एक्स्प्लोर
Nashik Crime : विश्वासू नोकरानेच दिला दगा! सराफा दुकानातून पळवले लाखोंचे सोने! नाशिकमधील घटना
Nashik Crime News: नाशिक शहरात सराफा दुकानात काम करणाऱ्या नोकरानेच मालकाचा विश्वासघात करून सुमारे 14 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे.
Nashik Crime News: आजच्या घडीला कुणावर विश्वास ठेवणे दुरापास्त झाले आहे. विश्वासू माणसांकडून अनेकदा विश्वासघात झाल्याच्या घटना ऐकायला मिळतात. अशीच एक घटना नाशिक शहरात उघडकीस आली आहे. विश्वासू नोकरानेच सराफा मालकाचे तब्बल 14 तोळे लंपास केल्याची घटना घडली आहे. नाशिक शहरात सराफा दुकानात काम करणाऱ्या नोकरानेच मालकाचा विश्वासघात करून सुमारे 14 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी अजित श्रीकांत नागरे यांचे मातोश्रीनगर शांती पार्क येथे ड्रीम हेरिटेजमध्ये सद्गुरु अलंकार नावाचे दुकान आहे. या दुकानात हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरेंद्र कुमार कमलेश किशोर वर्मा हा कामाला होता.
अनेक वर्षांपासून काम करत असल्याने सराफ दुकानाचे मालक त्याच्या विश्वासावर अनेक वेळा दुकान सोडून जात असायचे. मात्र वेळच्या वेळी वर्मा कडून हिशोब पक्का असायचा. विश्वासू नोकर असल्याने नागरे यांचा त्याच्यावर विश्वास होता. मात्र वर्मा याने 20 ते 24 सप्टेंबर दरम्यान या दुकानातून सोन्याच्या विविध वस्तू लंपास करत पोबारा केला. जेव्हा ही गोष्ट सराफ दुकान मालकाला समजली, त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. नोकराने एक लाख रुपये किमतीची 22 ग्राम वजनाची सोन्याची पोत, 50 हजार रुपये किमतीची साडेअकरा ग्रॅम वजनाची शॉर्ट पोत, एक लाख पाच हजार रुपये किमतीची साडे 23 ग्रॅम वजनाची सोन्याची शॉर्ट पोत, सतरा हजार रुपये किमतीची 16 ग्राम वजनाची शॉर्ट पोत, 45 हजार रुपये किमतीची साडेनऊ ग्रॅम वजनाची शॉर्ट पोत, तीस हजार रुपये किमतीची शॉर्ट पोत, सात ग्रॅम वजनाची एक सोन्याची वाटी, 25 हजार रुपये किमतीची सहाशे ग्राम वजनाची सोन्याची एक वाटी, 25 हजार रुपये किमती सहा ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, 35 हजार रुपये किमतीची आठ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, 20 हजार रुपये किमतीचे साडेचार ग्राम वजनाचे बास्केट रिंग जोड, दहा हजार रुपये किमतीचे अडीच ग्रॅम वजनाचे बास्केट ट्रिंग जोड, तसेच 70 हजार रुपये किमतीची 15 ग्राम वजनाची सोन्याची शॉर्ट पोत असा एकूण सहा लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नोकराने पळवून नेला आहे.
याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात सुरेंद्रकुमार वर्मा याच्याविरुद्ध आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लोंढे करीत आहेत. दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून ऐन दिवाळीच्या दिवसांत सोन्यावर डल्ला मारल्याने सराफी व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
व्यापारी, दुकानदारांना गंडवणारी टोळी सक्रिय...
नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून व्यापारी तसेच दुकानदारांना गंडवणारी टोळी सक्रिय झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. फसवणूक, चोरी, हातचलाखी यासारख्या अनेक घटना शहरात घडत येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान नाशिक शहरात पोलीस असल्याची बतावणी करून वयोवृद्ध इसमांच्या हातातील सोन्याची अंगठी व दागिने हातचलाखीने काढून घेऊन फराळ होणाऱ्या मालेगाव येथील दरेगाव रोड परिसरातील सादिक अली राहतली सय्यद यास गुन्हे शाखा एक पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून दोन लाख 22 हजार रुपयांचा किमतीचे 50 ग्राम मध्ये सोने हस्तगत करण्यात आले आहे. तर दुसरीकडे नामांकित किराणा दुकानातून बोलत असल्याचे सांगून व्हॉट्सअपवर यादी पाठवून संबंधित किराणामाल परस्पर लंपास करणाऱ्या टोळीचा देखील शहरात वावर असल्याचे दिसून येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement