एक्स्प्लोर

नांदेडमध्ये लाच घेण्यासाठी पोलिसांनी आरोपीच्या आईचं मंगळसूत्र विकलं!

नांदेड : नांदेड पोलिसांनी अवघ्या पोलिस दलाची अब्रू वेशीला टांगण्याचं कृत्य केले आहे. एका प्रकरणात अटक न करण्यासाठी नांदेड पोलीस दलातील एका पोलिसाने 5 हजार रुपयांची लाच मागितली. आपल्याकडे पैसे नाहीत त्यामुळे आईचे मंगळसूत्र विक्री करून पैसे द्यावे लागतील असे आरोपीने सांगूनही या भ्रष्ट पोलिसाने मंगळसूत्र विक्री करायला लावून लाचेची 5 हजार रुपयांची रक्कम स्वीकारली. आता हा पोलीस आणि त्याचा साथीदार एसीबीच्या जाळ्यात सापडला आहे. प्रकरण काय आहे? रामदेव (नाव बदललेले आहे) याची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. आई, पत्नी आणि दोन लहान मुलांची जबाबदारी रामदेववर आहे. त्यामुळे मिळेल ती मोलमजुरी करून रामदेव आपल्या कुटुंबाचा सांभाळ करतो. गेल्या काही दिवसांपासून रामदेव आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद सुरु होता. रागाच्या भरात रामदेवच्या पत्नीने त्याच्याविरोधात उमरी पोलीस स्थानकात एक तक्रार दाखल केली. तक्रार दाखल झाल्यावर पोलीस हवालदार उद्धव घुले यांनी रामदेवला अटक करण्याची धमकी दिली आणि अटक टाळायची असेल तर 5 हजार रुपये लाच देण्याचे फर्मान सोडले. मोलमजुरी करणारा रामदेव एवढे पैसे देऊ शकत नव्हता. त्याने हवालदार घुलेची खूप विनवणी केली. त्याचाही आई आणि लहान मुलगा घुलेंच्या पाय पडूनही विनवणी करीत होते. पण हवालदार लाचेवर ठाम होता. आपल्या आईचे मंगळसूत्र विक्री करूनच रक्कम उभी करावी लागेल, असे रामदेवने हवालदार घुले याना सांगितले. तरीही घुले यांना दया आली नाही. उलट हवालदार घुले याने मंगळसूत्र विक्रीतून आलेले पैसे इतरत्र खर्च न करता लाच देण्याचे फर्मान सोडले. अखेर रामदेवने आईचे मंगळसूत्र घेऊन सराफ्याचे दुकान गाठले. मंगळसूत्र विक्री करून 5 हजार 700 रुपये मिळाले. इतक्यात एसीबीला संपर्क करण्याचा सल्ला रामदेवळा मिळाला. त्याने थेट एसीबीला संपर्क साधला आणि संपूर्ण प्रकार कळवला. एसीबीने सापला लावला आणि मध्यस्थ अशोक चव्हाण यांच्या मार्फत 5 हजाराची लाच स्वीकारताना मध्यस्थ आणि हवालदार उद्धव घुले एसीबीच्या जाळ्यात अडकला.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: विधान परिषद निवडणुकीनंतर महायुतीतील वाद वाढवू नका! एकनाथ शिंदे यांचे शिवसेना नेत्यांना आदेश
Maharashtra Live blog updates: विधान परिषद निवडणुकीनंतर महायुतीतील वाद वाढवू नका! एकनाथ शिंदे यांचे शिवसेना नेत्यांना आदेश
Anand Paranjpe : मराठी भाषा खूप समृद्ध, आमच्याकडे पण खूप मोठा शब्दकोश, पण....; एकनाथ शिंदेंवरील टीकेवरून आनंद परांजपेंचा महायुतीतील मित्रपक्षांना सल्लावजा सूचक इशारा
मराठी भाषा खूप समृद्ध, आमच्याकडे पण खूप मोठा शब्दकोश, पण....; एकनाथ शिंदेंवरील टीकेवरून आनंद परांजपेंचा महायुतीतील मित्रपक्षांना सल्लावजा सूचक इशारा
नागपुरात भीषण अपघात! म्हाडाच्या बांधकामस्थळी क्रेन कोसळून दोन मजुरांचा मृत्यू, दोघे जखमी
नागपुरात भीषण अपघात! म्हाडाच्या बांधकामस्थळी क्रेन कोसळून दोन मजुरांचा मृत्यू, दोघे जखमी
Sanjay Gaikwad: शेतकऱ्यांबाबतचं वादग्रस्त वक्तव्य; टीकेची झोड उठताच एकनाथ शिंदेंकडून 'करेक्ट कार्यक्रम? आता संजय गायकवाडांचा यू-टर्न, म्हणाले....
शेतकऱ्यांबाबतचं वादग्रस्त वक्तव्य; टीकेची झोड उठताच एकनाथ शिंदेंकडून 'करेक्ट कार्यक्रम'? आता संजय गायकवाडांचा यू-टर्न, म्हणाले....

