Satara Crime News : एकतर्फी प्रेम प्रकरणातून सोळा वर्षीय महाविद्यालयीन युवतीची चाकूने वार करून ठार मारल्याची घटना साताऱ्यातील पिंपोडे बुद्रुक या गावात घडली आहे. संबंधित युवती अकरावी इयत्तेत शिक्षत होती. संबधित युवती रविवारी सकाळी खाजगी क्लासला जाण्यासाठी निघाली असताना पिंपोडे बुद्रुकच्या मुख्य चौकात आल्यानंतर आरोपी निखिल राजे कुंभार याने तिला रस्त्यात अडवले. निखिलने तिला मध्येच अडवत धारदार शस्त्राने तिच्या पोटावर वार केले. त्यानंतर उपस्थित लोकांनी त्या युवतीला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेले.


अधिक उपचारासाठी तिला साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर तिचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेनंतर आरोपी निखिल याने विषारी औषध पित थेट कोरेगाव पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर कोरेगाव पोलिसांची एक टीम घटनास्थळी गेली तर दुसरी टीम पोलीस जिल्हा शासकीय रुग्णालय, सातारा या ठिकाणी निखिलला उपचार घेऊन गेली. संबंधित आरोपी हा कायमच मुलींची छेडछाड करत असल्याचं तपासातून समोर आलं आहे. दरम्यान एकतर्फी प्रेम प्रकरणातून तो संबधित युवतीला कायम रस्त्यात अडवत होता, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. आरोपी निखिल याच्या वडिलांचा भंगारचा व्यवसाय असून त्याचे शिक्षणही झालेले नाही. संबंधित युवती ही आरोपीच्या घरा समोरून दररोज कॉलेजला आणि क्लासला जात होती. या घटनेची नोंद कोरेगाव पोलीस ठाण्यात झाली असून निखिलवर 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपोडे बुद्रुक या गावातील बाजार असल्यामुळे घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.


हे ही वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha