एक्स्प्लोर
नागपुरात तेलाच्या टाकीत पडून एका मजुराचा मृत्यू, दोघे अत्यवस्थ
टाकीत बुडल्यामुळे त्यांच्या फुफ्फुसात तेल गेलं. त्यामुळे त्यांच्या मेंदूला काही काळ ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला होता, असं डॉक्टरांनी सांगितलं.

नागपूर : जमिनीखाली असलेल्या दहा हजार लिटर क्षमतेच्या तेलाच्या टाकीत बुडून एका मजुराचा मृत्यू झाला तर दोन जण सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत. नागपूरच्या कामठी रोड इथल्या नागलोक परिसरात ही घटना घडली आहे गोवर्धन गॅस नावाच्या पेट्रोल केमिकल युनिटमधील आज दुपारची घटना आहे. हे तीन मजूर जमिनीखाली असलेली तेलाची टाकी साफ करण्यासाठी उतरवलं होतं. दहा हजार लिटर क्षमतेच्या टाकीत अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करावं लागलं. अत्यंत नाजूक अवस्थेत या मजुरांना बाहेर काढून तातडीने जवळच्याच एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. रुग्णालयात पोहोचल्यावर एकाला मृत घोषित केलं. तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. टाकीत बुडल्यामुळे त्यांच्या फुफ्फुसात तेल गेलं. त्यामुळे त्यांच्या मेंदूला काही काळ ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला होता, असं डॉक्टरांनी सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे हे मजूर नवे असून आजच कामावर रुजू झाले होते. विषारी वायू साचलेल्या टाकीत त्यांना उतरवल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
- तेलाच्या टाकीत मजुरांनाउतरवताना आधी किती गॅस आहे ह्याचा तपास झाला होता का?
- पहिल्याच दिवशी आलेल्या मजुरांना एवढ्या जोखिमीच्या कामासाठी का उतरवले?
- असे मजुरांचे जीव इथे किती वेळा धोक्यात टाकले जातात?
- मजुरांना कुठल्याही बचाव यंत्रणेशिवाय कसं उतरवलं?
आणखी वाचा























