Nashik and Dindori Lok Sabha Constituency : नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान पार पडत आहे. सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली असून यात 100 वर्षांच्या आजी, दिव्यांग बांधव यांच्यासह तरुण वर्ग, माहिला आणि नेते मंडळींनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. 


सकाळपासूनच नाशिक (Nashik) आणि दिंडोरीच्या (Dindori) विविध मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी केल्याचे चित्र आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात पहिल्या दोन तासात 6.45 टक्के मतदान झाले आहे. तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात 6.40 टक्के मतदान झाले आहे. 


100 वर्षांच्या आजी, दिव्यांग बांधव, नेतेमंडळींनी बजावला मतदानाचा हक्क


नाशिक मतदारसंघासाठी मतदान केंद्र २२८ वर जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) यांनी मतदानाचा हक्क बजावला. बॉईज टाऊन स्कूल येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. तर मनपा शाळा क्र.१४,१५ मखमलाबाद येथे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सहपत्नीक मतदान केले. तर मतदान केंद्र २२८ वर दिलीप धुळेकर यांनी व्हिलचेयर वरून मतदानाचा हक्क बजावला. नाशिक मतदारसंघासाठी बॉईज टाऊन हायस्कूल येथे सुशिला उदयकुमार छाजेड (80) यांनी मतदानाचा हक्क बजावला. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मौजे डोंगरगाव येथे साखराबाई बाबुराव आहेर या 100 वर्षांवरील आजींनी मतदान केंद्रावर येऊन मतदान केले. तसेच दिंडोरी लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार (Bharti Pawar) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे (Bhaskar Bhagare), नाशिक लोकसभेचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse), महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje), अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. 


दिंडोरीत मेहुणे गावाचा मतदानावर बहिष्कार


दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील मेहुणे गावाचा लोकसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मेहुणे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 53, 54 आणि 55 या मतदान केंद्रावर अद्याप एकही मतदान झालेले नाही. गावकऱ्यांनी मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकला आहे. तीनही मतदान केंद्रावर एकूण 2757 मतदान आहे. पाणी प्रश्न, शेतकरी समस्या, गावाला दुष्काळी नुकसान भरपाईचे अनुदान मिळाले नाही म्हणून बहिष्कार टाकण्यात आला आहे. 


नाशिक- सिन्नर तालुक्यात दोन मतदान केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड


नाशिक-सिन्नर तालुक्यात दोन मतदान केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड दोन तासांनंतर सुरु झाले आहे. साधारण 20 मिनिटं बंद ईव्हीएम होते. यामुळे मतदारांचा खोळंबा झाल्याचे दिसून आले. 


लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद


18 व्या लोकसभेसाठी सोमवारी  मतदान असल्याने नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीसह 17 बाजार समित्यांमधील लिलाव बंद ठेवण्यात आलेले आहे. जास्तीत जास्त मतदारांना मतदानाचा हक्क बजवावा यासाठी प्रशासनाने आठवडे बाजार तसेच बाजार समित्यांमधील लिलाव बंद करण्याची सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने आज जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितिसह 17 बाजार समित्या बंद राहणार आहेत.


आणखी वाचा 


EVM मशीनला हार घालणे शांतीगिरी महाराजांना भोवणार; गुन्हा दाखल होण्याची शक्यता, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मागवली माहिती