Navratri 2022, Day 1 LIVE: सप्तश्रृंगी गडावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात, भाविकांच्या वाहनांना गडावर परवानगी नाही - वाचा ठिकठिकाणचे महत्वाचे अपडेट्स

Maharashtra Navratri Utsav 2022 LIVE : आजपासून राज्यासह देशभरात नवरात्र उत्सवाचा उत्साह आहे. कोरोनामुळं गेले दोन वर्ष उत्सवावर निर्बंध आले होते. सर्व ठिकाणचे अपडेट्स या LIVE BLOG मध्ये..

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 26 Sep 2022 03:13 PM
अहमदनगरच्या श्री क्षेत्र मोहटा देवस्थान येथे जयघोषात शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापना

अहमदनगरच्या श्री क्षेत्र मोहटा देवस्थान येथे पारंपरिक पद्धतीने देवीच्या जयघोषात शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापना करण्यात आली.... देवस्थान समिती अध्यक्ष आणि जिल्हा न्यायाधीश सुनिल गोसावी यांच्या हस्ते सपत्नीक मुख्य धार्मिकविधी पार पडला...यावेळी दिवाणी न्यायाधीश अश्विनी बिराजदार उपस्थित होत्या...मोहटे गावात विश्वस्त डॉ ज्ञानेश्वर दराडे पदाधिकाऱ्यांच्या हस्ते महाआरती केल्यानंतर सुवर्ण अलंकाराने सजलेल्या देवीच्या मुखवट्याची गाजत मिरवणूक काढण्यात आली. साडेतीन शक्ती श्री क्षेत्र माहुरचे उपपीठ म्हणून मोहटा देवस्थानची ख्याती आहे.

Sant Muktai mandir: संत मुक्ताई समाधीस्थळी हजारो भाविक,मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळीमध्ये भाविकांची गर्दी
श्री संत आदिशक्ती मुक्ताबाईचा आज सातशे त्रेचाळीसावा जन्म दिवस आहे. या जन्मोत्सव निमित्ताने जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील संत मुक्ताई समाधीस्थळी  हजारो भाविक महिलांची गर्दी, यावेळी शेकडो महिलांनी संत दुर्गा सप्तशती पारायण  पाठ केला. त्याचबरोबर मुक्ताई विजय पारायण पाठाच वाचन केले. यानंतर विधिवत जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला
Jejuri News Updates: जेजुरीगडावर श्री खंडोबा व म्हाळसादेवीच्या उत्सवमूर्तींची घटस्थापना
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर घटस्थापनेनिमित्त विधिवत धार्मिक उपक्रम राबवून श्री खंडोबा आणि म्हाळसादेवीच्या उत्सवमूर्तींची घटस्थापना करण्यात आली. अश्विन प्रतिपदेनिमित्त जेजुरीच्या खंडोबा मंदिरात सर्व मूर्तींची पाकळनी करण्यात आली. सर्व मूर्तींना नवीन पोशाख घालण्यात आले. मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. श्री खंडोबा देवाची महारती करून घटस्थापनेला सुरुवात करण्यात आली. गुरव, घडशी, वीर कोळी, पुजारी, सेवक वर्ग, नित्यसेवेकरी, मानकरी, ग्रामस्थ,विश्वस्त व कर्मचारी व भाविकांच्या समवेत श्री खंडोबा व म्हाळसादेवीच्या उत्सव मूर्तींची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. मंदिर प्रदक्षिणेनंतर उत्सव मूर्ती बालद्वारीत नेण्यात आल्या. बालद्वारीतील घटस्थापना मंदिरात उत्सव मूर्तींची स्थापना करून महारती करण्यात आली.
Nashik Vani Navratri: 9 दिवस गडावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात, भाविकांच्या वाहनांना गडावर परवानगी नाही
कोरोनाच्या दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त नवरात्र उत्सव साजरा होतोय. सप्तश्रृंगी नवरात्रोत्सवात लाखो भाविक दर्शनासाठी येणार असल्याने पुढील 9 दिवस गडावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाविकांच्या वाहनांना गडावर परवानगी नाकारण्यात आलीय. आज पहिल्याच दिवशी भाविकांची प्रचंड गर्दी झाल्यानं गाभाऱ्यात काही काळ गोधळ उडाला होता, नियोजनातील त्रुटी समोर आल्यात. येत्या दिवसांत गर्दीचा ओघ दुपटीने वाढणार असल्याने  गर्दीचे नियोजन करण्याचं मोठं आव्हान यंत्रणेसमोर आहे
अहमदनगर : महिलांनी दांडिया खेळून केला नवरात्रोत्सवाचा आरंभ 

जिजाऊ ग्रूपने सर्व वयोगटातील महिलांना एकत्र आणून  नवरात्राची सुरुवात आज दांडिया खेळून केली.नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते. या दिवशी घटस्थापना करून आणि पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून शक्ती, ज्ञान, तपस्या आणि शांती यांची आराधना जिजाऊ ग्रुपच्या महिलांनी केली. नवरात्रीचे नऊ दिवस सर्व स्तरातील आणि वयोगटातील महिलांसाठी जिजाऊ ग्रुपने विविध सांस्कृतिक आणि सामाजिक  कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याचे संस्थापिका मनीषा संजय गुगळे यांनी सांगितले.

कोल्हापुरात छत्रपती घराण्यातील माधुरीमाराजे छत्रपती यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलं

Kolhapur News : शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून सुरु झाली. आज या निमित्ताने करवीर छत्रपती घराण्यातील माधुरीमाराजे छत्रपती यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलं. देवीच्या मुख्य गाभार्‍यात जाऊन दर्शन येण्याचा मान राजघराण्याला आहे. कोरोना संकटामुळे गेली दोन वर्ष हे दर्शन घेता येत नव्हतं. त्यामुळे पुन्हा असं संकट येऊ नये अशी प्रार्थना यावेळी मधुरीमाराजे छत्रपती यांनी केली आहे.

Kolhapur News: करवीर छत्रपती घराण्यातील माधुरीमाराजे छत्रपती यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलं
शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून सुरु झाली. आज या निमित्ताने करवीर छत्रपती घराण्यातील माधुरीमाराजे छत्रपती यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलं.. देवीच्या मुख्य गाभार्‍यात जाऊन दर्शन  येण्याचा मान राजघराण्याला आहे.. कोरोना संकटामुळे गेली दोन वर्ष हे दर्शन घेता येत नव्हतं त्यामुळं पुन्हा असं संकट येऊ नये अशी प्रार्थना यावेळी मधुरिमाराजे छत्रपती यांनी केलीय...

 
Navratri Nandurbar Updates:  नवरात्र उत्सवात मूकबधिर विद्यार्थ्यांच्या उत्साह वाढवणारा उपक्रम
Navratri Nandurbar Updates:  नंदुरबार शहरातील दुधाळे शिवारात असलेल्या मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी तळोदा येथील सहयोग सोशल ग्रुपच्या वतीने अनोखा उपक्रम राबविण्यात आला. नवरात्र उत्सवाच्या काळात मूकबधिर विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक दिवस विद्यार्थ्यांसोबत या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना नवीन कपडे तसेच खेळण्यासाठी साहित्य तसेच शैक्षणिक उपक्रमांच्या वस्तूंचे वाटप ग्रुपच्या वतीने करण्यात आले. नवरात्र उत्साह काळात या ग्रुपच्या वतीने विविध उपक्रम हाती घेण्यात आल्या आहेत. यावेळी ग्रुपच्या सदस्यांनी दिवसभर या विद्यार्थ्यांसोबत घालवला नवरात्र उत्सवाच्या काळात समाजातील उपेक्षित घटकांसाठी नऊ दिवस विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती सदस्यांनी दिली आहे.
Amol Kolhe at Tuljapur: राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी घेतले तुळजाभवानीचे दर्शन
राष्ट्रवादीचे खासदार तथा सिनेअभिनेते अमोल कोल्हे यांनी आज नवरात्राच्या पहिल्या दिवशी आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. गेल्या दोन वर्षात कोरोना काळामुळे देवीचे दर्शन घेता आले नाही, यावर्षी मात्र आईच्या दर्शनासाठी मी तुळजापुरात आलो असून राज्यात सध्या अतिवृष्टी यासारखी अनेक संकट आहेत. ती संकट दूर व्हावी यासाठी आई तुळजाभवानी चरणी साकडे घातलं असल्याचे अमोल कोल्हे यांनी सांगितले.

