एक्स्प्लोर

मुख्यमंत्री आणि नारायण राणेंचा दावा फोल!

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते नारायण राणे यांचा दावा साफ फोल ठरला आहे. कारण एबीपी माझाने दिलेल्या मुख्यमंत्री आणि राणेंच्या भेटीच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालं आहे. तशी दृश्य माझाच्या हाती लागली आहेत. दोन्ही नेते एकमेकांची भेट झाली नसल्याचा दावा करत होते. मात्र या दृश्यांमुळे त्यांचा दावा फोल ठरला आहे. अहमदाबादेत मी वैयक्तिक कामासाठी गेलो होतो, असा नारायण राणेंचा दावा साफ फोल ठरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे एकाच कारमधून भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या भेटीला जात असतानाचे दृश्यं माझाच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

पुढच्या सीटवर नितेश, मागच्या सीटवर राणे-मुख्यमंत्री!

खासगी कामासाठी अहमदाबादला जाऊ शकत नाही का असा सवाल करणाऱ्या काँग्रेस नेते नारायण राणेंप्रकरणी नवा गौप्यस्फोट झाला आहे. दस्तुरखुद्द नारायण राणे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच गाडीत प्रवास करताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे याच गाडीत पुढच्या सीटवर नारायण राणे यांचे सुपुत्र आणि आमदार नितेश राणेही असल्याचं दिसतंय. ‘माझा’च्या हाती लागलेल्या दृष्यांमध्ये नारायण राणे आणि मुख्यमंत्री मागच्या सीटवर बसललेले स्पष्ट दिसतात. तर नितेश राणे पुढच्या सीटवर ड्रायव्हरच्या बाजूला पाहायला मिळतात. त्यामुळे खासगी कामासाठी राणेंना राज्याचे मुख्यमंत्री कशाला सोबत लागतात असा सवाल आता उपस्थित होत आहे. रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांची अहमदाबादमध्ये भेट घेतली. मात्र काल राणेही अहमदाबादमध्ये होते. त्यामुळे नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने जोर धरला आहे. दौरा खासगी – राणे दरम्यान अहमदाबाद विमानतळावर कोणतीही प्रतिक्रिया न देणाऱ्या राणे यांनी मुंबईत पोहोचताच, आपला अहमदाबाद दौरा हा खाजगी कामासाठी असल्याचं सांगितलं. खाजगी कामासाठी मी अहमदाबादला जाऊ शकत नाही का? असा प्रतिसवाल राणे यांनी विचारला. मुख्यमंत्री – अमित शहांची भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांची अहमदाबादमध्ये भेट घेतली. दोघांमध्ये यावेळी सुमारे एक तास चर्चा झाली. या चर्चेचा तपशील कळू शकला नसला तरी काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, नारायण राणे काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षात जाणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाध्यक्ष अमित शाह हे अहमदाबादेत असतानाच नारायण राणेही अहमदाबादमध्येच असल्याने या चर्चेला अधिक बळ मिळालं आहे. नगरसेवक पदापासून ते मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या नारायण राणे यांचा राजकीय प्रवास – 1968 – वयाच्या सोळाव्या वर्षी शिवसेनेत प्रवेश – 1968 – शिवसेनेच्या चेंबूर येथील शाखेत शाखाप्रमुख म्हणून जबाबदारी – 1985 ते 1990- या काळात शिवसेनेचे नगरसेवक त्यानंतर बेस्टचे अध्यक्षपद भूषवले – 1990-95 – नारायण राणे पहिल्यांदा विधानसभेवर – 1991 – छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यानंतर पक्षातील महत्त्व वाढले – 1990-95 – याच काळात विधानपरिषदेचे विरोधपक्ष नेतेपद – 1996-99 – युतीची सत्ता आल्यानंतर राज्याच्या महसूल मंत्रीपदी विराजमान – 1999 – महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड – 2005 – शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत मतभेद. मतभेदानंतर 3 जुलै 2005 रोजी शिवसेना सोडली – 2005 – शिवसेना सोडल्यानंतर नारायण राणेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश -2005 – शिवसेना सोडल्यावर काँग्रेसतर्फे मालवणमधून विक्रमी मतांनी विजयी – 2005 – आघाडी सरकारमध्ये महसूल मंत्रीपदी निवड – 2007 – काँग्रेसमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याविरोधात बंड – 2009 – विधानसभेनंतर उद्योग मंत्रीपदावर घसरण – 2014 – लोकसभेला पुत्र निलेश राणे यांच्या पराभावनंतर मंत्रीपदाचा राजीनामा – 2014 – मुख्यमंत्री पदासाठी झुलवल्याच्या नाराजीतून पुन्हा मंत्रीपदाचा राजीनामा संबंधित बातम्या

पुढच्या सीटवर नितेश, मागच्या सीटवर राणे-मुख्यमंत्री!

राणेंच्या निर्णयानंतर अनेकांचं आयुष्य घडणार आणि बिघडणार : नितेश राणे

राणे अहमदाबादहून मुंबईकडे रवाना, शाह-फडणवीसांशी भेट?

नारायण राणे यांचा राजकीय प्रवास

नारायण राणे पुन्हा शिवसेनेत परतणार?

महत्त्वाच्या बातम्या

थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
सीजेपीच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मनसे आक्रमक, अमित ठाकरेंनी पोलिसांची गाडी अडवली, पोलिसांनाही इशारा
सीजेपीच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मनसे आक्रमक, अमित ठाकरेंनी पोलिसांची गाडी अडवली, पोलिसांनाही इशारा

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
Embed widget