Nitin Gadkari Threat Call : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) धमकी प्रकरणाचा संपूर्ण तपास मागणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएची (NIA) याचिका नागपूरच्या विशेष न्यायालयाने (Nagpur Court) निकाली काढली आहे. गडकरी धमकी प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवता येणार नाही, असं मत न्यायालयाने नोंदवलं आहे. धमकीच्या दोन्ही प्रकरणी नागपूर पोलिसांनी (Naधंतोली पोलीस स्टेशनमध्ये यूएपीए कायद्याअंतर्गत आधीच गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे त्या प्रकरणाचा तपास नागपूर पोलिसांनी करावा. एनआयए ला तपास करायचा असल्यास त्यांनी तपास करून चार्जशीट नागपूरच्या न्यायालयात दाखल करावी, असंही न्यायालयाने म्हटलं आहे. 


नागपूरच्या धंतोली पोलीस स्टेशनमध्ये दोन गुन्हे दाखल होते मग एनआयए मुंबईत तिसरा गुन्हा का नोंदवला अशी विचारणाही न्यायालयाने केली आहे. तरीही एनआयएला दोन्ही प्रकरणाचा तपास आपल्याकडे हवा असेल तर त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करावा, असंही न्यायालयाने नमूद केलं आहे.


याचिकेत एनआयएने काय म्हटलं होतं?


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी आणि खंडणी प्रकरणाचा तपास संपूर्णपणे एनआयएकडे द्यावा, अशी मागणी करणारी याचिका एनआयएने केली होती. गडकरी यांच्या कार्यालयात धमकी देऊन खंडणी मागितल्याच्या प्रकरणाचा तपास आणि दोन्ही आरोपी सोपवण्यासाठी एनआयएने नागपूरच्या विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. न्यायाधीश सुट्टीवर असल्याने काल सुनावणी झाली नाही. एनआयएला हे प्रकरण त्यांच्या तपासासाठी हवे आहे, शिवाय प्रकरणातील सर्व आरोपी, कागदपत्रेही त्यांना हवी आहेत. नागपुरात (यूएपीए कायद्यांतर्गत) दाखल असलेले दोन्ही प्रकरण मुंबईत स्पेशल कोर्टात हस्तांतरीत करुन घ्यायचे आहे, त्यासाठी ही याचिका करण्यात आली होती.


NIA, IB, ATS कडून अफसर पाशाची सहा तास चौकशी


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयातील धमकी प्रकरणात लष्कर ए तोयबाचा कुख्यात दहशतवादी अफसर पाशाची सोमवारी (17 जुलै) एनआयए, आयबी आणि एटीएसच्या अधिकाऱ्यांनी तब्बल सहा तास चौकशी केली. अफसर पाशा 2003 च्या सुमारास एकापेक्षा जास्त वेळेला नागपुरात आला होता आणि काही दिवस वास्तव्यास होता अशी माहिती मिळाल्यानंतर अफसर पाशा तेव्हा नागपुरात कुठे आणि कोणत्या उद्देशाने राहिला होता, याची चौकशी एजन्सी करत आहेत. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे अफसर पाशाने तेव्हाच्या त्याच्या नागपुरातील वास्तव्यासंदर्भात फारशी माहिती देण्यास नकार दिला. दरम्यान सहा तासाच्या कसून चौकशीनंतर अफसर पाशाला छातीत दुखायला लागल्यामुळे आणि अस्वस्थ वाटत असल्यामुळे नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात चेकअपसाठी नेण्यात आलं.


हेही वाचा


Nitin Gadkari Threat Calls : नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या शाकीरचे संबंध काश्मिरी दहशतवाद्याशी