- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Live Updates: हेरगिरी प्रकरणात महत्त्वाची अपडेट, रवी वर्माला अडकवण्यासाठी सिमकार्डचा वापर
Maharashtra Live Blog: राज्यातील आणि देशातील ताज्या घडामोडी, बातम्या आणि अपडेट्स पाहण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्रातील हवामान आणि पावसाची स्थिती काय, जाणून घेण्यासाठी क्लिक करा.
पार्श्वभूमी
Maharashtra Live blog Updates in Marathi: पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय अंतर्गत काम करणाऱ्या पाकिस्तान इंटेलिजेंस ऑपरेटिव्ह (PIO) च्या महिला एजंट्सनी आरोपी रवी वर्माला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी भारतीय सिमकार्डचा वापर केला...More
वाशिम
वाशिम खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर प्रमाणित बियाणे मोफत देण्याची योजना राबवत आहे. मात्र वाशिम तालुक्यातील इन्नानी कृषी सेवा केंद्रावर यायोजनेतील बीज वाटप प्रक्रियेमध्ये अनियमितता आणि सरळसरळ आर्थिक लुट होत असल्याचे शेतकऱ्यांनी आरोप केलाय
४० किलो बियाणे मोफत असतांना ४४ किलोच्या पिशव्या देण्यात आल्या. या अतिरिक्त ४ किलो बियाण्यासाठी दर किलोमागे ९० रुपयांप्रमाणे पैसे वसूल करण्यात येतंय. शासनाने बियाण्याचा अधिकतम दर ७० रुपये किलो
केला असताना, या सेवा केंद्रावर ९० रुपयांना विक्री होत असल्याने शेतकऱ्यांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
जालना जिल्ह्यातील ऊसउत्पादक संघर्ष समिती आक्रमक, आंदोलनाचा इशारा.
जालन्यातील समर्थ आणि सागर आणि समृद्धी साखर कारखान्याकडून सभासद आणि शेतकऱ्यांची पिळवणूक, _संघर्ष समिती.
किमान आधारभूत किमतीच्या 200 रुपये अधिक भाव देण्याची मागणी..
अँकर _जालना जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने रस्त्यावरील आंदोलनाचा इशारा दिलाय,अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील समर्थ, सागर आणि समृद्धी या साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदांची आर्थिक पिवळणूक होत असल्याचा आरोप करत ऊस उत्पादक संघर्ष समितीने हा इशारा दिलाय.
शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे तीन टप्प्यांत न देता, एकरकमी आणि किमान आधारभूत दरापेक्षा २०० रुपये अधिक दराने देण्यात यावेत अशी प्रमुख मागणी या संघर्ष समितीने केली आहे.
दरम्यान तालुक्यातील ही कारखाने राजकीय नैराशातून शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत टाकत आहेत. या संदर्भात प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्याकडे निवेदनही सादर केलं असून
मागण्या मान्य न झाल्यास, संघर्ष समितीने थेट रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय.
V/O - ते कसले ऑपरेशन टायगर .. ते तर ऑपरेशन पेंग्विन .. टायगर आणि उद्धव ठाकरेंचा काडीचाही संबंध नाही याला ऑपरेशन पेंग्विन हेच नाव योग्य असा टोला आज नामदार नितेश राणे यांनी लगावला. सांगोला येथील महात्मा बसवेश्वर महाराज सभागृहाच्या भूमिपूजनासाठी आले असता नामदार नितेश राणे बोलत होते. उद्धव ठाकरे गटाचे सात खासदार एकनाथ शिंदे यांच्या पक्षात येणार असल्याच्या ऑपरेशन टायगर बद्दल छेडले असता त्यांनी ही शेरेबाजी केली .
सिंहगडाप्रमाणे सर्वच छत्रपतींच्या किल्ल्यांवरील जिहाद जमीनदोस्त केला जाईल असे सांगताना हे देवा भाऊचे सरकार आहे कोणाला न करता बुलडोझर साफ करून जाईल व किल्ले जिहाद मुक्त होतील असा टोला लगावला . राज व उद्धव एकत्र येत असल्याच्या बाबत विचारले असता कुटुंब एक येत आहे याचे आपल्यालाही आनंदच आहे असे सांगितले.
सांगोला शहरातही मोठ्या प्रमाणात लँड जिहाद आणि लव जिहाद सुरू असून हे खपवून घेतले जाणार नाही असा इशारा दिला. यावेळी बोलताना राणी यांची जीभ घसरली. प्यारे खान यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना मोरोपोसारखा मुस्लिम देशही आज बकरी ईदला बकरी न कापण्याचा निर्णय घेतो मग दहा टक्के लोकसंख्या असलेल्या भारतात बकरी ईदला बकरी कापण्याऐवजी वर्चुअल बकरी ईद करा म्हणणे काय चुकीचे असा सवाल केला.
ठाण्याजवळ एका गावाला आयसिस च्या ताब्यात दिल्याचे उघड झाल्यानंतर आता सर्वांनी जागृत राहण्याची गरज असल्याचे राणे यांनी सांगितले.
कोल्हापूर
पुण्याच्या हगवणे प्रकरणानंतरही कोल्हापुरात हुंड्यासाठी गर्भवती महिलेच्या छळाचं धक्कादायक प्रकरण उघडकीला
हुंड्यासाठी आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ
कोल्हापूरच्या वरणगे पाडळीतील घटना
माहेरून दहा लाख रुपये आण नाहीतर पोटावर लाथ मारून ठार मारण्याची नवऱ्याने दिली धमकी
पती रोहित दुधाने याच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
रोहित दुधाने हा एसटी कर्मचारी
काही दिवसापूर्वी रोहित दुधानेचे अनैतिक संबंध नातेवाईकांकडून झाले होते उघड
एक संबंध उघड होताच रोहित दुधाने याने नातेवाईक महिलेवर केला होता जीवघेणा हल्ला
सोलापूर ब्रेकिंग
--
शिवसेना शिंदे गटात प्रवेशाआधी काँग्रेसचे माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे एबीपी माझावर
गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेससोबत असलेले सिद्धाराम म्हेत्रे आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत करणार प्रवेश
‘शिवसेना हाच खऱ्या अर्थ्याने सेक्युलर पक्ष, त्यामुळे इथे काम करताना मला कोणीतीही अडचण नाही’
‘कार्यकर्त्यांचा आग्रह होता एकनाथ शिंदे साहेबांसोबत गेले पाहिजे’
‘सचिन कल्याणशेट्टी हे मित्र पक्षाचे नेते आहेत त्यामुळे त्यांच्यासोबत देखील मी जुळवून घेईन’
‘या कार्यक्रमाचे नियोजन हे शिवसेनेने केले आहे, सेनेचं कार्यक्रम आहे त्यात मी प्रवेश करणार आहे’
‘त्यामुळे सचिन कल्याणशेट्टी यांना निमंत्रण दिलं की नाही या बाबतीत मला कल्पना नाही’
माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम न्हेत्रे यांची एबीपी माझाला प्रतिक्रिया
tic : सिद्धाराम म्हेत्रे, माजी गृहराज्यमंत्री
अँकर - मुस्लिम तरुणाने नाव बदलून प्रेमाच्या जाळ्यात ओढत नोकरीच्या बहाण्याने दिल्लीतील हिंदू तरुणीला नाशिकला आणून अत्याचार केला. राजू नाव सांगून मोहम्मद उजैर आलम (३७) याने तरुणीला २०१३ मध्ये नाशिकला आणले. श्रमिकनगरमध्ये दोघे राहत होते. मी अनाथ असून माझे कोणी नाही, मी कोणत्या धर्माचा आहे, हेही माहित नसल्याचे सांगून त्याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्या इच्छेविरुध्द शारिरीक सबंध ठेवले. यातून २०१६ मध्ये ती गर्भवती झाल्यानंतर तीला तो मुस्लिम असल्याचे व त्याला भाऊ, आई असल्याचे समजले. मात्र आता आपण घरी परत जाऊ शकत नसल्यामुळे तिने मुकाट्याने त्याच्या सोबत राहून अन्याय अत्याचार सहन केला. दरम्यानच्या काळात तिने एका मुलीलाही जन्म दिला. युवकाच्या धर्माची ओळख पटल्यानंतर त्याने युवतीला हिंदू धर्माप्रमाणे घरात पूजा करण्यास विरोध केला. तसेच बाहेर जाताना बुरखा घालण्यास सांगून युवतीला मारझोड करून घरातून काढून देण्याची धमकी द्यायचा. दरम्यान, हिंदू मुलीवर मुस्लिम युवकाकडून अन्याय अत्याचार केला जात असल्याची माहिती परिसरातील युवकांना समजल्यानंतर त्यांनी युवतीला धीर देत सातपूर पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी युवतीच्या फिर्यादीवरून मुस्लिम युवकाविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
अँकर - धर्मांतर कर, नाही तर तुझ्यासह मुलांना जीवे मारेल, असे धमकावत पतीने पत्नीचा छळ केला. तसेच आई-वडिलांची प्रॉपर्टी नावावर करण्याचा तगादा लावून कुटुंबियांना ठार मारण्याची धमकीही दिल्याची तक्रार विवाहितेने दिली. पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताने चांगली वागणूक देत असल्याचे भासवून तिच्याशी लग्न केले. त्यानंतर संशयित पती व तिच्या सासरच्या व्यक्तींनी विवाहितेच्या वडिलांकडून वेळोवेळी असे एकूण ६ लाख रुपये घेतले. फिर्यादी पहिल्यांदा गरोदर राहिल्यावर त्यांना मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी आरोपींनी जबरदस्ती करून अत्याचार केले. प्रसूतीनंतर विवाहितेने मुलीचे हिंदू नाव ठेवले, तसेच धर्मातरास प्रतिसाद न दिल्याने तिच्या पतीने सारडा सर्कल येथे तिचा रस्ता अडवून चॉपर दाखवून आई-वडिलांची प्रॉपर्टी नावावर करून देण्यास, धर्मांतर करण्यास सांगत ऐकले नाही, तर जिवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतरही विवाहितेने धर्मांतरास नकार दिला. याचा राग आल्याने पतीने विवाहितेस दुसऱ्या वेळी गरोदर असताना मारहाण करून जमिनीवर पाडले व गळा दाबून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, तसेच देवदेवतांचा अवमान करून घरातील फोटो बाहेर फेकले. २०१९ ते दि. ३ जून २०२५ या कालावधीदरम्यान संशयिताने विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिच्याकडील पैसेही उकळल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अविनाश जाधव पॉईंटर
उद्धव ठाकरे साहेबांनी राज साहेबांना कॉल करावा
आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र आणि मराठी माणसाचे हित महत्त्वाच्या आहे असे म्हणणारे राज ठाकरे हे पहिले नेते होते, राज ठाकरेंनी पहिली सुरुवात केली
आम्ही एक पाऊल पुढं टाकलं आहे आता उद्धव ठाकरेंनी एक कॉल राज ठाकरेंना करावा ..
उद्धव ठाकरेंकडे राज ठाकरेंचा नंबर आहे त्यांनी कॉल करावा प्रस्ताव द्यावा आम्ही तयार आहोत
आम्ही एक पाऊल पुढे टाकलं तुम्ही तुमचं एक पाऊल पुढे टाका, रोज सकाळी येऊन मीडियावर बोलण्यापेक्षा ते प्रत्यक्षात उतरवा
2014 आणि 2017 चा आमचा अनुभव वाईट आहे.. उद्धव ठाकरेंनी आमचे फसवणूक झाली असे सांगत एकत्र येऊ असे बोलले त्यानंतर राज ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद देत एबी फॉर्म वाटण बंद केलं होतं मात्र त्यानंतर उद्धव ठाकरे व त्यांच्या नेत्यांनी फोन उचलनच बंद केलं.
उद्धव ठाकरे राज ठाकरेंना कॉल करावा
अविनाश जाधव पॉईंटर
उद्धव ठाकरे साहेबांनी राज साहेबांना कॉल करावा
आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र आणि मराठी माणसाचे हित महत्त्वाच्या आहे असे म्हणणारे राज ठाकरे हे पहिले नेते होते, राज ठाकरेंनी पहिली सुरुवात केली
आम्ही एक पाऊल पुढं टाकलं आहे आता उद्धव ठाकरेंनी एक कॉल राज ठाकरेंना करावा ..
उद्धव ठाकरेंकडे राज ठाकरेंचा नंबर आहे त्यांनी कॉल करावा प्रस्ताव द्यावा आम्ही तयार आहोत
आम्ही एक पाऊल पुढे टाकलं तुम्ही तुमचं एक पाऊल पुढे टाका, रोज सकाळी येऊन मीडियावर बोलण्यापेक्षा ते प्रत्यक्षात उतरवा
2014 आणि 2017 चा आमचा अनुभव वाईट आहे.. उद्धव ठाकरेंनी आमचे फसवणूक झाली असे सांगत एकत्र येऊ असे बोलले त्यानंतर राज ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद देत एबी फॉर्म वाटण बंद केलं होतं मात्र त्यानंतर उद्धव ठाकरे व त्यांच्या नेत्यांनी फोन उचलनच बंद केलं.
उद्धव ठाकरे राज ठाकरेंना कॉल करावा
रायगड : सध्या रायगडमध्ये शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीत शाब्दिक चकमक सुरू आहे. सुनील तटकरे यांनी मंत्री भरत गोगावले यांच्या नॅपकिनची केलेली नक्कल पासून सुरू झालेली ही लढाई आता दोन्ही पक्षाच्या टोकापर्यंत पोहचली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांनी काल आमदार महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांच्यावर घणाघात टीका केली. महेंद्र दळवी हे सुनील तटकरे यांच्यामुळे निवडून आले आहेत, अशी टीका केली होती. त्या टीकेला उत्तर देत आज शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख राजा केनी यांनी मधुकर पाटील यांची पोलखोल करत सुनील तटकरे हेच आमदार महेंद्र दळवी यांच्यामुळे निवडून आले आहेत, असा टोला लगावलाय.
- नाशिकमध्ये भाजपच्या विभागीय कार्यशाळेला सुरुवात...
- भाजपच्या कार्यशाळा सुरू झाल्यानंतर हॉलचे शेटर केले बंद...
- भाजपच्या कार्यशाळेत भाजप नेते पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देणार याकडे सर्वांचे लक्ष...
- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची महत्त्वपूर्ण विभागीय कार्यशाळा...
कोकाकोला कंपनीच्या विरोधात स्थानिक पुन्हा आक्रमक.
असगणी गावातील हजारो नागरिकांचा कंपनीच्या विरोधात मूक मोर्चा काढून निषेध.
नोकऱ्या आणि लघु व्यवसायात स्थानिकांवर अन्याय होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आश्वासन देऊन स्थानिकांकडे दुर्लक्ष केलं : स्थानिक
कंपनीने दुर्लक्ष केल्यास उग्र आंदोलन करून रस्त्यावर येण्याचा स्थानिकांचा इशारा.
जमिनी घेऊन आम्हाला भूमिहीन केलं....कंपनीने आम्हाला फसवलं - ग्रामस्थांचा आरोप.
कल्याण : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कल्याण डोंबिवली महापालिका एमएमआरडीए आणि विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून कल्याण पश्चिमेकडून हंबर्डे अमृत वन या ठिकाणी विविध प्रजातीच्या तीन हजार झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी सांगितले की, "वृक्षारोपणसाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे ."एक विद्यार्थी एक वृक्ष"संकल्पनेच्या माध्यमातून लोकचळवळ सुरू करण्यात येणार आहे. समाजातील प्रत्येक घटकाने या वृक्षारोपणाच्या चळवळीत सहभाग घ्यावा. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात प्रत्येक महिन्यात असे कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पर्यावरण संवर्धनासाठी प्लास्टिक मुक्ती हे अभियान राबवण्यात येणार आहे. प्लास्टिक मुक्तीसाठी प्लास्टिकचा कमीत कमी वापर करण्यासाठी नागरिकांमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. लोकांनी प्रदूषण टाळण्यासाठी वाहनांचा कमीत कमी वापर करावा, सौर ऊर्जेचा वापर करावा, विजेची बचत करावी असे आवाहन देखील आयुक्त गोयल यांनी केले.
