एक्स्प्लोर

Ajit Pawar :  आमच्या काळात वेदांता-फॉक्सकॉननं राज्यात येण्याचं नाकारलं हे साफ खोटं, कोणताही प्रकल्प आणताना पर्यावरणाचा समतोल राहावा : अजित पवार

आमच्या काळात वेदांता-फॉक्सकॉननं (vedanta) राज्यात येण्याचं नाकारलं हे साफ खोटं असल्याचे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं आहे.

Ajit Pawar : आमच्या काळात वेदांता-फॉक्सकॉननं (Vedanta Foxconn) राज्यात येण्याचं नाकारलं हे साफ खोटं आहे. त्यांनी अनेक प्रकल्प आणावेत. फक्त पर्यावरणाचा समतोल राखला जावा याची काळजी घ्यावी, असे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) दोन दिवसांसाठी दिल्लीला जाणार आहेत, असं ऐकलं आहे. दिल्लीत त्यांनी बेरोजगार तरुणांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी माझी मागण्या असल्याचे अजित पवार म्हणाले. 

दोघांचेही मेळावे व्हावेत

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क हे मैदान मिळावं यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं थेट कोर्टात जावं असे मत अजित पवार यांनी व्यक्त केलं. काही वेळेस उच्च न्यायालयात जाऊन देखील परवानग्या घेतल्या आहेत. मागे कोरोनाच्या काळात ते घडलं आहे. बीकेसीत शिंदे गटाचा मेळावा होणार आहे. त्यांना ती जागा मिळाली असली तरी इकडची जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळावी. दोघांनी मेळावे घ्यावे, दोघांचे विचार राज्यानं ऐकावे असेही अजित पवार यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे पुत्र आहेत. त्यांनी त्यांचे नाव घेतलं तर त्यात गैर काय आहे. आम्ही सुद्धा यशवंतराव चव्हाण यांचे विचार घेऊन पुढे जात आहोत.  काँग्रेस गांधी-नेहरु घराण्याचे विचार पुढे घेऊन जात आहे. आपण आपल्या पूर्वजांचे नाव घेतले तर त्यात काय चुकलं काय. त्यांची पुण्याई त्यांनी सांगितलं तर त्यात गैर काही नाही असेही अजित पवार यावेळी म्हणाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना मुंबई उच्च न्यायालयानं दणका दिला आहे. राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्यातील (Juhu Adhish Bunglow) अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. त्याशिवाय, राणे यांना हायकोर्टाने 10 लाखांचा दंड ठोठावला आहे. यावर देखील अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. या संदर्भात न्याय व्यवस्थेला अंतिम मानतो. जर एखाद्याला निर्णय योग्य वाटला नाही तर ते पुढे अपील करु शकतात. जे त्या जागेचे मालक आहेत तेच यासंदर्भात बोलतील. त्यांना मुंबई पालिकेने पत्र दिलं आहे. पण आमचं म्हणणं आहे की सगळ्यांनी कायद्याने, संविधानाचा मान राखला पाहिजे असे अजित पवार म्हणाले. 

एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर व्हावेत, यासाठी सरकारनं लक्ष द्यावं

मी सरकारमध्ये असताना एसटीसाठी 1 हजार 400 कोटी रुपयांची तरतूद केली होती. मात्र, सध्या एस टी ला स्वतःच्या उत्पन्नातून पगार मिळेल अशी परिस्थिती राहिली नसल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर व्हावेत, यासाठी सरकारनं बारकाईने लक्ष द्यावं असेही अजित पवार म्हणाले. 

ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी सरकारला जास्त जागा

ग्रामपंचायत निवडणुका पक्षीय चिन्हावर होत नाहीत. जी आकडेवारी दाखवली त्यामधे महाविकास आघाडी सरकारला जास्त जागा आहेत हे देखील सत्य आहे. आगामी निवडणुकांची ही रंगीत तालीम आहे. सहकारातील निवडणुका लवकरच लागतील. त्यांना सप्टेंबरपर्यंत स्थगिती होती. मात्र, आता या निवडणुका होतील असे अजित पवारांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या:

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! जामखेडमधील आनंद मेळाव्यात थरार; हवेत गिरक्या घेणाऱ्या पाळण्यातून खाली कोसळली तरुणी
धक्कादायक! जामखेडमधील आनंद मेळाव्यात थरार; हवेत गिरक्या घेणाऱ्या पाळण्यातून खाली कोसळली तरुणी
Tukaram Mundhe FDA loose oil ban: तुकाराम मुंढेंकडून खाद्यतेलाच्या सुट्या विक्रीवर बंदी, गरीब कुटुंबांचं अर्थकारण कोलमडलं, नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंकडून खाद्यतेलाच्या सुट्या विक्रीवर बंदी, गरीब कुटुंबांचं अर्थकारण कोलमडलं, नेमकं काय घडलं?
Gadchiroli Flood : गडचिरोलीच्या भामरागडला पुन्हा पुराचा विळखा; पर्लकोटा नदीला पूर, 50हुन अधिक गावांचा संपर्क तुटला, तर मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका पुरात अडकली
गडचिरोलीच्या भामरागडला पुन्हा पुराचा विळखा; पर्लकोटा नदीला पूर, 50हुन अधिक गावांचा संपर्क तुटला, तर मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका पुरात अडकली
Rupali Chakankar: रुपाली चाकणकर यांच्याकडून बदनामी केल्याचा आरोप, 19 जणांवर गुन्हा दाखल; सुषमा अंधारे, रुपाली पाटील-ठोंबरेंसह कुणाकुणाचा समावेश?
रुपाली चाकणकर यांच्याकडून बदनामी केल्याचा आरोप, 19 जणांवर गुन्हा दाखल; सुषमा अंधारे, रुपाली पाटील-ठोंबरेंसह कुणाकुणाचा समावेश?

