एक्स्प्लोर

पंकजा मुंडेंनी भगवानगडावरील महाप्रसादाचं ताट नाकारलं; महंत नामदेवशास्त्रींचं वक्तव्य

भगवानगडाचे मठाधिपती नामदेवशास्त्री यांनी नवनिर्वाचित आमदार धनंजय मुंडे यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. तर माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर त्यांनी भगवानगडावरील महाप्रसादाचं ताट नाकारल्याचं वक्तव्य केलं आहे.

नाशिक : पंकजा मुंडे यांनी भगवानगडावरील महाप्रसादाचं ताट नाकारलं, असा वक्तव्य भगवानगडाचे मठाधिपती नामदेवशास्त्री यांनी केलं आहे. आज नाशिक येथे नामदेवशास्त्री यांनी एबीपी माझाशी बातचीत केली. यावेळी नामदेवशास्त्री म्हणाले की, जे ताट पंकजा मुंडेंनी नाकारलं, ते त्यांचे चुलत बंधू धनंजय मुंडेंनी स्वीकारलं. नामदेवशास्त्री म्हणाले की, भगवानगडावरील महाप्रसादाचं ताट पूर्वी दिवंगत गोपीनाथ मुंडे स्वीकारत होते. त्यानंतर पंकजा मुंडे ते ताट स्वीकारत होत्या. परंतु आता तेच ताट त्यांनी नाकारलं. ते ताट धनंजय मुंडेंनी स्वीकारलं. कारण त्यांच्या रक्तातच भगवान बाबांची भक्ती आहे. नाकारलेला महाप्रसाद धनंजय मुंडेंना मिळाला. गेल्या काही वर्षात धनंजय मुंडेंनी अनेक अपमान पचवले आहेत. धनंजय मुंडे यांच्यात प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार या तिघांचे गुण आहेत. त्यामुळेच त्यांना राजकारणात यश मिळत आहे. दरम्यान, भगवान गडावर कोणत्याही प्रकारचे राजकीय भाषण होणार नाही, हे नामदेव शास्त्री यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. भगवानगडावरील दसरा मेळाव्याच्या वेळी राजकीय भाषणावरुन महंत नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यात जो वाद निर्माण झाला होता. त्यावर पडदा जरी पडला असला तरी सर्व काही अलबेल नसल्याचे चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. 'माझा'शी नामदेव शास्त्रींनी एकीकडे धनंजय मुंडेवर स्तुतीसुमनं उधळली, तर दुसऱ्या बाजूला पंकजा मुंडेंवर मात्र महाप्रसादाचं ताट नाकारल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी भगवान गडावर राजकीय कार्यक्रम (दसरा मेळाव्यातील भाषण) करण्यासाठी पंकजा मुंडे यांनी भगवानगडाचे मठाधिपती नामदेवशास्त्री यांच्याकडे परवानगी मागितली होती. परंतु नामदेव शास्त्रींनी परवानगी देण्यास नकार दिला. त्यावेळी पहिल्यांदाच नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे आमने सामने आले होते.

संबंधित बातम्या :

भगवान बाबांच्या जन्मभूमीत दसरा मेळावा, पंकजा मुंडे काय बोलणार? भगवान बाबांच्या कर्मभूमीत जमलं नाही ते आता जन्मभूमीत जमणार? मी येत आहे सीमोल्लंघनासाठी... पंकजांकडून दसरा मेळाव्याची अखेर घोषणा गडावर नव्हे, संत भगवान बाबांच्या जन्मभूमीवर दसरा मेळावा होणार? भगवानगड दसरा मेळाव्याला जिल्हा प्रशासनानेही परवानगी नाकारली! पहिली आणि शेवटची विनंती करते, पंकजांचं नामदेव शास्त्रींना पत्र

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

Embed widget