Lok Sabha Election 2024 : राज्यात कांद्याच्या (Onion) मुद्यावरुन शेतकऱ्यांमध्ये प्रचंड चीड असल्याचे बघायला मिळत आहे. अशातच हीच चीड आज शेतकरी (Farmers) मतदार राजाने मतदान करताना देखील दाखवली आहे. गळ्यात कांद्याची माळ घालत त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. यात अगदी बागलाणचे माजी आमदार दिपीका चव्हाण आणि माजी आमदार संजय चव्हाण यांनी देखील यात सहभाग घेत आज मतदान केले आहे. सटाणा शहरातील मराठी शाळा येथील मतदान केंद्रावर त्यांनी सहकुटुंब मतदान केलं. तर यावेळी कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदानाला जाणाऱ्या काही शेतकरी तरुणांना पोलिसांनी अडवल्याचा प्रकार देखील समोर आला आहे.


यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे मतदान केंद्रांवर काहीवेळ गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र बघायला मिळाले. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत या शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत त्यांना गळ्यातील माळा काढून मतदान करण्यास रवाना केल. मात्र, या निमित्याने शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा कांद्याचा प्रश्न लावून धरल्याचे बघायला मिळाले आहे. 


गळ्यात कांद्याच्या माळा घालून शेतकर्‍यांसह नेते मंडळी पोहचले मतदानाला


यंदाच्या निवडणुकीत कांदा प्रश्न चांगलाच गाजल्यानं शेतकऱ्यांनी मतदानाच्या दिवशी हि सरकारला कांदा प्रश्नांची आठवण करून दिलीय. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वडगाव-पंगू येथील काही तरुण शेतकऱ्यांनी कांद्याला भाव नसल्याचा निषेध म्हणून कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदानाला जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, या तरुणांना मतदान केंद्राच्या गेटवरवरच पोलिसांनी अडवत गळ्यातील कांद्याच्या माळा काढण्यास सांगितले. दरम्यान, पोलिसांबरोबर त्याची शाब्दिक चकमक देखील झाली. मात्र, पोलिसांनी त्यांची समजूत काढत त्यांना शांत केल आणि अखेर त्यांनी गळ्यातील माळा काढून ठेवत मतदान केले.


कांद्याच्या माळा आम्हाला दाखवा- छगन भुजबळ


मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांनी आज सरकारला कांद्याच्या प्रश्नांची आठवण करून दिली आहे. या विषयी बोलताना मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जेष्ठनेते छगन भुजबळ म्हणाले की, मतदान केंद्रात कांद्याच्या माळा नेऊन मतदान केले त्यावर अधिकारी काहीही करू शकत नाही. त्यामुळे मतदान करा, कांद्याच्या माळा घालून गेलो म्हणून मतदान करू शकलो नाही, असं करू नका. कांद्याच्या माळा आम्हाला दाखवा. जे कोणी राजकारणी आहेत त्यांना दाखवा. राजकारण्यांपुढे सत्याग्रह करा. मात्र, याविषयी मतदान अधिकारी काय करणार, असे म्हणत छगन भुजबळ यांनी यावर  भाष्य केलंय.


इतर महत्वाच्या बातम्या