व्हिडीओ

Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Washim Farmer Protest: वाशीममध्ये समृद्धी महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार! प्रचंड गर्दीने रस्ता व्यापून गेला, नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात; परिसराला छावणीचे स्वरूप
वाशीममध्ये समृद्धी महामार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार! प्रचंड गर्दीने रस्ता व्यापून गेला, नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात; परिसराला छावणीचे स्वरूप
मग माझ्या मुलाच्या नावाचं पाकीट देण्याचा प्रश्न आलाच कुठं? सतेज पाटील अन् हसन मुश्रीफांमध्ये वाद रंगला! आता मुश्रीफांनी डोंगळेंनी राजीनाम्याला टाळाटाळ करताच काय घडलं ते सांगितलं, तिघांची नावं घेतली
मग माझ्या मुलाच्या नावाचं पाकीट देण्याचा प्रश्न आलाच कुठं? सतेज पाटील अन् हसन मुश्रीफांमध्ये वाद रंगला! आता मुश्रीफांनी डोंगळेंनी राजीनाम्याला टाळाटाळ करताच काय घडलं ते सांगितलं, तिघांची नावं घेतली
Pune Crime News: सारसबागेसमोर 3 दिवसांपासून उभ्या असलेल्या कारमधून दुर्गंधी, नागरिकांना संशय, पोलिसांनी दार उघडलं, कुजून फुगलेला मृतदेह बघून सगळेच हादरले
सारसबागेसमोर 3 दिवसांपासून उभ्या असलेल्या कारमधून दुर्गंधी, नागरिकांना संशय, पोलिसांनी दार उघडलं, कुजून फुगलेला मृतदेह बघून सगळेच हादरले
India vs Pakistan : मोठी बातमी : पाकिस्तानी फलंदाजांनी कृणाल पांड्याला धू-धू धुतला, 23 चेंडूत संपवली मॅच; टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी : पाकिस्तानी फलंदाजांनी कृणाल पांड्याला धू-धू धुतला, 23 चेंडूत संपवली मॅच; टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, नेमकं काय घडलं?
नागपुरात भीषण अपघात! म्हाडाच्या बांधकामस्थळी क्रेन कोसळून दोन मजुरांचा मृत्यू, दोघे जखमी
नागपुरात भीषण अपघात! म्हाडाच्या बांधकामस्थळी क्रेन कोसळून दोन मजुरांचा मृत्यू, दोघे जखमी
Sanjay Gaikwad: शेतकऱ्यांबाबतचं वादग्रस्त वक्तव्य; टीकेची झोड उठताच एकनाथ शिंदेंकडून 'करेक्ट कार्यक्रम? आता संजय गायकवाडांचा यू-टर्न, म्हणाले....
शेतकऱ्यांबाबतचं वादग्रस्त वक्तव्य; टीकेची झोड उठताच एकनाथ शिंदेंकडून 'करेक्ट कार्यक्रम'? आता संजय गायकवाडांचा यू-टर्न, म्हणाले....
Navnath Ban and Nilesh Rane: अरे नवनाथ बन, याद राख, तुला रडायला पण वेळ देणार नाही, तू काय माझा मित्र नाहीस, निलेश राणे यांचा निर्णायक इशारा
अरे नवनाथ बन, याद राख, तुला रडायला पण वेळ देणार नाही, तू काय माझा मित्र नाहीस, निलेश राणे यांचा निर्णायक इशारा
IND vs NZ 4th T20I : तीन सामने खेळल्यानंतर भुवनेश्वर कुमारला बाहेरचा रस्ता, वैभव सूर्यवंशीही OUT, न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या टी-20 साठी भारताची Playing XI जाहीर
तीन सामने खेळल्यानंतर भुवनेश्वर कुमारला बाहेरचा रस्ता, वैभव सूर्यवंशीही OUT, न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या टी-20 साठी भारताची Playing XI जाहीर
Embed widget