 
Beed Ambejpgai Navratri News: तीन वर्षांच्या खंडानंतर खुल्या वातावरणात योगेश्वरी देवी नवरात्र महोत्सवास सुरुवात
Beed Ambejpgai Navratri News:  महाराष्ट्राचे शक्तीपीठ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोकणवासियांची कुलस्वामिनी अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सवास सुरुवात झालीय. अंबाजोगाईच्या अपर जिल्हाधिकारी मंजुषा मिस्कर यांच्या हस्ते शासकीय पूजा आणि घटस्थापना करण्यात आली. या महोत्सवाच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत आहेत. या महोत्सवाच्या कालावधीत  संगीत भजन, गायन कीर्तन,जगदंबेचा गोंधळ अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

 
Navratri 2022 : वेंगुर्ल्यात दुर्गामातेचं अनोखं वाळूशिल्प; महिला अत्याचार, भ्रष्टाचाराविरोधी जनजागृती 

Navratri 2022 : आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे.सर्वत्र या उत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत असताना दिसून येत आहे.नवरात्रीच्या निमित्तानं विविध विषयांवर वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती देखील केली जात आहे. महिलांवरील अत्याचार थांबावेत याकरता जनजागृती करण्यासाठी वेंगुर्ले आरवली समुद्रकिनारी रविराज चिपकर यांनी वाळूशिल्प साकारलं आहे.

Navratri 2022 : नाशिकची ग्रामदेवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कालिका माता मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ

 Navratri 2022 : नाशिकची ग्रामदेवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कालिका माता मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झालाय. पहाटे देवीची काकड आरती, घटस्थापना आणि महापूजा पार पडल्यानंतर भाविकांना मंदिर  दर्शनासाठी खुले करण्यात आले. यंदा सर्व निर्बंध मुक्त करण्यात आल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळत असून अगदी पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी मंदिर परिसरात रांगा लावल्या आहेत. येत्या दहा दिवसात बारा लाखाहून अधिक भाविक हजेरी लावतील असा अंदाज मंदिर संस्थानकडून वर्तविण्यात येतोय. देवीला जवळपास शंभर किलो चांदी आणि सोन्याची आभूषणे चढविण्यात आल्याने देवीच विलोभनीय रूप आज नजरेस पडतय. पुढचे नऊ दिवस मंदिरात वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही पाऊल उचलण्यात आले आहे. भाविकांसाठी दोन लाखांचा अपघाती विमा काढण्यात आला असून मंदिर परिसरात 45 सीसीटीव्हीची नजर असणार आहे.

खानदेश कुलस्वामिनी महाराष्ट्रातील पाचवे शक्तिपीठ असलेल्या श्री एकवीरा देवी मंदिरात आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात
खान्देश कुलस्वामिनी महाराष्ट्रातील पाचवे शक्तिपीठ असलेल्या श्री एकवीरा देवी मंदिरात आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली नवरात्र उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे मंदिरात आयोजन करण्यात आले असून पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. 