किल्ले रायगडावर उद्याच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झालं आहे. आजपासून रायगड जिल्ह्यातील चार महत्त्वपूर्ण राष्ट्रीय तसेच राज्य मार्गावरील जड आणि अवजड वाहतूक बंद राहणार आहे. रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी याबाबतची माहिती दिली आहे. उद्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा किल्ले रायगडावर तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा पार पडतोय, या शिवराज्याभिषेक सोहळ्याकरिता आजपासून रायगड जिल्ह्यातील चार महत्वाच्या मार्गावर जड आणि अवजड वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे आजपासून उद्या संध्याकाळी 4 पर्यंत जड आणि अवजड वाहनांना बंदी असणार आहे. आजपासून किल्ले रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांना कोणतीही वाहतूक कोंडी अथवा अन्य अडथळा निर्माण होऊ नये याकरिता जिल्हा प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
शिवसेना उबाठा पक्षा कडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धडक देत महाविद्यालयाची सध्याची स्थितीचा आढावा घेतला. यावेळी महाविद्यालयाची वाताहत होत असून याला सत्ताधारी जबाबदार असल्याचं वैभव नाईक यांनी म्हटलं आहे. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे कुरण बनल्याचा आरोप देखील केला. कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार लाटला जात असल्याचा देखील आरोप वैभव नाईक यांनी केला आहे. आरोग्याच्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे शासन आणि प्रशासन गांभीर्याने घेत नाही, त्यामुळे या सर्व विषयांसंदर्भात २० जून पर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांना सिंधुदुर्गात बोलावून बैठक लावा अन्यथा २१ जून रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोर ठिय्या मांडून आंदोलन छेडू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता अनंत दवंगे यांना दिला आहे.
शिवसेना उबाठा पक्षा कडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धडक देत महाविद्यालयाची सध्याची स्थितीचा आढावा घेतला. यावेळी महाविद्यालयाची वाताहत होत असून याला सत्ताधारी जबाबदार असल्याचं वैभव नाईक यांनी म्हटलं आहे. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे कुरण बनल्याचा आरोप देखील केला. कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार लाटला जात असल्याचा देखील आरोप वैभव नाईक यांनी केला आहे. आरोग्याच्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे शासन आणि प्रशासन गांभीर्याने घेत नाही, त्यामुळे या सर्व विषयांसंदर्भात २० जून पर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांना सिंधुदुर्गात बोलावून बैठक लावा अन्यथा २१ जून रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोर ठिय्या मांडून आंदोलन छेडू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता अनंत दवंगे यांना दिला आहे.
मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिमेत विना दलवाई इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये मोठी आग लागल्याची घटना घडली आहे, सकाळी पावणे आकराच्या सुमारास ही मोठी आग लागली, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा चार ते पाच गाड्या घटना स्थळी दाखल झाल्या. आग विझविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. इमारतीमध्ये मोठ्या संख्येने लोक होते या सर्वांना बाहेर काढण्याचा काम देखील अग्निशमन दलाचा जवान आणि पोलिसांकडून केली जात आहे.
बीड मधील मारहाणीच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीयेत. अगदी क्षुल्लक कारणावरून काल (बुधवारी) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शहरातील गजबजलेल्या साठे चौक परिसरात दोन गटात हारामारी झाली. ज्यात दोघांवर कोयत्याने वार करण्यात आले. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आला आहे. आठ वाजण्याच्या सुमारास एक पिकअप चालक आणि बुलेटस्वार या दोन गटात हॉर्न वाजवण्याच्या शुल्लक कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. जवळच नारळ विक्री करणाऱ्या स्टॉलवरील कोयता आणि चाकू घेऊन यातील एका गटाने दोघांवर गंभीर वार केले. जखमींवर सध्या जिल्हा आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेची गंभीरता दर्शवणारा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. याच आधारे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यात रात्री पब सुरू राहिल्यास आता थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर कारवाई होणार असल्याचा इशारा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. पबवरदेखील कठोर कारवाई केली जाणार आहे. पुण्यातील पब रात्री उशिरापर्यंत सूरू राहत असल्याचा प्रकार समोर आला होता. पोर्शे प्रकरणानंतर पबबाबत कठोर पावल उचलल्यानंतरही पब सुरु राहत असल्याची माहिती आयुक्तांना मिळत होती त्यामुळे आता आयुक्तांनी थेट जबाबदारी निश्चित केली आहे आणि पब सुरु राहिल्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला जबाबदार ठरवण्यात येणार आहे. शिस्तभंगाची कारवाई देखील करणार असल्याचं सांगितल आहे. पबवर देखील कठोर कारवाई करा, अशा कडक शब्दात आयुक्तांनी पोलीस निरीक्षकांना सूचना केल्या आहेत.
