Nanded: जिल्हा परिषद शाळांमधील  गुणवत्ता व पटसंख्या वाढावी हे आव्हान नेहमीच शासन व शिक्षकांसमोर राहिले आहे. तर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यापेक्षा खासगी शाळेत आपल्या मुलांना प्रवेश मिळावा यासाठी पालकांची चढाओढ लागलेली आपणास पहावयास मिळते. तसेच खासगी शाळांत प्रवेश मिळावा यासाठी पालक तासनतास रांगेत उभे राहून व दामदुप्पट पैसे भरून आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा यासाठी धडपड करताना दिसतात. तर स्वतः जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये नोकरी करणाऱ्या बहुतांश शिक्षकांची मुले ही खासगी शाळेत शिक्षण घेत असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळातील विद्यार्थी संख्या गुणवत्ते अभावी रोडवताना दिसतेय. पण अशा परिस्थितीत जिल्हा पतिषद शाळांचा दर्जा व गुणवत्ता वाढावी यासाठी एक धैय्याने पेटलेला अवलिया झगडताना दिसतोय. शहरापासून दूर असणाऱ्या व शेतकरी,मजूर,मागास,गरीब तळागाळातील लोकांना शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी तो रात्रीचा दिवस करतोय. जिल्हा परिषदेच्या शाळेतील (Zilla Parishad School) हे गुरुजी,रात्री उशिरापर्यंत व भल्या पहाटे विद्यार्थ्यांचा अभ्यास घेताना दिसतात. तर ह्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी रात्रीचे वर्ग घेऊन गुरुजी रात्रभर शाळेतच मुक्काम करतात. हे सगळे चित्र आहे नांदेड जिल्ह्यातील मालेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील. मालेगाव  (Malegaon) येथील जिल्हा परिषद शाळेत माध्यमिक शिक्षण घेणारे व राष्ट्रपती पुरस्कार (Rashtrapati Award) प्राप्त शिवा कांबळे(Shiva Kamble) गुरुजींनी ग्रामीण भागातील शेतकरी, मोलमजुर,गरीब, मागास, बिगारी काम करणाऱ्या पाल्यांच्या शिक्षणाचा स्तर उंचावा असा चंग बांधत,विद्यार्थ्यांसाठी रात्रीचे वर्ग सुरू केलेत.



अर्धापुर तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल मालेगाव येथे गेल्या 24 वर्षा पासून शिवा कांबळे हे माध्यमिक शिक्षक म्हणून आपली सेवा बजावत आहेत. दरम्यान वाढत्या इंग्रजी शाळामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांना गळती लागलीय. तर दुसरीकडे कोरोना महामारीमुळे शाळा कुलूपबंद होऊन विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर गेल्याचे चित्र आहे.त्यातच कोरोना काळात सरकारने ऑनलाइन शिक्षणाचा फार्स घातला असताना,ग्रामीण भागातील विद्यार्थी भौतिक सुविधा अभावी त्या ऑनलाइन शिक्षणापासूनही वंचित राहिलाय. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यथोचित शिक्षण मिळून त्यांची गुणवत्ता वाढवी यासाठी कांबळे सरांनी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी रात्रीच्या वर्गाची सुरुवात केलीय.शहरी भागातील पालक आपला पाल्याची गुणवत्ता वाढवी यासाठी त्यास बक्कळ पैसे मोजून खासगी शाळेत प्रेवेश घेतात तर त्यातून तो श्रेष्ठ निवडावा यासाठी अतिरिक्त पैसे मोजत खासगी शिकवणी ही लावतात. पण अगोदरच कोरोना महामारी, अतिवृष्टी, अवकाळी, महागाई आणि हातचा गेलेला रोजगार यामुळे त्रस्त असणारा ग्रामीण भागातील शेतकरी, मोलमजुर,बिगारी व मागास पालक परिस्थिती अभावी आपल्या पल्याना भौतिक सुविधाही देऊ शकत नसल्याचे चित्र आहे. आणि अशा परिस्थितील मुलांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा यासाठी गेल्या चार ते पाच वर्षा पासून रात्रीच्या वर्गाचा स्तुत्य व प्रेरणादायी उपक्रम कांबळे गुरुजी घेत आहेत.


मालेगाव येथील मूळ रहिवाशी असणारे व सध्या नांदेड येथे वास्तव्यास असणारे शिवा कांबळे गुरुजी गेल्या 24 वर्षा पासून जिल्हा परिषद हायस्कुल मालेगाव येथे माध्यमिक शिक्षक म्हणून आपली सेवा बजावत आहेत .दरम्यान स्वतःला अर्धांगवायूने अधू केले असतानाही शिवा कांबळे  गुरुजी सकाळी नऊ ते 4 या दरम्यान शाळेत अध्यापन करून रात्री 7 ते 11 आणि सकाळी 4 ते 6 या वेळेत 10 वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना रात्रीच्या शाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन करतात.स्वतः कांबळे गुरुजींचा रात्रीचा मुक्काम हा शाळेतच असून आपला पूर्ण वेळ ते विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या तयारीसाठी देत आहेत.दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या तयारीसाठी सुरू होणारा हा रात्रीचा वर्ग संध्याकाळी 7  वाजता सुरू होतो.गावातील दहाव्या वर्गात शिकणारे तब्बल 47 मुलेमुली रात्री शिस्तबद्ध पद्धतीने येत आपली वर्गातील जागा राखीव करतात.संध्याकाळी 7 वाजता सुरू होणाऱ्या या वर्गात मराठी, हिंदी, गणित, इंग्रजी, विज्ञान या सर्व विषयांचे मार्गदर्शन कांबळे गुरुजी करतात, तर इंग्रजी,गणित, विज्ञान या विषयासाठी तज्ञ अतिथी शिक्षक बोलावुन विद्यार्थ्यांना यथोचित शिक्षण देतात.7 वाजता सुरू होणारा हा वर्ग 11 वाजता संपून मुली घराकडे परतता. तर स्वतः कांबळे सरांचा मुक्काम मात्र शाळेतच असतो. रात्रीचा वर्ग आटोपल्या नंतर गुरुजी घरून आणलेला आपला डब्बा उघडून जेवण आटोपतात व शाळेतील एका सतरंजीवर आपला बिछाना लावून त्याच ठिकाणी पहुडतात.


संध्याकाळी सुरू झालेला हा वर्ग पुन्हा सकाळी 4 वाजता  विद्यार्थ्यांनी गजबजून जातो.सकाळी 4 वाजता सुरू होणारा हा वर्ग सकाळी 6 वाजेपर्यंत चालतो.दरम्यान गेल्या चार वर्षा पासून शिवा कांबळे गुरुजींचा हा रात्रीच्या वर्गाचा स्तुत्य व प्रेरणादायी उपक्रम अविरत चालू आहे.या धावपळीच्या आणि धकाधकीच्या युगात प्रत्येक जण आपला वैयक्तिक एक मिनिट सुद्धा कोणी कुणास देण्यास तयार नाही.परंतु आपला वैयक्तिक वेळ देऊन कांबळे गुरुजी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून धडपड करत आहेत.विद्यार्थ्यांसाठी धडपडणाऱ्या या साने गुरुजींच्या स्वप्नातील खऱ्याखुऱ्या समाज शिक्षकाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 


महत्वाच्या बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha