Nagpur University : डॉ. सुभाष चौधरी पुन्हा कुलगुरूपदी विराजमान; सलग दुसऱ्यांदा स्वीकारला कार्यभार
Nagpur University : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे बहुचर्चित कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी (Dr. Subhash Chaudhary) यांनी पुन्हा आपल्या कुलगुरू पदाचा दुसऱ्यांदा पदभार स्वीकारला आहे.
Nagpur University : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे (Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University) बहुचर्चित कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी (Dr. Subhash Chaudhary) यांनी पुन्हा आपल्या कुलगुरू पदाचा (Vice Chancellor) दुसऱ्यांदा पदभार स्वीकारला आहे. विद्यापीठातील कथित गैरव्यवहार प्रकरणी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्यावर अनेक आरोप करत त्यांची तक्रार राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांच्याकडे करण्यात आले होते. परिणामी या तक्रारींची दखल घेत राज्यपालांनी डॉ. चौधरी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.
मात्र, त्यानंतर डॉ. चौधरी यांनी या निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. तेव्हा न्यायालयाने राज्यपालांचा निर्णय रद्द केला आणि आणि डॉ. चौधरी यांना आपल्या कुलगुरू पदी कायम राहण्याचे आदेश दिले. या निर्णयानुसार काल, गुरुवारी ईद निमित्य शासकीय सुट्टी असतानाही जमनालाल बजाज प्रशाकीय भवन मध्ये डॉ. सुभाष चौधरी यांनी आपल्या कुलगुरू पदाचा पूर्ववत पदभार हाती घेतलाय.
सलग दुसऱ्यांदा स्वीकारला कार्यभार
नागपूर विद्यापीठातील कथित गैरव्यवहार प्रकरणी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्यावर अनेक आरोप करत शहरातील अनेक लोकप्रतिनिधींसह विद्यापीठातील विविध सदस्यांनी शासन आणि राज्यपालांकडे याबाबत तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर या प्रकरणातील तक्रारींच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या उच्च तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर यांच्या समितीने आपला अहवाल राज्यपालांना दिला होता. या अहवालात कुलगुरूंकडून अधिकारांचा दुरुपयोग झाल्याचे, शासनाचे ‘एमकेसीएल’ संदर्भात आदेश असताना त्याची अवहेलना करण्यात आल्याचे ताशेरे ओढण्यात आले होते. परिणामी, या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेता कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांची पदावरून हकालपट्टी करण्याचे निर्देश राज्यपालांनी दिले होते.
या कारवाई नंतर गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी नागपूर विद्यापीठाचा पदभार स्वीकारला होता. मात्र, दुसरीकडे डॉ. चौधरी यांनी तात्काळ या निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. तेव्हा न्यायालयाने राज्यपालांचा निर्णय रद्द केला आणि डॉ. चौधरी यांना पुन्हा आपल्या कुलगुरू पदी कायम राहण्याचे आदेश देत मोठा दिलासा दिला होता.
डॉ. सुभाष चौधरी पुन्हा कुलगुरूपदी विराजमान
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी राज्यपाल कार्यालयाला चार आठवड्यांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत आज शुक्रवार 12 एप्रिलला संपणार आहे. मात्र, अद्याप राज्यपाल कार्यालयाने सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिलेले नाही. तसेच, प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांचा कार्यकाळ बुधवारी संपुष्टात आलाय. परिणामी, आधी निलंबित केलेले कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी पुन्हा आपल्या कुलगुरुपदाची जबाबदारी काल स्वीकारलीय. विशेष म्हणजे काल ईद निमित्य शासकीय सुट्टी असतानाही जमनालाल बजाज प्रशाकीय भवन मध्ये डॉ. सुभाष चौधरी यांनी आपला पदभार हाती घेतलाय.
इतर महत्वाच्या बातम्या