एक्स्प्लोर

उद्या सकाळी दहापर्यंत थांबा, फडणवीसांच्या अंडरवर्ल्ड संबंधाचा पर्दाफाश करणार, नवाब मलिकांनी वात पेटवली

Nawab Malik : देवेंद्र फडणवीसांचा अंडरवर्ल्डशी काय संबंध आणि मुख्यमंत्री असताना सर्व शहराला ओलीस ठेवलं होतं त्याचाा पर्दाफाश करणार, असं मलिक म्हणाले.

Nawab Malik : देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचे अंडरवर्ल्डसोबत कनेकशन होते. याचा खुलासा उद्या सकाळी मी करणार असल्याचं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली होती की दिवाळीनंतर फटाके फोडू, पण मला वाटतं फटाके भिजले आणि वाया गेले. नवाब मलिकांनी बॉम्बस्फोटातील आरोपींकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता. मात्र देवेंद्रजी १९९९ ला तुम्ही या शहरात पहिल्यांदा आमदार म्हणून आलात. यापूर्वी मुंडे साहेबांनी अनेकांचे तार दाऊदशी जोडले. मात्र ६२ वर्षांच्या कार्यकाळात किंवा २६ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत असे आरोप कोणी सिद्ध करु शकले नाहीत. मी कवडीमोल दराने जमीन माफियाकडून घेतल्याचा आरोप फडणवीसांनी केला. मात्र फडणवीसांना चुकीची माहिती कोणीतरी देतोय.. तुम्ही सांगितलं असतं तर मीच तुम्हाला कागदपत्र दिले असते. अंडरवर्ल्डचा खेळ जो सुरु केला आहे, आज मी बोलणार नाही, मात्र उद्या सकाळी १० वाजता देवेंद्र फडणवीसांचा अंडरवर्ल्डशी काय संबंध आणि मुख्यमंत्री असताना सर्व शहराला ओलीस ठेवलं होतं त्याचाा पर्दाफाश करणार, असं मलिक म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांनी राईचा पर्वत बनवला आहे. बिनबुडाचे आरोप केले आहेत. त्यांना देण्यात आलेली माहिती चुकिची आहे. फडणवीस यांनी कोणत्याही यंत्रणेकडे जावं, चौकशीसाठी तयार आहे. कोणत्याही अंडरवर्ल्डच्या माणसांकडून जमीन विकत घेतलेली नाही. कवडीमोल किंमतीत जमीन कुठेही जमीन विकत घेतली नाही. उद्या सकाळी अंडरवर्ल्डचा हायड्रोजनचा बॉम्ब फोडणार, असल्याचं मलिकांनी सांगितलं. ( देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांवर काय केले होते आरोप?क्लिक करा अन् वाचा )

काय म्हणाले नवाब मलिक?
कोणता आंतरराष्ट्रीय डॉन कुणासाठी देशात आला? याची माहिती उद्या देणार
फडणवीसांच्या कार्यकाळात परदेशातून कसे व्यवहार होत होते याचा पर्दाफाश करणार
फडणवासांनी आरोप केलेल्या जमीनीची खरेदी कायद्यानुसार झाली आहे. 
फडणवीसांचे फटाके फुसके
गोवावाला कंपाडऊडमध्ये अजूनही सरदार वली खान यांचं घर
माझ्या जावायाच्या घरात गांजा सापडल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. ते माफी मागत नाहीत. आशा आहे, ते माफी मागणार नाहीत. लढाई सुरुच राहिल. माझी मुलगी उद्या फडणवीस यांना कायदेशीर नोटीस पाठवेल. 
माझं अंडरवर्ल्डशी कनेक्शन नाही.
उद्या सकाळी १० वाजता देवेंद्रजींचा महाराष्ट्रात अंडरवर्ल्डसोबत काय खेळ सुरू आहे आणि देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना कशाप्रकारे पूर्ण शहराला हॉस्टेज बनवलं होतं, त्याविषयी मी माहिती देईन.

महत्त्वाच्या बातम्या

मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
Vivekanand Patil and Navnath Ban: भारतीय संविधान वाचलेली पोरं जिंकलेली आहेत, फडणवीसांचे आभार मानत विवेकानंद पाटलांची प्रतिक्रिया
भारतीय संविधान वाचलेली पोरं जिंकलेली आहेत, फडणवीसांचे आभार मानत विवेकानंद पाटलांची प्रतिक्रिया
मनोज जरांगेंच्या विरोधात बोलतो म्हणून मला मारहाण; अमोल खुणे मारहाप्रकरणी 6 अज्ञातांवर गुन्हा; आरोप फरार, पोलीस पथके रवाना
मनोज जरांगेंच्या विरोधात बोलतो म्हणून मला मारहाण; अमोल खुणे मारहाप्रकरणी 6 अज्ञातांवर गुन्हा; आरोप फरार, पोलीस पथके रवाना

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
Embed widget