Naxal Movement In India:  माओवादी चळवळीच्या इतिहास पहिल्यांदाच नक्षलवादी ( Naxalite) सुरक्षा यंत्रेणेपुढे हतबल झाले आहेत. श्रीलंकेतील लिट्टे नक्षलवाद्यांसारखंच आपलाही भारतीय सुरक्षा यंत्रणा खात्मा करेल अशी भिती आता नक्षलवाद्यांना सतावत असल्याचं मओवाद्यांच्या केंद्रीय नेतृत्वाने सांगितलं आहे. त्याच अनुषंगाने सुरक्षा यंत्रणांनी तयारी देखील सुरु केली आहे. त्यामुळे आता नक्षलवाद्यांना चांगलीच जरब बसणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे. त्याचप्रमाणे नक्षवाद्यांचं देखील धाबं चांगलचं दणाणलं असल्याचं सांगण्यात येत आहे. 


गेल्या सत्तर वर्षांमध्ये पहिल्यांदाच माओवादीची केंद्रीय समिती ही भारतीय सुरक्षा यंत्रेणेपुढे हतबल होताना दिलस आहे. तसेच आपल्याला लक्ष्य करत संपवून टाकण्याची भिती आता मओवाद्यांना वाटायला लागली आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांना टॉप कमांडरसाठी अनेक सूचना मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. टॉप कमांडरनी आधुनिक उपकरणांचा वापर न करता ह्युमन इंटेलीजन्सवर भर द्यावा, तसेच घनदाट जंगलात  टेक्निकल इंटेलिजन्सचा वापर न करता काम करावे अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. 


मागील काही वर्षांमध्ये भारतीय सुरक्षा यंत्रेणेने जवळपास पन्नासच्या वर माओवाद्यांच्या टॉप कमांडरला संपवले आहे. त्यामुळे नक्षल सप्ताहच्या पार्श्वभूमीवर माओवाद्यांनी प्रचाराची काही आखणी केली आहे. त्यामध्ये माओवाद्यांची ही भिती मात्र लपून राहिली नाही. त्यामुळे आता नक्षलवाद्यांच्या हालाचालींवर सुरक्षा यंत्रेणेने चांगल्याच प्रकारे नियंत्रण मिळवलं असल्याचं सांगण्यात येत आहे. पण सुरक्ष यंत्रेणेना उत्तर देण्यासाठी आणि त्यांच्या कॅडरला धीर देण्यासाठी माओवाद्यांकडून अनेक प्रकारच्या हालचाली करण्यात येत आहे. 


आता माओवाद्यांकडून एमएमसी झोनमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी माओवाद्यांकडून तीन फ्रंट तयार केले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील गोंदिया आणि गडचिरोलीचा काही भाग येत आहे. दरम्यान माओवादी वापरत असलेल्या आधुनिक उपकरणांमुळे सुरक्षा यंत्रणांना तपासासाठी मदत होत आहे. त्यामुळे आधुनिक उपकरणांचा वापर न करण्याच्या सूचना माओवाद्यांकडून देण्यात आल्या आहेत. तसेच यामुळे टॉप कमांडरची माहितीही सुरक्षा यंत्रणांना सहज उपलब्ध होते. त्यामुळे टॉप कमांडरने यापासून दूर राहण्याचा सल्ला माओवाद्यांकडून टॉप कमांडरकडून देण्यात आला आहे. 


हे भारतीय सुरक्षा यंत्रणांचं यश आहे की त्यांच्यामुळे इतिहासात पहिल्यांचा माओवादी हतबल झाले आहेत. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांच्या या यशाचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. यामुळे आता माओवाद्यांनी देखील एक पाऊल मागे टाकल्याचं सांगण्यात येत आहे. 


हे ही वाचा : 


Nitin Gadkari Threat Call : गडकरी धमकी प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवता येणार नाही, नागपूर कोर्टाकडून याचिका निकाली