धुळे शहरातील पांझरा नदी किनारी असलेल्या श्री एकविरा देवीचे मंदिर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे या मंदिरात देवीची विलोभनीय मूर्ती असून महाराष्ट्र सह गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातील अनेक भाविकांची कुलस्वामिनी असलेल्या एकवीरा देवी मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात तसेच मंदिरात चैत्र नवरात्र आणि अश्विन नवरात्र असे दोन नवरात्र उत्सव साजरे केले जातात आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला एकवीरा देवी मंदिरात भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली, पहाटे मंदिरात देवीची विधिवत पूजा आणि घटस्थापना होऊन नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली. पुढील नऊ दिवस मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या नवरात्र उत्सवात करवीर पिठाचे शंकराचार्य हे देखील उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते भक्त निवासाचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

 
Mumbai Mumba Devi: मुंबईतील मुंबादेवी मंदिरात दर्शनासाठी रांगा

आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झालेला आहे. नवरात्र उत्सव निमित्ताने पहिल्या दिवसापासूनच आज मुंबईतील मुंबादेवी मंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. कोरोनानंतर यावर्षी सर्वत्र उत्साहात नवरात्रोत्सव साजरा होतोय, यामध्ये मुंबईतील मुंबादेवी मंदिरात देखील चैतन्याचं वातावरण आहे.

चंद्रकांत पाटील यांनी घेतले सारसबाग येथील महालक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये देवीचे दर्शन

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यातील सारसबाग येथील महालक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये आरती करून देवीचे दर्शन घेतले..

Navratri 2022 LIVE: वर्ध्यात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी, ठिकठिकाणी मंडपात विराजमान होणार जगदंबा माता
Navratri 2022 LIVE:  वर्धा जिल्ह्यात नवरात्रीच्या उत्सवात मोठा जल्लोष बघायला मिळतो. यावर्षी देखील ठिकठिकाणी सार्वजनिक मंडळ मातेच्या आगमनासाठी सज्ज झाले असून दरवर्षीप्रमाणे मार्केट परिसरातील आणि आर्वी नाक्यावरील विद्युत रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर निर्बंध मुक्त वातावरणात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आनंदात साजरा केला जाणार आहे.

 

 
Navratri 2022 LIVE: आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने राज्याच्या आरोग्य विभागामार्फत "माता सुरक्षित तर घर सुरक्षित" अभियान

आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने राज्याच्या आरोग्य विभागामार्फत " माता सुरक्षित तर घर सुरक्षित " हे विशेष अभियान राबवण्यास सुरुवात होत आहे. २६सप्टेंबर ते ५ऑक्टोबर दरम्यान चालणाऱ्या या अभियानात घरातील माता निरोगी रहावी,जागरूक रहावी व समाजात तिच्या आरोग्याबद्दल संवेदनशीलता निर्माण व्हावी असा आमचा उद्देश आहे.यानिमित्ताने राज्यातील सर्व माता,भगिनींनी आपल्या आरोग्याची आवश्य तपासणी करून घ्यावी अशी विनंती आपल्याला करीत आहे.

Chandrapur Navratri Mahakali Mandir: नवरात्रीनिमित्त सजले चंद्रपूरचे ऐतिहासिक देवी महाकाली मंदिर, घटस्थापना करून देवीच्या नवरात्राला प्रारंभ, हजारो भाविकांनी केली गर्दी
Chandrapur Navratri Mahakali Mandir:  चंद्रपूरचे आराध्य दैवत असलेल्या देवी महाकालीच्या अश्विन नवरात्र उत्सवाला आज घटस्थापनेने उत्साहात प्रारंभ झाला आहे. नवरात्राच्या पहिल्याच दिवशी चांदागडच्या आईचे दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येत भाविक मंदिरात पहाटे पासून दाखल झाले आहेत. कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे हटविण्यात आल्यामुळे या वर्षी महाकालीचं नवरात्रोत्सव पूर्ण उत्साहात साजरा करण्यात येत आहे. लोकांचा उत्साह देखील अतिशय ओसंडून वाहत असून हजारो भाविकांच्या उपस्थितीने मंदिर परिसर फुलुन गेला आहे. आज सकाळी देवीची विशेष पूजा करून घटस्थापना करण्यात आली. चौदाव्या शतकात गोंड राणी 'हिरातनी' आणि पंधराव्या शतकात राणी 'हिराई' ने बांधलेल्या या मंदिरात दर्शनासाठी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या पाच राज्यातील भाविक गर्दी करतात. पुढचे 9 दिवस देवीच्या दर्शनाला हजारो भक्त हजेरी लावणार आहे.
वर्ध्यात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी, ठिकठिकाणी मंडपात विराजमान होणार जगदंबा माता, मार्केट परिसरासह आर्वी नाक्यावर आकर्षक विद्युत रोषणाई

Wardha Navrati 2022 : वर्धा जिल्ह्यात नवरात्रीच्या उत्सवात मोठा जल्लोष बघायला मिळतो. यावर्षी देखील ठिकठिकाणी सार्वजनिक मंडळ मातेच्या आगमनासाठी सज्ज झाले असून दरवर्षीप्रमाणे मार्केट परिसरातील आणि आर्वी नाक्यावरील विद्युत रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर निर्बंधमुक्त वातावरणात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आनंदात साजरा केला जाणार आहे.

नवरात्रीनिमित्त चंद्रपूरचे ऐतिहासिक देवी महाकाली मंदिर सजले, हजारो भाविकांची गर्दी

Chandrapur Mahakali Devi : चंद्रपूरचे आराध्य दैवत असलेल्या देवी महाकालीच्या अश्विन नवरात्र उत्सवाला आज घटस्थापनेने उत्साहात प्रारंभ झाला आहे. नवरात्राच्या पहिल्याच दिवशी चांदागडच्या आईचे दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक मंदिरात पहाटेपासून दाखल झाले आहेत. कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे हटवण्यात आल्यामुळे यावर्षी नरात्रोत्सव पूर्ण उत्साहात साजरा करण्यात येत आहे. लोकांचा उत्साह देखील अतिशय ओसंडून वाहत असून हजारो भाविकांच्या उपस्थितीने मंदिर परिसर फुलून गेला आहे. आज सकाळी देवीची विशेष पूजा करुन घटस्थापना करण्यात आली. चौदाव्या शतकात गोंड राणी 'हिरातनी' आणि पंधराव्या शतकात राणी 'हिराई' ने बांधलेल्या या मंदिरात दर्शनासाठी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या पाच राज्यातील भाविक गर्दी करतात. पुढचे नऊ दिवस देवीच्या दर्शनाला हजारो भक्त हजेरी लावणार आहेत.

 महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सव आजपासून सुरु

Tuljapur Aai Tuljabhavani : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या (Kulswamini Tuljabhavani Devi) शारदीय नवरात्र महोत्सव (Navratri Mahotsav) आजपासून सुरु झाला आहे. दोन वर्ष कोरोनाचे (Corona Updates) निर्बंध असल्यानं उत्सवावर देखील निर्बंध होते. आता निर्बंध हटल्यानं उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. नवरात्रीच्या (Navratri 2022) पहिल्या दिवशीच्या आधी मध्यरात्री एक वाजता देवी तुळजाभवानी मंचकी निद्रा (Manchaki Nidra) संपवून आपल्या गर्भ घरात दाखल झाल्या. यावेळी आई तुळजाभवानीच्या मूर्तीला पंचामृताचा विधिवत महाभिषेक करण्यात आला.








 




 

 


 


 




 






 




 



 





Ratnagiri News: नवरात्रीनिमित्त रत्नागिरी मध्ये दुर्गामाता दौडचं आयोजन

 नवरात्रीनिमित्त रत्नागिरी मध्ये दुर्गामाता दौडचं आयोजन केले जाते. शिव प्रतिष्ठान हिंदुस्तानचा उपक्रम असून पारंपारिक वेशभूषा दुर्गा माता दौड निघते. घटस्थापना ते विजयादशमी पर्यंत दौडच आयोजन केले जाते.यावेळी शहरातील १८देवींचं दर्शन घेतले जाते.


 
Dhule Navratri News: खान्देश कुलस्वामिनी श्री एकविरा देवीची पार्वतीच्या रुपात बांधण्यात आली पूजा
खानदेश कुलस्वामिनी महाराष्ट्रातील पाचवे शक्तिपीठ असलेल्या श्री एकवीरा देवी मंदिरात आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली नवरात्र उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे मंदिरात आयोजन करण्यात आले असून पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती

 

धुळे शहरातील पांझरा नदी किनारी असलेल्या श्री एकविरा देवीचे मंदिर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे या मंदिरात देवीची विलोभनीय मूर्ती असून महाराष्ट्र सह गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातील अनेक भाविकांची कुलस्वामिनी असलेल्या एकवीरा देवी मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात तसेच मंदिरात चैत्र नवरात्र आणि अश्विन नवरात्र असे दोन नवरात्र उत्सव साजरे केले जातात आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला एकवीरा देवी मंदिरात भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली, पहाटे मंदिरात देवीची विधिवत पूजा आणि घटस्थापना होऊन नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली. पुढील नऊ दिवस मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या नवरात्र उत्सवात करवीर पिठाचे शंकराचार्य हे देखील उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते भक्त निवासाचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

 

पार्वतीच्या रूपात बांधण्यात आली पूजा

 

नवरात्राच्या पहिल्या दिवशी आज देवीचा पांढरा रंग असल्याने देवीला पांढरी साडी नेसवण्यात आली होती तसेच देवीचा साज शृंगार पार्वतीच्या रूपात करण्यात आला होता. नऊ दिवस मंदिरात कुमारिका पूजन कुंकुमार्चन, शतचंडी यज्ञ असे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत तसेच भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर 24 तास खुले ठेवण्यात येणार असल्याची माहिती मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी दिली

 

 
Maharashtra Navratri 2022: औरंगाबादेत आजपासून कर्णपुरा यात्रा नवरात्र उत्सवाची सुरुवात मोठ्या जल्लोषात

औरंगाबादेत आजपासून कर्णपुरा यात्रा नवरात्र उत्सवाची सुरुवात मोठ्या जल्लोषात, उत्साहात होत आहे. पूजा नित्य नियमाप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते, कर्णपुरा नवरात्र उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष अंबादास दानवे यांच्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे

Navratri 2022: नवरात्रीला फुल मार्केट ग्राहकांनी बहरले, मार्केटमध्ये फुलांचे दर सामान्य

 आज नवरात्रीचा पहिला दिवस. पहिल्या दिवशी दादरचे फुल मार्केट ग्राहकांनी बहरून गेले आहे.मात्र मार्केटवर राज्यात झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा परिणाम दिसतो आहे.तसेच प्लास्टिकच्या फुलांचाही फटका मार्केटला बसलेला आहे.कोरोनानंतर दोन वर्षांनी नवरात्री साजरी होत असल्याने मार्केट मध्ये उत्साहाचे वातावरण आहे.गर्दी देखील आहे, मात्र मालाची आवक प्रचंड घसरलेली आहे.जी फुले येत आहेत ती भिजलेली असल्याने व्यापारी नाराज आहेत, ग्राहक आहेत पण चांगला माल नाही अशी स्थिती आहे.तर मार्केटमध्ये फुलांचे दरही सामान्य आहेत.झेंडू 50 ते 80, अष्टर - 80, शेवंती - 60 ते 120 रु , गुलछडी - 240 तर ज्यांची आज मागणी जास्त आहे. 

