एक्स्प्लोर

कोकण भस्मसात करण्याचा सेनेचा डाव : नारायण राणे

कोकणासंदर्भात शिवसेनेची भूमिका कायमच दुटप्पी राहिली आहे. पैशांसाठी कोकण भस्मसात करण्याचा डाव शिवसेनेचा आहे, असा आरोपही नारायण राणेंनी केला आहे.

मुंबई : रत्नागिरीत होऊ घातलेल्या नाणार ग्रीन रिफायनरीला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा नारायण राणे यांनी तीव्र शब्दात विरोध केला आहे. हा प्रकल्प कोकणात आणण्याचा घाट शिवसेनेने घातल्याची टीका राणेंनी केली. शिवाय, कोकण भस्मसात करण्याचा डाव सेनेचा असल्याचाही आरोप राणेंनी केला. कोकणासंदर्भात शिवसेनेची भूमिका कायमच दुटप्पी राहिली आहे. पैशांसाठी कोकण भस्मसात करण्याचा डाव शिवसेनेचा आहे, असा आरोपही नारायण राणेंनी केला आहे. “आम्ही नाणार प्रकल्प होऊ देणार नाही. अधिकाऱ्यांनी दम दिल्यास त्यांच्याविरोधात केसेस दाखल करु. काही झालं तरी कोकणवासीयांचा ऱ्हास करणारा प्रकल्प मी होऊ देणार नाही. मी मुख्यमंत्र्यांकडे हा विषय घेऊनच जाणार आहे. मला कोणाकडे जावं लागेल हे मला माहिती आहे.”, असे राणे म्हणाले. 18 गावातील जनतेचा, शेतकऱ्यांचा नाणार ग्रीन रिफायनरीला तीव्र विरोध असल्याचे राणे म्हणाले. शिवाय, कोकणात एकूण 13 हजार हेक्टर जमीन लागवडीखाली आहे. या भागात 7 लाख आंब्यांची झाडं आणि 2 लाख काजूची झाडं आहेत, जगातला प्रसिद्ध देवगड आंबाही याच क्षेत्रातला आहे, असेही राणेंनी सांगितले. सांडपाण्यामुळे मासेमारीचं मोठं नुकसान होण्याची भीतीही राणेंनी यावेळी व्यक्त केली. राज्याचे 'उद्योगी' मंत्री आणि केंद्रात अवजड उद्योग मंत्री शिवसेनेचेच आहेत. उद्धव ठाकरेंचा विरोध असेल तर तुमच्या मंत्र्यांनी प्रस्ताव मान्य का केला?, जमीन अधिग्रहणाला मान्यता का दिली?, असे सवाल राणेंनी उपस्थित केले आणि शिवसेनेवर निशाणा साधला. “विरोध करणाऱ्या अशोक वालम यांना धमक्या दिल्या जात आहेत. सात पिढ्या बसून खाईल इतके पैसे मिळतील, असं पत्र वालम यांना देण्यात आलं. त्यांच्या पत्नीवरही केसेस टाकल्या, छळ केला. वालम यांना ‘मातोश्री’वर बोलवून दम दिला जातो आहे.“, असे गंभीर आरोप नारायण राणेंनी केला. शिवसेनेचे पदाधिकारी दलाली करत आहेत. खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी यांनी जमिनी घेतल्याची माहिती आहे, असाही गंभीर आरोप राणेंनी यावेळी केला.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जुलै 2026 | शनिवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जुलै 2026 | शनिवार 
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
Jalna Crime News: बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Pune Moshi Building Collapse: अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Embed widget