एक्स्प्लोर
कारचा टायर फुटला, माजी अतिरिक्त पोलिस अधीक्षकाचा मृत्यू

नागपूर : छत्तीसगडमधील निवृत्त अतिरिक्त पोलिस अधीक्षक आय एच खान यांचा नागपूरमध्ये कार अपघातात मृत्यू झाला. गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात झाला. आय एच खान रविवारी सकाळी मध्य प्रदेशच्या पेंच नॅशनल पार्कवरुन परतत होते. वाटेत पारशिवनीजवळ त्यांच्या एक्सयूव्ही गाडीचा टायर फुटला. त्यामुळे नियंत्रण सुटून कार पलटी झाली. यामध्ये कारचाही चक्काचूर झाला. या घटनेत आय एच खान गंभीर जखमी झाले.
दरम्यान आय एच खान यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिथे त्यांना मृत घोषित केलं. त्यांच्यावर आज राजपूरमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. आय एच खान यांनी रायपूरमध्ये अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून काम केलं. रायपूर ग्रामीणचे एएसपी म्हणूनही त्यांनी जबाबदार पार पाडली होती.
दरम्यान आय एच खान यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिथे त्यांना मृत घोषित केलं. त्यांच्यावर आज राजपूरमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. आय एच खान यांनी रायपूरमध्ये अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून काम केलं. रायपूर ग्रामीणचे एएसपी म्हणूनही त्यांनी जबाबदार पार पाडली होती. आणखी वाचा























