एक्स्प्लोर
Advertisement
कष्ट आणि जिद्द... रिक्षाचालक झाला 400 कोटींचा मालक!
अगदी हालाकिच्या परिस्थितीतून गगनभरारी घेतलेल्या अनेक यशाच्या कहाण्या आपल्या आजूबाजूला असतात. अशीच एक कहाणी आहे नागपूरमधील पियारे खान यांची...
नागपूर : अगदी हालाकिच्या परिस्थितीतून गगनभरारी घेतलेल्या अनेक यशाच्या कहाण्या आपल्या आजूबाजूला असतात. अशीच एक कहाणी आहे नागपूरमधील पियारे खान यांची...
पियारे खान यांनी आईचे दागिने विकत रिक्षा भाड्यानं घेतली आणि व्यवसायाला सुरुवात केली. प्रचंड जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आशमा कॅरियर्सच्या व्यवसायातून आज ते ४०० कोटींची उलाढाल करत आहेत. सध्या त्यांच्याकडे मर्सिडिज आणि १२५ ट्रेलर्स आहेत.
पियारे खान यांची स्टोरीही बरीच फिल्मी आहे. आईंचे दागिने विकून रिक्षा घेतली. वेळ आल्यावर कॅमेरामन, भाजीवाला, बसचालक मिळेल ते काम केलं, पण यश येईना. तरी धडपड सोडली नाही. नंतर त्यांनी ट्रॅव्हलिंग बिझनेस करायचं ठरवलं.
पियारेंना ट्रक खरेदीसाठी 11 लाखांचं कर्ज बँक अधिकारी रोशन बैस यांनी मिळवून दिलं. एकदा नाही तर अनेकदा. ज्याची जाण पियारेंनी ठेवली. २० वर्षाच्या बँकेच्या नोकरीनंतर हेच रोशन हे खान यांच्या कंपनीत फायनान्स हेड आहेत. इतकंच नाही आपल्या आईचं छोटं स्वप्नही त्यांनी जपलं आहे.
करोडपती असलेल्या पियारेंना पेट्रोल पंप उभारायचा होता. पेट्रोल पंपाच्या जागेसाठी दहावी पास असणं गरजेचं असतं. तेव्हा त्यांनी पैसे फेकून पंप न मिळवता अभ्यास केला. दहावी पास होऊन पेट्रोल पंपाची जागा मिळवली. आता बारावीनंतर ते बीएची तयारी करत आहेत.
त्यामुळे पियारे खान यांच्याकडून तरुणांनी प्रेरणा घेणं गरजेचं आहे. कष्ट आणि जिद्द याच्या जोरावर त्यांनी मारलेली मजल खरोखरच अनेकांना प्रेरणा देणारी आहे.
VIDEO :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
भारत
Advertisement