saptashrungi Updates: सप्तश्रृंगी गडावर देवीच्या आभूषणाची मिरवणूक, पालकमंत्री दादा भुसे गडावर उपस्थित

सप्तश्रृंगी गडावर देवीच्या आभूषणाची मिरवणूक, पालकमंत्री दादा भुसे गडावर उपस्थित, देवस्थान ट्रस्ट कार्यालयापासून देवीच्या आभूषणाची वाजतगाजत मिरवणूक निघत आहे

Sangli News: सांगलीत शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीस प्रारंभ, नवरात्र उत्सवानिमित्त काढली जाते दुर्गामाता दौड
Sangli News: सांगलीत शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीस प्रारंभ, नवरात्र उत्सवानिमित्त काढली जाते दुर्गामाता दौड

नवरात्र उत्सवानिमित्त श्री शिवप्रतिष्ठानकडून काढण्यात येणाऱ्या दुर्गामाता दौडीस आज पहाटेपासून सुरुवात  झालीय. नवरात्र उत्सवात पुढील नऊ दिवस शहरातील विविध भागातून ही दौड काढण्यात येते आणि दसऱ्याच्या दिवशी या दौडीची सांगता होते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्यापासून पहाटे  ध्वज पूजन करून दौडीस  प्रारंभ झाला. मशाल, तलवार धारक  ध्वज धारक हे दौडीच्या अग्रस्थानी असतात. या दौडीच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस फाटा दौडीच्या मार्गावर तैनात करण्यात आला होता. नवरात्र उत्सव सार्वजनिकपणे साजरा करण्यासाठी दुर्गामाता दौडीची संभाजी भिडे यांनी  संकल्पना पुढे आणली. तरूणांमध्ये हिंदू धर्माविषयी जागुर्ती व्हावी यासाठी १९८२ साली संभाजी भिडे यांनी सांगलीत शिवप्रतिष्ठानच्या वतीने  या दुर्गामाता दौडीस सुरुवात केली होती.

पार्श्वभूमी

Maharashtra Navratri Utsav 2022 LIVE :  आजपासून राज्यासह देशभरात नवरात्र उत्सवाचा उत्साह आहे. कोरोनामुळं गेले दोन वर्ष उत्सवावर निर्बंध आले होते. सर्व ठिकाणचे अपडेट्स या LIVE BLOG मध्ये..

Navratri 2022 :
  शारदीय नवरात्रोत्सवाच्या घटस्थापनेसाठी (Ghatstahapana) आज (26 सप्टेंबर) पासून सुरुवात होत आहे. नवरात्रीच्या या पहिल्या दिवशी कलश स्थापनेनंतर दुर्गा देवीच्या पहिल्या रूपाचे म्हणजेच देवी शैलपुत्रीचे (Devi Shailpiutri) पूजन केले जाते. शारदीय नवरात्रीत दुर्गा अष्टमी व्रत, अष्टमी तिथीला कन्यापूजन, नवमी तिथीला महानवमी आणि दशमी तिथीला दसरा किंवा विजयादशमी हे सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. प्रतिपदेच्या दिवशी घटस्थापना किंवा कलश स्थापनेने दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा सुरू होते. 26 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. पंचांगानुसार अश्विन शुक्ल प्रतिपदा तिथी 26 सप्टेंबर रोजी पहाटे 03:23 ते 27 सप्टेंबर रोजी पहाटे 03:08 पर्यंत आहे. 


