Kangana Ranaut : आधी म्हणाली, माझ्या जवानीची स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव 'मोठा भाऊ'; कंगनाकडून 'सब भूल चूक माफ'
Kangana Ranaut Baba Ramdev Controversy : कंगना रणौत आणि बाबा रामदेव यांच्यातील शाब्दिक युद्ध रक्षाबंधनाच्या निमित्ताने संपलं आहे. कंगनाने बाबा रामदेव यांना 'मोठा भाऊ' मानत वादावर पडदा टाकला .

Kangana Ranaut Baba Ramdev Controversy Ended : बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वाद अखेर संपुष्टात आला आहे. यापूर्वी बाबा रामदेव यांच्या विधानावर आक्रमक होत "माझ्या जवानीची आणि बेडरूमची स्वप्ने पाहू नका" अशा कडक शब्दांत सुनावणाऱ्या कंगना रणौतने रक्षाबंधनाचे औचित्य साधून बाबा रामदेव यांना आपला 'मोठा भाऊ' मानले आहे आणि "सब भूल चूक माफ" असे म्हणत वादावर पूर्णविराम दिला आहे.
Baba Ramdev Statement On Raksha Bandhan : बाबा रामदेव यांनी पाठवली मिठाई
रक्षाबंधनानिमित्त माध्यमांशी बोलताना बाबा रामदेव यांनी कंगना रणौतसोबतचे सर्व मतभेद विसरल्याचे सांगितले. देशात द्वेष किंवा शत्रूत्व नसायला हवे, वादापेक्षा संवाद महत्त्वाचा आहे, असे सांगत बाबा रामदेव यांनी कंगनाला राखीनिमित्त मिठाई आणि भेटवस्तू पाठवण्याची घोषणा केली. तसेच तिच्याशी थेट फोनवर बोलणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Kangana Ranaut Reaction On Instagram : "भावाचे प्रेम अन् मिठाई स्वीकारते"
बाबा रामदेव यांच्या या भूमिकेनंतर कंगना रणौतने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत लिहिले, "रक्षाबंधन सण हा सर्व विसरून माफ करण्यासाठी असतो. माझे मोठे भाऊ बाबा रामदेव जी यांनी खूप छान सांगितले की, विवाद नाही तर संवाद व्हायला हवा. आज रक्षाबंधनानिमित्त मी त्यांची मिठाई आणि मोठ्या भावाचे प्रेम दोन्ही प्रेमाने स्वीकारते. तुमचे खूप खूप आभार, ईश्वर तुम्हाला दीर्घायुष्य देवो."

Kangana Ranaut Brother Rakhi Celebration : भावाला बांधली राखी, मानले आभार
याशिवाय कंगनाने तिचा भाऊ अक्षित रणौत याला राखी बांधतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. "माझ्या भावामध्ये मला माता-पित्यांचीच प्रतिमा दिसते. त्याने कायम सनातन धर्म आणि कुळाची गरिमा जपावी," अशा भावना तिने व्यक्त केल्या.
कंगना रणौतच्या प्रोफेशनल फ्रंटबद्दल सांगायचे तर, ती अलीकडेच 'भारत भाग्य विधाता' या चित्रपटात दिसली होती. थिएटरमध्ये या चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नसला तरी सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म झी5 (ZEE5) वर या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
ही बातमी वाचा:
Before You Go
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha






















