पुणे: राज्यातल्या साहित्य विश्वासाठी अत्यंत दु:खद बातमी आहे. ज्येष्ठ लेखक, कादंबरीकार अनंत उर्फ नंदा खरे (Veteran Marathi Writer Nanda Khare Passes Away) यांचे आज पुण्यात निधन झालं आहे. वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते दीर्घकाळापासून आजारी होते. नंदा खरे यांच्या निधनामुळे साहित्य विश्वामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 


अनंत खरे यांची ओळख नंदा खरे अशी होती. नंदा खरे याच नावाने ते साहित्य लेखन करायचे. अत्यंत अभ्यासपूर्ण लेखन करणारा साहित्यिक म्हणून नंदा खरे मराठी साहित्य विश्वात प्रसिद्ध होते. त्यांच्या अनेक कादंबऱ्या गाजल्या आहेत. नंदा खरे यांची 'अंताजींची बखर' ही कांदबरी गाजली होती. 


'उद्या' नावाच्या कादंबरीसाठी त्यांना 2020 सालचा साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला होता. पण तो त्यांनी नाकारला होता. मला समाजाने आतापर्यंत खूप काही दिलं असं म्हणत त्यांनी हा पुरस्कार नाकारला होता. अलिकडेच त्यांची 'नांगलल्यावीन भूई' ही कादंबरी प्रकाशित झाली होती.


नंदा खरे यांनी मुंबई आयआयटीमधून पदवी घेतली होती. त्यांनी अभियंता म्हणून कामही केलं आहे. नंदा खरे यांच्या निधनानंतर साहित्य विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेकांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. 


नंदा खरे यांचे साहित्य संपादन 
-वीसळे पन्नास, वारुळपुराण, कहाणी मानव प्राण्यांची पुस्तकं प्रकाशित.
-'अंताजीची बखर' हे विशेष गाजलेले पुस्तरक
-'नांगलल्यावीन भूई' ही त्यांची कादंबरी अनेकांना आकर्षित केली. 


महत्त्वाच्या बातम्या: