नंदुरबार : राज्यातील बालमृत्यू रोखण्यासाठी सरकारकडून अनेक घोषणा होतात, शेकडो कोटींचा निधी खर्च होत असतो. मात्र आदिवासी दुर्गम भागात या योजना पोचतात का? या भागातील आरोग्य यंत्रणा तितक्या सक्षम आहेत का हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. त्याचे कारणही तसेच आहे. नंदुरबार जिल्ह्यात एकाच महिन्यात एक दोन नव्हे तर तब्बल 118 बालमृत्यू झाले आहेत. सरासरी विचार केल्यास दिवसाला चार बालकांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे.
राज्यात सर्वाधिक कुपोषित बालके असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात शून्य ते सहा वर्ष वयोगटातील 118 बालकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सप्टेंबर महिन्यात 12 प्रकल्पात 2992 बालकांचा जन्म झाला आहे. त्यात 118 बालकांचा मृत्यू झाला आहे. यात शून्य ते 28 दिवसांच्या 35 बालकांचा, एक महिना ते एक वर्ष वयोगटातील 38, एक ते पाच वयोगटातील 20 बालकांचा मृर्त्यू झाला आहे. राज्यातील बालमृत्यू दर दुप्पट आहे. दुर्गम भागातील अंगणवाड्या बंद असतात पोषण आहार पोचत नाही. दुसरीकडे बालमृर्त्यूचा संशोधन अहवाल सादर केला जात नसल्याचा आरोप समाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे .
जिल्ह्यातील बालमृत्यू रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपाय योजना सुरु करण्यात आल्या आहेत. झालेल्या बालमृत्यूच्या कारणांचा वस्तुस्थिती दर्शक रिपोर्ट तयार करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात बालमृत्यू रोखण्यासाठी असलेल्या समितीची बैठक गेल्या पाच वर्षात झाली नव्हती. ती आता झाली असून दर तीन महिन्यांना घेण्यात येणार असल्याची माहिती खुद्द जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली आहे .
जिल्ह्यात कुपोषण आणि बालमृत्यू या संदर्भात अनेक अहवाल येतात. संख्या कागदावर कमी दिसते मात्र आदिवासी दुर्गम भागात चित्र वेगळे आसते ही परिस्थती सुधारावयाची असेल प्रशासनाची आणि संबधित यांत्रानाची मानसिकता बदलवण्याची गरज आहे.
महत्वाच्या बातम्या :
- कुपोषणाबाबतच्या उपाययोजना केवळ कागदावर नकोत, त्या अमलात आणणं गरजेचं : हायकोर्ट
- Malnutrition : दुर्गम भागात डॉक्टरपेक्षा मांत्रिकावर भरवसा; रुग्णांना डॉक्टपर्यंत आणण्यासाठी मांत्रिकाला पैसे
- Melghat : मेळघाटात कुपोषणामुळे 15 दिवसांत 14 मुलं, दोन गर्भवती मातांचा मृत्यू; राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाचे निर्देश