Narhari Zirwal On Adivasi Students Protest: खाऊन पिऊन आंदोलन करा, मी जे आंदोलन करायचो ते चोरून खायचं
Narhari Zirwal On Adivasi Students Protest: खाऊन पिऊन आंदोलन करा, मी जे आंदोलन करायचो ते चोरून खायचं
पुण्यातील मांजरी येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून, आंदोलनस्थळी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि मंत्री नरहरी झिरवळ यांनी भेट देत विद्यार्थ्यांशी चर्चा केली. यावेळी दोन्ही मंत्र्यांनी विद्यार्थ्यांना आमरण उपोषण सोडण्याची विनंती केली. मात्र, विद्यार्थी आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. जोपर्यंत मागण्यांबाबत लेखी जीआर मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. या आंदोलनात हजारो विद्यार्थी सहभागी झाले असून, काही विद्यार्थी आमरण उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ यांनी आंदोलनास्थळी केलेल्या विधानाची चर्चा सध्या राज्यभर सुरु आहे. शिष्टमंडळाशी चर्चा करून झाल्यानंतर नरहरी झिरवळ आणि अशोक उईके हे आंदोलन स्थळी भेट देण्यासाठी आले. यावेळी नरहरी झिरवळ यांनी विद्यार्थ्यांना तुम्ही खाऊन पिऊन आंदोलन करा असा सल्ला दिला. हे सांगत असतानाच आंदोलनकर्ते विद्यार्थ्यांनी नरहरी झिरवळांना उत्तर दिलं की, आम्ही खाऊन पिऊन आंदोलन करायचा असते तर तुम्ही तर आले नसते. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना असा सल्ला देऊन नरहरी झिळवळांनी या आंदोलनाची मस्करी केली आहे अशी चर्चा सुरू झाली. दरम्यान, आपल्या विविध 14 मागण्यांसाठी पुण्याच्या मांजरी परिसरात गेल्या 14 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.






