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai PC : मोदींचा जन्मच झाला नाही, ते अवतारी, त्यांच्या हातात सुदर्शन चक्र - संजय राऊत
Mazgaon Ganpati Bappa Rally Marathi News: मुंबईतील माझगावचा मोरया मंडळाच्या आगमन मिरवणुकीत नेमकं काय घडलं?
Amravati News : एवढी आग होती, जीवाची पर्वा न करता लेकरांन बाहेर काढलं, परिचारिकांनी सांगितला थरार
Amravati hospital fire news : व्हेंटिलेटरचा स्फोट, ICU कक्षात आग, अमरावतीत ३ बालकं दगावली
Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संजय बांगरांच्या मतदारसंघात भव्य कावड यात्रा, श्रावण महिन्यात भाविकांचा मोठा उत्साह; यात्रेला गर्दी किती?
संजय बांगरांच्या मतदारसंघात भव्य कावड यात्रा, श्रावण महिन्यात भाविकांचा मोठा उत्साह; यात्रेला गर्दी किती?
धक्कादायक! जामखेडमधील आनंद मेळाव्यात थरार; हवेत गिरक्या घेणाऱ्या पाळण्यातून खाली कोसळली तरुणी
धक्कादायक! जामखेडमधील आनंद मेळाव्यात थरार; हवेत गिरक्या घेणाऱ्या पाळण्यातून खाली कोसळली तरुणी
जे चलन असेल ते चालेल, सुरक्षा अन् विमा सुद्धा मिळेल; ट्रम्पच्या दाव्यांना झुगारत 'होर्मुझ'साठी इराणी संसदेत तगडा निर्णय
जे चलन असेल ते चालेल, सुरक्षा अन् विमा सुद्धा मिळेल; ट्रम्पच्या दाव्यांना झुगारत 'होर्मुझ'साठी इराणी संसदेत तगडा निर्णय
Manoj Jarange Patil : या पुढं सरकारने डाव टाकला की पुढचं आंदोलन मुंबई अन् मुख्यमंत्र्यांच्या वर्षावर, मनोज जरांगे पाटलांचा इशारा; 29 ऑगस्टच्या आंदोलनावर ठाम!
या पुढं सरकारने डाव टाकला की पुढचं आंदोलन मुंबई अन् मुख्यमंत्र्यांच्या वर्षावर, मनोज जरांगे पाटलांचा इशारा; 29 ऑगस्टच्या आंदोलनावर ठाम!
नाशिक कुंभमेळ्याच्या खर्चातील फक्त 0.1 टक्के रक्कम वापरली तरी राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळा वाचतील: न्यायमूर्ती पी. बी. वराळे
नाशिक कुंभमेळ्याच्या खर्चातील फक्त 0.1 टक्के रक्कम वापरली तरी राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळा वाचतील: न्यायमूर्ती पी. बी. वराळे
Pune Crime Kasba Peth: पुण्यातील कसबा पेठ हादरली! पती-पत्नीचं कडाक्याचं भांडण, नवऱ्याने रिव्हॉल्व्हरचा ट्रिगर खरोखरच दाबला अन्...
पुण्यातील कसबा पेठ हादरली! पती-पत्नीचं कडाक्याचं भांडण, नवऱ्याने रिव्हॉल्व्हरचा ट्रिगर खरोखरच दाबला अन्...
बायपासच्या डांबरीकरणात भ्रष्टाचार, कंत्राटदाराला जेलमध्ये टाकलं पाहिजे; मंत्री गुलाबराव पाटलांचा आरोप, कारवाईकडे लक्ष?
बायपासच्या डांबरीकरणात भ्रष्टाचार, कंत्राटदाराला जेलमध्ये टाकलं पाहिजे; मंत्री गुलाबराव पाटलांचा आरोप, कारवाईकडे लक्ष?
Sugar Rate: देशात मोठा साखर घोटाळा? राजू शेट्टींचं मोदींना पत्र, जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रत्येक गोडाऊन तपासण्याची मागणी
देशात मोठा साखर घोटाळा? राजू शेट्टींचं मोदींना पत्र, जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रत्येक गोडाऊन तपासण्याची मागणी
Embed widget