एक्स्प्लोर

विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच असेल, काँग्रेस बैठकीनंतर नाना पटोलेंचं वक्तव्य

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबईत येऊन काँग्रेसच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं. यूपीए आहेच कुठे? असा सवाल विचारत काँग्रेसची कोंडी केली.

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी  (Mamata Banerjee) मुंबईत आल्या आणि त्यांनी काँग्रेसला डिवचलं. त्यामुळे गेल्या काही दिवसात राज्यात शांत असलेली काँग्रेस पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. आता विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आग्रही आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबईत येऊन काँग्रेसच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं. यूपीए आहेच कुठे? असा सवाल विचारत काँग्रेसची कोंडी केली. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत हे सगळ घडल्यानंतर आता काँग्रेस आक्रमक होत आहे.  आता विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी काँग्रेस आक्रमक झाली आहे.

दहा महिन्यापूर्वी नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यापासून राज्यातील विधानसभेचे अध्यक्षपद रिक्त आहे. मधल्या काळात झालेल्या दोन अधिवेशनात हंगामी अध्यक्षांनी काम पाहिलं. अध्यक्षपदाची निवड तातडीने व्हावी यासाठी काँग्रेस सातत्याने मागणी करत आहे परंतु आतापर्यंत शिवसेना आणि राष्ट्रवादीने काँग्रेसच्या या मागणीकडे फारसं गांभीर्याने घेतलं नाही.  याच मुद्द्यावरून भाजपही काँग्रेसला चिमटा काढते. 

  • महाविकास आघाडीचे संख्याबळ

शिवसेना - 56
राष्ट्रवादी - 53
काँग्रेस - 43
तिन्ही पक्षांचे मिळून - 152

  • महाविकास आघाडीला पाठिंबा असलेले पक्ष

बहुजन विकास आघाडी - 3
समाजवादी पार्टी - 2
प्रहार जनशक्ती पार्टी - 2
माकप - 1
शेकाप - 1
स्वाभिमानी पक्ष - 1
क्रांतिकारी शेतकरी पार्टी - 1
अपक्ष - 8
एकूण - 171


विरोधकांकडे असलेले संख्याबळ

भाजप - 106
जनसुराज्य शक्ती - 1
राष्ट्रीय समाज पक्ष - 1
अपक्ष - 5
एकूण - 113

तटस्थ

महाराष्ट्र नवनिर्माण सेना - 1
एमआयएम - 2

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली तर महाविकास आघाडीकडे पुरेसं संख्याबळ आहे. पण या निवडणुकीत गुप्त मतदान झालं तर दगाफटका होऊ शकतो. त्यामुळेच ही निवडणूक आवाजी मतदानाने व्हावी यासाठी येत्या अधिवेशनात विधेयक मांडले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ममता बॅनर्जी यांचा काँग्रेसवरील राग, महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून मिळणारी काँग्रेसला दुय्यम वागणूक या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर असतो. त्यामुळेच आता आधी अध्यक्षपदाची निवडणूक घ्या आणि मगच पुढे जा असा आक्रमक सूर काँग्रेसन आळवलाय. आत्तापर्यंत दोन अधिवेशनात तरी काँग्रेसच्या या मागणीला मित्र पक्षांनी फारसं गांभीर्याने घेतलं नाही. आता किमान हिवाळी अधिवेशनात तरी अध्यक्षपदाची निवडणूक होते की पुन्हा एकदा काँग्रेसला गृहीत धरलं जातं हे पाहणे महत्त्वाचे आहे.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

संबंधित बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे
Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे
Maharashtra Rain updates: मोठी बातमी: हवामान खात्याकडून ऑगस्टमधील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, विदर्भ आणि मराठवाड्याची चिंता मिटणार?
मोठी बातमी: हवामान खात्याकडून ऑगस्टमधील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, विदर्भ आणि मराठवाड्याची चिंता मिटणार?
Dhananjay Munde : स्वर्गीय अजित दादांनी माझे जिवलग मित्र इंद्रनील नाईकांना मंत्री केलं, दोघंही मंत्री झालो असतो तर...; भर कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली खंत
स्वर्गीय अजितदादांनी माझे जिवलग मित्र इंद्रनील नाईकांना मंत्री केलं, दोघंही मंत्री झालो असतो तर...; भर कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली खंत
Maharashtra Rain: पावसाचा रौद्रावतार! विदर्भ मराठवाड्यासह निम्म्या महाराष्ट्राला अलर्ट, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, IMDचा राज्यासाठी महत्वाचा इशारा
पावसाचा रौद्रावतार! विदर्भ मराठवाड्यासह निम्म्या महाराष्ट्राला अलर्ट जारी, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, हवामान विभागाचा राज्यासाठी महत्वाचा इशारा

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे
Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
Maharashtra Rain updates: मोठी बातमी: हवामान खात्याकडून ऑगस्टमधील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, विदर्भ आणि मराठवाड्याची चिंता मिटणार?
मोठी बातमी: हवामान खात्याकडून ऑगस्टमधील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, विदर्भ आणि मराठवाड्याची चिंता मिटणार?
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
Embed widget