Nanded News Update : नांदेडमधील श्रीराम वनगम रथयात्रेसाठी परवानगी न घेतल्याबद्दल आयोगकांसह अडीच हजार जणांविरोधात वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 15 मार्च रोजी श्रीलंकेहून निघालेली श्रीराम वनगमन यात्रा अयोध्या येथे जाण्यापूर्वी नांदेड शहरात दाखल झाली होती. या रथयात्रेची विनापरवागी शोभायात्रा काढण्यात आल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पोलीस हवालदार पांडूरंग शिंदे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. 


श्रीलंकेतून निघालेली ही यात्रा भारतात अयोध्या येथे जाण्यापूर्वी नांदेड शहरात दाखल झाली. शहरातील रेणुका माता मंदिरापासून शोभायात्रेची सुरवात करून नांदेड शहरातील जुना मोंढा येथे दाखल झालेल्या या राम वनगमन यात्रेत राम वनवासात असतानाचा देखावा, रामसीता, हनुमान देखावा, श्रीरामाची भव्य मूर्तीची उत्साहात मिरवणूक काढण्यात आली होती. या यात्रेत महिला, पुरुष, आबालवृद्धांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. नांदेड शहरातील रेणुकादेवी मंदिरापासून निघालेली ही यात्रा पंचवटी हनुमान मंदिर परिसरातील मल्टीपर्पज हायस्कूल येथे समारोप करण्यात आला. 


श्रीरामाने वनवासात ज्या ठिकाणी वास्तव्य केले होते, त्या सर्व ठिकाणांवर फिरून या यात्रेचा समारोप अयोध्येत होणार आहे. परंतु, ही यात्रा काढण्यापूर्वी श्रीराम वनगमन यात्रेचे संयोजक दिलीप ठाकूर आणि पदाधिकारी यांनी नांदेड जिल्हाधिकारी व पोलीस यांच्याशी चर्चा करून यात्रेचे आयोजन करण्यात आले होते, असे ठाकूर यांनी सांगिते. तर राजकीय द्वेषातून या यात्रेवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष प्रवीण साले आणि दिलीप ठाकूर यांनी केला आहे.  


महत्वाच्या बातम्या