एक्स्प्लोर
जगातील पहिला संपूर्ण ऑटोमॅटिक अॅक्वेरियम नागपुरात!
नागपूर : नागपुरात जगातील पहिला पूर्णपणे ऑटोमॅटिक अक्वेरियम बनवला आहे. तीन इंजिनियर तरुणांनी ह्याचे कपिराईट्स मिळवले आहेत. अगदी अॅक्वेरियमचे लाईट्स सुरु-बंद करुन वेगवेगळ्या लायटिंग बदल्यापासून तर पाणी शुद्ध करणे इत्यादी सर्व काही ऑटोमॅटिक होऊ शकणार आहे.
पाणी कोण साफ करेल, माशांना खायला कोण वेळेवर रोज घालेल आणि हे सर्व सोडून कुटुंबाने कधी सुट्टीवर जायचे ठरवले तर मग काय? असे प्रश्न अॅक्वेरियम घेताना अनेकांना पडतात. मात्र, जर असे अक्वेरियम मिळाले की जे सर्व हे काम स्वत:चे स्वत:च करतं, तर जी मंडळी या वेगवेगळ्या भीतीमुळे अॅक्वेरियम घेत नाही. त्यांचे काम सोपे होऊन जाईल. मात्र, आता हे सारं स्वप्नवत राहिलं नसून, जगातील पहिले ऑटोमॅटिक अॅक्वेरियम नागपूरच्या तीन तरुणांनी बनवले आहे.
भाऊ-बहीण असलेले प्रतीक आणि रितू मल्होत्रा आणि त्यांचा मित्र प्रतीक हरडे या तीन इंजिनियर तरुणांना ऑटोमॅटिक अॅक्वेरियम बनवलं आहे. व्हॉट्सअॅप वर आलेल्या एका व्हिडिओने या तिघांच्या डोक्याला चालना दिली. एक व्यक्ती घरी अॅक्वेरियम असल्याने सुट्टीसाठी कुठेही जाऊ शकत नाही, असा काहीसा तो व्हिडीओ होता.
गेली दीड वर्ष हे तिघेही तरुण अॅक्वेरियमच्या मॉडेलवर काम करत होते. अखेर त्यांचं संशोधन यशस्वी झालं असून त्यांना मोठं यश मिळालं आहे.
अॅक्वेरियममध्ये नवीन संशोधन काय?
- प्रत्येक कामासाठी सोयीची वेळ सेट करता येऊ शकते.
- सकाळ, संध्याकाळ आणि रात्री, अशा तिन्ही वेळा लाईट्स आपोआप बदलता येऊ शकतात
- ऑटोमॅटिक ऑक्सिजन सप्लाय
- अॅक्वेरियम स्वच्छ करण्यासाठी पाण्याची वेळही सेट करणं शक्य
- योग्य वेळी अन्न देणं शक्य
- 30 तासांचं बॅटरी बॅकअप असल्याने वीज गेल्यानंतरही अडचण नाही
- एक महिन्यापर्यंत वरील सर्व गोष्टी सेट करता येऊ शकतात
आपल्या घरांमध्ये जी पाणी शुद्धीकरण यंत्र असतं, अगदी तीच कार्बन क्लिनिंग थिअरी या अॅक्वेरियम मॉडेलसाठी वापरण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement