Nanded News Update : नांदेड जिल्ह्यातील मुखेड, किनवट, हदगाव, अप्परावपेठ येथील वन मजूरांचे गेल्या तीन दिवसांपासून नांदेडच्या उप -वनसंरक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. आंदोलन करणारे हे वनमजूर गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून वनविभागात (Forest Department० कार्यरत आहेत. परंतु, त्यांना अद्याप कायम करण्यात आले नाही. त्यामुळे कायम करण्यासह आपल्या विविध मागण्यांसाठी वन मजूरांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.
या आहेत मागण्या!
वन मजुरांना कायम करण्यात यावे, सेवा जेष्ठतेनुसार कामावर घ्यावे, दहा तारखेच्या आत पगार द्यावा, सूचना न देता मजुरांना कमी केलेल्या मजुरांना परत कामावर घ्यावे आणि गेल्या सहा महिन्यांपासून थकीत असणारा पगार देण्यात यावा या मागण्यांसाठी वन मजुरंनी हे धरणे आंदोलन केले आहे. आपल्या सर्व मागण्या मान्य कण्यात याव्यात अशी मागणी आंदोलनकर्त्या वन मजुरांनी केली आहे.
दरम्यान, उप-वनसंरक्षकांसोबत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी या कामगारांच्या आंदोनल आणि मागण्यांवर बोलण्यास टाळले.
गेल्या तीन दिवसांपासून वन विभाग कार्यालयासमोर बसलेल्या या वन मजुरांची उप-वनसंरक्षकांनी कोणत्याही प्रकारची विचारपूस केली नाही, असे या वन मजुरांनी सांगितले. वन विभागात काम करणाऱ्या या वन मजुरांना कोणतीही सूचना न देता कामावरून कमी केल्यामुळे व गेल्या सहा महिन्यांचा पगारही थकल्यामुळे या वन मजुरांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे तातडीने मागण्यांची दखल घेऊन या आंदोलनावर तोडगा काढवा अशी मागणी आंदोलकर्त्यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
Nanded crime : नांदेड येथे मिरवणुकीत डीजेसमोर नाचण्याच्या वादातून चाकूने भोसकून युवकाचा खून
Gunratna Sadavarte : दातांचे डॉक्टर ते हायकोर्टातील वकील, कसा आहे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा नांदेड ते मुंबई प्रवास? वाचा सविस्तर
Nanded News : अमेरिकन डॉलर्सचे आमिष दाखवून गंडा घालणारी टोळी गजाआड, नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Nanded News Update : श्रीराम वनगमन रथयात्रेच्या आयोजकांसह अडीच हजार जणांवर गुन्हे दाखल, नांदेड पोलिसांची कारवाई