घटस्थापना स्थापना शुभ मुहूर्त 2022


दाते पंचागानुसार, नवरात्रीच्या घटस्थापना मुहूर्ताबद्दल माहिती दिली आहे. शारदीय नवरात्रीच्या घटस्थापना किंवा कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त पंचांगानुसार अश्विन शुक्ल प्रतिपदा तिथी 26 सप्टेंबर रोजी पहाटे 03:23 ते 27 सप्टेंबर रोजी पहाटे 03:08 पर्यंत आहे. दुपारी 1.45 वाजेपर्यंत घटस्थापनेचा मुहूर्त आहे. सोमवारी ब्राह्म मुहूर्तापासून म्हणजे पहाटे पाच वाजल्यापासून दुपारी 1.45 वाजेपर्यंत घटस्थापना करून पूजन करता येईल. जर काही कारणास्तव तुम्हाला सकाळी कलशाची स्थापना करता येत नसेल, तर तुम्ही ती अभिजीत मुहूर्तावर दुपारी 11.48 ते 12.36 या वेळेत करू शकता. अभिजीत मुहूर्त हा कलशाची स्थापना करण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो.


सकाळी आहे सर्वोत्तम वेळ


नवरात्रीच्या पहिल्या दिवशी 26 सप्टेंबर रोजी सकाळी 06.11 ते 07.42 पर्यंत चोघड्याचा अमृत मुहूर्त आहे. त्यामुळे सकाळी कलशाची स्थापना करणे खूप शुभ राहील.


नवरात्रीत घटस्थापनेला महत्व
हिंदू धर्मानुसार, नवरात्रीतील नवदुर्गेच्या पूजेचा भाग म्हणून घटस्थापना केली जाते. घटस्थापनेसाठी शुभ मुहूर्त निवडणे महत्त्वाचे आहे.  कलश हे गणेशाचे रूप आहे, तर या कलश आणि त्यामध्ये आमंत्रण केलेल्या देवतांची गणेशाच्या रूपात पूजा केली जाते. म्हणूनच नवरात्रीमध्ये घटस्थापनेला म्हणजेच कलशाच्या स्थापनेला खूप महत्त्व आहे. घटस्थापनेचा कलश उत्तर किंवा ईशान्य दिशेला ठेवा. स्थापनेच्या ठिकाणी प्रथम गंगाजल शिंपडून ती जागा पवित्र करा. या ठिकाणी दोन इंच मातीत वाळू आणि सप्तामृत मिसळून पसरवून घ्या. कलशावर स्वस्तिक चिन्ह काढा आणि कुंकू लावा. कलशाला धागा बांधा.


नवरात्री घटस्थापना मंत्र
ज्या ठिकाणी कलश स्थापना करत असाल त्या जागेला उजव्या हाताने स्पर्श करून म्हणा - ऊॅं भूरसि भूमिरस्यदितिरसि विश्वधाया विश्वस्य भुवनस्य धर्त्रीं। पृथिवीं यच्छ पृथिवीं दृग्वंग ह पृथिवीं मा हि ग्वंग सीः।।


सप्तधान्य मांडतानाचा मंत्र - ऊॅं धान्यमसि धिनुहि देवान् प्राणाय त्यो दानाय त्वा व्यानाय त्वा। दीर्घामनु प्रसितिमायुषे धां देवो वः सविता हिरण्यपाणिः प्रति गृभ्णात्वच्छिद्रेण पाणिना चक्षुषे त्वा महीनां पयोऽसि।।


कलश स्थापनेचा मंत्र - ऊॅं आ जिघ्र कलशं मह्या त्वा विशन्त्विन्दव:। पुनरूर्जा नि वर्तस्व सा नः सहस्रं धुक्ष्वोरुधारा पयस्वती पुनर्मा विशतादयिः।।


कलशात जल भरण्याचा मंत्र - ऊॅं वरुणस्योत्तम्भनमसि वरुणस्य स्काभसर्जनी स्थो वरुणस्य ऋतसदन्यसि वरुणस्य ऋतसदनमसि वरुणस्य ऋतसदनमा सीद।।


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


संबंधित बातम्या 


Navratri 2022 : नवरात्रीत 'या' गोष्टींची घ्या विशेष काळजी 


Navratri 2022: नवरात्रीत लग्नासाठी वधू किंवा वर पाहत असाल, तर शुभ मुहूर्त जाणून घ्या

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.