आम्ही बोलून काही फरक पडणार नाही. दोन्ही भाऊ एकत्र आले तर मला काही प्रॉब्लेम नाही. मात्र त्याची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा. दोघांकडे एकमेकांचा नंबर आहे. जे सकाळी उठून बोलतात ते कोणाला फसवतात. दोन भावांनी एकत्र यावे हे त्यांनी ठरवावे. राज ठाकरे यांची इच्छा असेल ती माझी इच्छा आहे. पुढाकार कोणी घ्यावा मी घेऊ शकत नाही, असं वक्तव्य मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चांवर अमित ठाकरेंनी केलं आहे.
मुलीची छेड काढणार्या तरुणांना जाब विचारायला गेलेल्या वडिलावर कोयत्याने वार करण्यात आले. या हल्ल्यात वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील कडूस गावच्या हद्दीत रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. संतोष बबन ढमाले यांचा या घटनेत मृत्यू झाला. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यामध्ये किरण शिवाजी खंडागळे, प्रणय प्रमोद नवले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपींविरुद्ध कठोर कारवाईचे संकेत दिले असून, परिसरात तणावाचे वातावरण आहे. पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.
राज्यातील सर्व महामार्गावरील धाबे, हॉटेल, मॉल या ठिकाणांवर स्वच्छता ठेवा अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या आहेत. महामार्गावरील सार्वजनिक शौचालये स्वच्छ आणि सुस्थितीत ठेवा. स्वच्छतेची जबाबदारी सर्वच विभागांची असून दक्ष राहा. महिला शौचालयासंदर्भात बैठक घेत सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसलेंनी सूचना दिल्या आहेत. बैठकीस आमदार चित्रा वाघ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक दिनेश महाजन उपस्थित होते.
महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे ग. र. न. 332/25 भादवी क. 420, 406, 34 सह आर्म्स ऍक्ट कलम 30 या गुन्ह्याचे तपासात इंडसइंड बँक चे लीगल मॅनेजर यांनी गुन्ह्यातील जेसीबी ताब्यात घेण्याबाबत कोणत्याही रिकवरी एजन्सीला सूचना दिल्या नसल्याचे सांगितले आहे. असे असताना, खालील तीन इसम यांनी जेसीबी मशीन फिर्यादीचे चालकाकडून अनधिकृतपणे ताब्यात घेतले व ते आरोपी शशांक हगवणे याचे ताब्यात दिले असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर तिघांना आज रोजी 02.07 वा. अटक करण्यात आली आहे.
अटक केलेल्या व्यक्तींची नावे
1. योगेश राजेंद्र रासकर, व. 25, रा. तळेगाव ढमढेरे
2. गणेश रमेश पोतले, व. 30, रा. मोहितेवाडी
3. वैभव मोहन पिंगळे, व. 27, रा. तळेगाव ढमढेरे
आगामी मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरे गटाकडून रणनीतीला सुरूवात करण्यात आली आहे. 9 जूनपासून ठाकरे गट रस्त्यावर उतरून पालिकेच्या तयारीची सुरुवात करणार आहेत. ९ जून रोजी ठाकरे गटाच्यावतीने मुलुंड येथील कालिदास सभागृहात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यात युवासेना नेते आदित्य ठाकरे पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत. लढा आपल्या मुंबईचा याच्या माध्यमातून ठाकरे गट मुंबई महानगर पालिकेच्या प्रचाराचा सुरवात करणार आहेत. लढा आपल्या मुंबईचा अशी ठाकरे गटाची टॅग लाईन असणार आहे. मुलुंड येथील मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शन आदित्य ठाकरे करणार असल्याने मुंबई महानगर पालिकेची निवडणूक ठाकरे गट आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढणार चर्चांना उधाण आलं आहे. 9 जूननंतर मुंबईत ठिकठिकाणी विविध प्रश्नांवर ठाकरे गट आंदोलन करणार आहे. मुंबई महानगर पालिकेसाठी प्रचाराचा प्रमुख मुद्दा धारावी पुनर्विकास प्रकल्प मुद्दा असणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. धारावी पुनर्विकास करताना मुंबईतील अनेक ठिकाणच्या जागा अदानी समूहाला राज्य सरकारच्या वतीने दिली असल्याने ठाकरे गट अधिक आक्रमक भूमिका घेणार आहेत. यामध्ये मुलुंड, कुर्ला, मालाड इतर ठिकाणांचा समावेश आहे. 9 जून रोजी मुलुंड येथून ठाकरे गटाकडून सुरवात केल्यानंतर मुंबईतील इतर प्रश्नावर देखील आंदोलन आणि मेळावे लढा आपल्या मुंबईच्या माध्यमातून घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. यामध्ये रस्ते घोटाळा, पाणी प्रश्न, राज्य सरकारच्या योजना याचा देखील समावेश असणार आहे. 9 जून रोजी होणाऱ्या मेळाव्यात आदित्य ठाकरे पुढील मेळाव्याचे आणि आंदोलनांची माहिती पदाधिकाऱ्यांना देणार आहेत.
