Nana Patole पुणेराज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) महाराष्ट्राचे वस्त्रहरण केलंय. अशी खोचक टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) केलीये. सचिन वाझेंनी (Sachin Vaze) केलेल्या आरोपानंतर पटोलेंनी थेट फडणवीसांना लक्ष केलं. फडणवीस आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचं हे नाट्य सुरुये, ज्याचा काही अंत नाही. विधानसभा निवडणुकीनंतर आमचं सरकार येईल, तेंव्हा आम्ही याचा निकाल लावू. असं म्हणत पटोलेंनी महायुतीला थेट इशाराच दिलाय. पिंपरी चिंचवड मध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.


निवडणुकांच्या तोंडावर वाट्टेल ते घोषणा अन् आश्वासने


महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीत ही जागांची अदलाबदल होऊ शकते, असे संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिलेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांची जागांची अदलाबदल करण्याची भूमिका नरमाईची वाटते का? असा प्रश्न विचारला असता आता ते अजित दादा आम्हाला पूर्वीसारखे दिसत नाहीत,अशी खिल्लीही पटोलेंनी उडवली. पुढची पाच वर्षे शेतकऱ्यांना वीज बिल मोफत करणार म्हणजे करणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या या वक्तव्याचा समाचार ही नाना पटोलेंनी घेतला. ऐन निवडणुकांच्या तोंडावर अशा घोषणा केल्या जात आहे. यात काहीही तथ्य नाही. निवडणुकांच्या अनुषंगाने वाट्टेल ते आश्वासने सरकार देत आहे. मात्र वाढती बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या यांचे वाढते प्रमाण इत्यादि बाबींवर हे सरकार का बोलत नाही? जे खातंच ज्यांच्याकडे नाही ते वाट्टेल त्या घोषणा करत सुटल्याचेही नाना पटोले म्हणाले. 


हे मोदींच्या सरकारचे अपयश- नाना पटोले   


देशातील प्रशासकीय यंत्रणेत गेल्या दहा वर्षात किती पूजा खेडकर आहेत, याचा शोध घ्यावा लागेल. असं म्हणत नाना पटोलेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष केलं. पूजा खेडकर हे सरकारच्या निद्रावस्थेचे उदाहरण आहे, आता तर ती अचानकपणे गायब झाली आहे. यूपीएससी सारख्या संस्थेतील हा गैरकारभार समोर आल्यानं देशाला मोठा धक्का बसलाय. हे मोदींच्या सरकारचे अपयश असल्याची टीकाही नाना पटोलेंनी केली.


देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचं डर्टी पॉलिटीक्स केलं


माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर काही आरोप केले होते. या आरोपांचे त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे होते. पण उत्तर देण्यासाठी फडणवीसांना तुरुंगातला प्रवक्ता लागतो, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचं डर्टी पॉलिटीक्स केलं असल्याचेही  राऊत म्हणाले.


गृहमंत्री म्हणून फडणवीस सध्या आरोपीच्या वक्तव्यावर टाळ्या वाजवत आहेत. स्वत:फडणवीस वकिल आहेत. महाराष्ट्र अशा राजकारणाचा तिसस्करा करत असल्याचे राऊत म्हणाले. फडणवीस हेच या राजकारणाचे सुत्रधार असल्याचे राऊत म्हणाले. कधीकाळी एकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीस आमच्या जवळचे होते. अमित शाह हे देखील जवळचे होते. पंतप्रधान मोदी हे देखील जवळचे होते. पण आज हे काय करतात ते महत्वाचे असल्याचे राऊत म्हणाले. 


हे ही वाचा