एक्स्प्लोर
Advertisement
सोन्याच्या दरात घसरण, सराफांकडे ग्राहकांची गर्दी
नाशिक : नोटाबंदीच्या निर्णयानंतर गेल्या महिन्याभरात सोन्याचे भाव घसरत चालले आहेत. बुधवारी नाशिकमध्ये सोन्याला प्रतितोळा 28 हजार रुपये इतका भाव मिळाला. सोन्याच्या दरात घसरण झाल्याने पुन्हा एकदा सराफपेढ्या ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत.
नोटाबंदीनंतर लगेचच 32 हजारांवर पोहचलेला सोन्याचा दर मागणी घटत चालल्यामुळे हळूहळू खाली उतरत आहे. यामागे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चढउतारही कारणीभूत असली तरी रोख व्यवहारातील मंदी आणि घटत चाललेली मागणी यामुळे हे दर घसरल्याचं सांगितलं जातं.
पुढील काही दिवस हे दर स्थिर राहतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सध्या लग्नसराईचा काळ असल्याने सोनेखरेदी मोठ्या प्रमाणावर होते. त्यातच सोनं 28 हजारांवर येऊन पोहचल्याने महिलावर्गात आनंदाचं वातावरण बघायला मिळत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
मुंबई
भारत
Advertisement