एक्स्प्लोर

आर्टिलरी रॅकेटचा पर्दाफाश: लष्करात तोतया जवानांची भरती, सुरक्षेला धोका

नाशिक : स्कॉर्पिन पाणबुडीसंदर्भातली गोपनीय कागदपत्रं लिक झाल्याची बातमी ताजी असतानाच आता अजून एक धक्कादायक बातमी नाशिकमधून समोर आली आहे. सामरीक क्षेत्रात जगविख्यात असलेल्या नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये बनावट कागदपत्रं सादर करुन 4 तरुणांनी थेट 15 दिवस प्रशिक्षण घेतल्याचं समोर आलं आहे. केवळ नाशिकच्या आर्टिलरीच नाही तर अहमदनगरच्या एमआयआरसी आणि नागपुरच्या गार्ड रेजिमेंट आणि इतर काही लष्करी संस्थातही अशाच पद्धतीने बनावट कागदपत्रं तयार करुन 40 तोतया प्रशिक्षणार्थींनी घुसखोरी केल्याचा अंदाज आहे. नाशिक पोलिसांनी लष्कर भरती करुन देणाऱ्या या रॅकेटचा पर्दाफाश केला असून दिल्लीतून लष्करी जवानासह 2 एजंटांनाही अटक केली आहे.   भारतीय लष्कराची ताकद असलेल्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या महाराष्ट्रातल्या लष्करी आस्थापनांमध्ये बनावट कागदपत्रं सादर करुन 40 तरुणांनी प्रवेश मिळवल्याचं समोर आलं आहे. नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये असे 4, अहमदनगरच्या एमआयआरसीमध्येही 3 आणि नागपुरच्या गार्ड रेजीमेंटमध्येही अशाच पद्धतीने घुसखोरी केलेल्या तोतया प्रशिक्षणार्थी जवानांना अटक करण्यात आली आहे. नाशिक पोलिसांनी पैसे घेऊन लष्करात भरती करुन देणाऱ्या दिल्लीतील 2 एजंटांसह आर्मी हेडक्वार्टरमधल्या जवानालाही अटक करुन या देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचवत असलेल्या राष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. Artillery_Racket_1 भरतीच्या नावाखाली हे रॅकेट प्रत्येक उमेदवाराकडून 4 ते 10 लाख रुपये घ्यायचं. त्यानंतर हरियाणातील बनावट रिक्रूटमेंट सेंटरचं पत्र घेऊन दिल्ली मुख्यालयाकडे भरतीची प्रक्रिया सरकवली जायची. दिल्लीतून मिळणारं राहदरी आणि मेडीकल सर्टिफिकेट जसच्या तसं छापून दिलं जायचं. हे प्रमाणपत्र इतके हुबहुब असायचे की कुठलाही संशय न येता या तोतया प्रशिक्षणार्थींचा थेट प्रवेश व्हायचा. जुलै महिन्यात 4 तरुणांनी बनावट संशयास्पदरित्या घुसखोरी केल्याचं नाशिक आर्टिलरीच्या लक्षात आल्यावर हे प्रकरण चव्हाट्यावर आलं. सलग दीड महिना पाठपुरावा करुन नाशिक पोलिसांनी दिल्लीतल्या लष्कराच्या हेडक्वार्टरमध्ये काम करणाऱ्या जवानासह दोन एजंटांना ताब्यात घेतलं आणि या रॅकेटचा पर्दाफाश केला. मात्र वाटतो तितका हा तपास सोपाही नव्हता. लष्कराच्या तथाकथित गुप्ततेमुळे तपासात अनेक अडचणी आल्या. अखेर न्यायालय आणि संरक्षण मंत्रालयाने आदेश दिल्यावर तपास पुढे सरकला. Artillery_Racket_2 नाशिक आर्टिलरीमध्ये अटक करण्यात आलेल्या बलवीर गुज्जर, सचिन किशनसिंग, तेजपाल चोपडा, सुरेश महांतो या या 4 युवकांना अटक करण्यात आली आहे. ते सध्या नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात आहेत. तर नगरच्या एमआयआरसीतील 3 घुसखोर जवानही जेलमध्ये आहेत. दिल्लीतून लष्करी जवान गिरीराज घनश्याम चौहान सिंहसह एजंट टेकचंद मेघवाल आणि मदन मानसिंहच्या मुसक्या नाशिक पोलिसांनी आवळल्या आहेत. या रॅकेटच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या लष्करी प्रशिक्षण सेंटरमध्ये एकूण 40 तोतया प्रशिक्षणार्थींनी घुसखोरी केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.   लष्करी प्रशिक्षण केंद्रात भरती करुन देणाऱ्या रॅकेटचा नाशिक पोलिसांनी पर्दाफाश केला असला तरी या प्रकरणामुळे देशातल्या लष्करी आस्थापनांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. बारकोडसह इतर सुरक्षा नियमांचा अंतर्भाव करुनही या संस्थांमधली भरती प्रक्रिया इतकी ढिसाळ कशी? कागदपत्रांची सत्यता आणि सुरक्षितता न तपासता उमेदवारांचं प्रशिक्षण सुरु कसं होतं? घुसखोरी केलेले हे तरुण लष्करात भरतीसाठी इच्छुक असलेले बेरोजागर तरुण असल्याचं सांगितलं जात असलं तरी याचाच फायदा कुणी अतिरेकी, माओवाद्यांनी घेतला नसेल हे कशावरुन? तोफखान्याचे देशातील एकमेव प्रशिक्षण केंद्राच्या आणि लष्कराच्या एकूण सुरक्षा व्यवस्थेचं पितळ उघडं पडलंय असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. देशाच्या सुरक्षेची चिंता वाढणा-या या प्रकरणाचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
Vivekanand Patil and Navnath Ban: भारतीय संविधान वाचलेली पोरं जिंकलेली आहेत, फडणवीसांचे आभार मानत विवेकानंद पाटलांची प्रतिक्रिया
भारतीय संविधान वाचलेली पोरं जिंकलेली आहेत, फडणवीसांचे आभार मानत विवेकानंद पाटलांची प्रतिक्रिया
मनोज जरांगेंच्या विरोधात बोलतो म्हणून मला मारहाण; अमोल खुणे मारहाप्रकरणी 6 अज्ञातांवर गुन्हा; आरोप फरार, पोलीस पथके रवाना
मनोज जरांगेंच्या विरोधात बोलतो म्हणून मला मारहाण; अमोल खुणे मारहाप्रकरणी 6 अज्ञातांवर गुन्हा; आरोप फरार, पोलीस पथके रवाना

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
Jantar Mantar: सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
Embed widget