोड करून दिशाभूल करणारे वार्तांकन प्रसारित केलं असल्याचं त्यांनी म्हटलंय.

ट्वीट करत जयंत पाटील यांनी म्हटलं आहे की, इस्लामपूर येथील एका स्थानिक माध्यमाला मी दिलेल्या मुलाखतीचे जसेच्या तसे वार्तांकन एका पेपरमध्ये आलेले असून, माझ्या विधानाची मोडतोड करून दिशाभूल करणारे वार्तांकन प्रसारमाध्यमांनी करू नये ही विनंती, असं त्यांनी म्हटलंय.

मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतं पण...,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली इच्छा

कोणालाही राज्याचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल त्या व्हिडीओत बोलताना जयंत पाटील म्हणाले होते की, "दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कोणालाही राज्याचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल. त्यामुळे मलाही राज्याचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल. पण सध्याचं संख्याबळ लक्षात घेता ते आता शक्य नाही. आतापर्यंत राष्ट्रवादीच्या वाट्याला मुख्यमंत्रीपद आले नाही." जयंत पाटील पुढे म्हणाले होते की, "राष्ट्रवादी पक्षाचा मुख्यमंत्री करायचा असेल तर अजून पक्ष वाढवण्याची गरज आहे. सध्या आमच्या पक्षाच्या आमदारांची संख्या केवळ 54 आहे. त्यामुळे पक्षाच्या आमदारांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. भविष्यात असे झाले तर पवार साहेब जो काही निर्णय घेतील त्यावर मुख्यमंत्रीपद कोणाला द्यायचं हे अंतिम असेल आणि तो आम्हाला मान्य असेल. मलाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटते, ते स्वाभाविक आहे." जयंत पाटील म्हणाले होते की, "मला जसे मुख्यमंत्री व्हावेसे वाटते तसे माझ्या मतदारांनाही मी मुख्यमंत्री व्हावे असे वाटते. त्यात काही चुकीचं आहे असंही नाही. कारण मी शेवटी माझ्या मतदारांना जबाबदार आहे."

सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकच आहेत तसेच मला मंत्रीपदापेक्षा राष्ट्रावादी काँगेसचे प्रदेशाध्यक्ष पद जास्त भावते अशी भावना जयंत पाटलांनी व्यक्त केली. सुप्रिया सुळे किंवा अजित पवार या दोघांपैकी एकाला पाठींबा देण्याची वेळ आल्यास कोणाला पाठींबा देणार या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले की, "मुळात सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांना वेगवेगळं समजणं चुकीचं ठरेल. ते एकाच घरातील आहेत."

व्हिडीओ: Jayant Patil | मलाही मुख्यमंत्री व्हावं असं वाटणारच; मंत्री जयंत पाटील यांचं मोठं वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्या

शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू; 10 दिवसानंतर पतीनेही रुग्णालयात सोडला जीव, गुढ वाढले?
शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू; 10 दिवसानंतर पतीनेही रुग्णालयात सोडला जीव, गुढ वाढले?
Washim News : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर नामुष्कीची वेळ, जमिनीचा मोबदला कमी दिल्याने चक्क टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश; वाशिम न्यायालयाकडून ऐतिहासिक आदेश
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर नामुष्कीची वेळ, जमिनीचा मोबदला कमी दिल्याने चक्क टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश; वाशिम न्यायालयाकडून ऐतिहासिक आदेश
Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
Chandrashekhar Bawankule: राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?
राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू; 10 दिवसानंतर पतीनेही रुग्णालयात सोडला जीव, गुढ वाढले?
शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू; 10 दिवसानंतर पतीनेही रुग्णालयात सोडला जीव, गुढ वाढले?
शस्त्रसंधी अन् खामेनींची अंत्ययात्रा सुरु असतानाच अमेरिकेचा इराणच्या 80 हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ला; बहरीन आणि कुवेतमध्ये हल्ला करत इराणचा पलटवार
शस्त्रसंधी अन् खामेनींची अंत्ययात्रा सुरु असतानाच अमेरिकेचा इराणच्या 80 हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ला; बहरीन आणि कुवेतमध्ये हल्ला करत इराणचा पलटवार
Chandrashekhar Bawankule: राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?
राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?
Satej Patil: दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
Tukaram Mundhe News: माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
Siya Goyal Ketan Agrawal case: केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलने गुगलवर 'या' चार प्रश्नांची उत्तरं सर्च केली, पोलीस काय-काय करणार त्याची तयारी आधीच केली
केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलने गुगलवर 'या' चार प्रश्नांची उत्तरं सर्च केली, पोलीस काय-काय करणार त्याची तयारी आधीच केली
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
Embed widget