आगामी महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणूकीच्या तोंडावर धुळे जिल्ह्यातील दिग्गज नेत्यासह तब्बल तीनशे कार्यकर्ते आज मुंबईत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश घेणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला बळकटी मिळणार आहे. उत्तर महाराष्ट्र राष्ट्रवादी अजित पवार गटात संघटक प्रभारी आमदार अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा अध्यक्ष सुरेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते मुंबईत या पदाधिकाऱ्यांचे पक्ष प्रवेश होणार आहेत. या प्रवेशानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला बळ मिळणार असल्याची राजकीय जाणकारांचे मत आहे.
या नेत्यांचा आज प्रवेश
धुळे जिल्हा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील नेरकर, शिंदखेडाचे माजी आमदार रामकृष्ण पाटील, साक्रीचे माजी आमदार डी एस अहिरे, धुळे जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर, आप पार्टीचे हितेंद्र पवार, धुळे शहर अध्यक्ष लोकसंग्राम पार्टीचे डॉ अनिल पाटील, सोशल मीडिया प्रमुख सुरज भावसार, माजी नगरसेवक हरिश्चंद्र वाघ, चंद्रकांत सैंदाणे, महाराष्ट्र चॅम्पियन कुस्तीगीर तथा उपाध्यक्ष जिल्हा तालीम संघ धुळे, शिरपूर तालुका काँग्रेस पक्षाच्या क्रांती पवार, शिरपूर तालुका संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष मनोहर पाटील, शिरपूर तालुका मनसे तालुकाध्यक्ष मयूर राजपूत हे सर्व मुंबईत आज राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.
आज साताऱ्यात अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी साठलेल्या पावसाच्या पाण्यामुळे कार पलटी झाली, त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. कारचालक किरकोळ जखमी झाला आहे. या पुणे बेंगलोर महामार्गावर वाहन चालकांना जीव मुठीत घेऊनच वाहन चालवावे लागत आहे. घटनास्थळी भुईंज पोलीस व महामार्ग पोलीस दाखल झाले आहेत आणि पुढील तपास करत आहेत.
अनेक वर्षांनंतर परभणी जिल्ह्यात मे महिन्यात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे मे महिन्यात शेतीतील पेरणीपूर्व कामे पूर्णतः खोळंबली होती, आता पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतशिवारे शेतकऱ्यांनी फुलली असुन जिल्ह्यात पेरणीपूर्वी मशागतीचे काम तसेच बी बियाणे खते खरेदी करण्यात शेतकरी व्यस्त आहेत. परभणी जिल्ह्यात यंदा साडे पाच लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे.यंदा पाऊस चांगला असल्याचा अंदाज असल्याने बळीराजाही जोशाने कामाला लागला आहे.
मुंबई महापालिकेसाठी भाजपने कंबर कसली. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पुढील दोन महिन्यांचा आराखडा तयार. निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना ॲक्टिव्ह करण्याच्या सूचना . कार्यकर्त्यांमार्फत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीनं भाजपकडून तयारीला सुरुवात. राज्य सरकार आणि केंद्राच्या अनेक लोकापयोगी योजना पोहोचवण्याचे बैठकीत पदाधिकाऱ्यांना निर्देश
जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय उत्पादन वाढवण्यासाठी तसेच हा जिल्हा अग्रेसर करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी मत्स्य उत्पादन वाढविण्यासाठी तलावांमधील गाळ काढणे आणि तलाव परिसरातील अतिक्रमणे हटवण्याचे निर्देश दिले. मंत्री राणे यांनी मत्स्यव्यवसायिक आणि तलावांतील ठेकेदारांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी समजून घेण्याच्या सूचना मत्स्यव्यवसाय आणि पाटबंधारे विभागाला दिल्या.
तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात पोलिसाच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पोलिसांनी आरोपीना वाचवण्यासाठी अनेक त्रुटी केल्या असून मुंबई व सोलापूर येथील मुख्य आरोपींची नावे समोर येऊनही त्यांना अभय देण्यात आले आहे. शिवाय ड्रग्ज प्रकरणात आरोपींच्या जबाबात नाव आलेल्या पोलिसांवरही कारवाई झाली नाही. पोलीस आरोपींना जामीन मिळावा यासाठी प्रयत्न करीत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेकडून करण्यात आला. आरोपींवर मकोको अंतर्गत कारवाई करावी यासाठी मुख्यमंत्री यांना भेटणार असल्याचे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी दिलीय.तपासात चुका असुन आरोपीना अभय दिले आहे.त्यामुळे मुख्यमंत्र्यांना सर्व कागदपत्रे दाखवणार आहे.तुळजापूरात ड्रग्ज तस्करी होत असल्याची माहिती डिसेंबर २०२३ मध्येच माहीती होती तर प्रत्यक्षात प्रथम गुन्हा दाखल होण्यास १ वर्षे १ महिण्याचा कालावधी का लागला असा असा प्रश्न उपस्थित करत १ वर्षाच्या कालावधीत केवळ निवडणुका डोळयासमोर ठेवून किंवा राजकीय स्वार्थापोटी आ.राणा पाटील त्यांनी पोलिसांना काही सांगितले नसल्याचा आरोप देखील खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलाय.
सिंदूर आंबा’ नैसर्गिक शेतीतून जन्मलेली क्रांतिकारी प्रजाती..
प्रगतशील शेतकरी चंद्रकांत देशमुख यांनी आपल्या शेतात विकसित केला आंबा
परभणी तालुक्यातील वरपूडचे प्रगतशील शेतकरी चंद्रकांत देशमुख यांनी नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून आपल्या शेतात विकसित केलेल्या आंब्याच्या नव्या प्रजातीला ‘सिंदूर’ असे नाव दिले असुन , ही प्रजाती भारतात सेंद्रिय शेतीसाठी नवा आदर्श ठरली आहे.
चंद्रकांत देशमुख यांच्या शेतामध्ये मागील तीन वर्षांपूर्वी विविध देशांतील 70 हून अधिक आंब्याच्या प्रजातींची रोपे लावण्यात आली होती.या झाडांना यावर्षी भरघोस फळधारणा झाली असून,विशेष म्हणजे एकही रासायनिक खत किंवा कीटकनाशक न वापरता केवळ गांडूळ खत व नैसर्गिक संसाधनांच्या सहाय्याने या झाडांवर अतिशय दर्जेदार आंबे तयार झाले. या आंब्यांचे वैशिष्ट्य म्हणजे उत्कृष्ट चव, नैसर्गिक गोडवा, आम्लविरहित फळ, आकर्षक रंग, अत्यंत कमी कोयी आणि पूर्णतः रासायनमुक्त फळे. यातील एका जातीला त्यांनी सिंदूर असे नाव दिले आहे.
या विशिष्ट आंबा जातीला सिंदूर हे नाव केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सेंद्रिय व नैसर्गिक शेती केंद्र, नागपूर येथील प्रादेशिक संचालक डॉ. अजय सिंह राजपूत यांच्या हस्ते देण्यात आले. देशभरातील शेतीमध्ये रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे लाखो हेक्टर क्षेत्र नापीक व विषारी बनत चालले आहे. यावर उपाय म्हणून भारत सरकारकडून राष्ट्रीय सेंद्रिय व नैसर्गिक शेती अभियान देशभरात राबवले जात आहे. या अभियानांतर्गत परभणी जिल्ह्यातील आर्यनंदी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन या संस्थेच्या माध्यमातून मागील 18 वर्षांपासून सेंद्रिय शेती क्षेत्रात कार्यरत असलेले संस्थाध्यक्ष श्रीकांत अंबुरे यांच्या पुढाकाराने हा प्रयोग यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्गाचा समारोप आज नागपुरात होणार आहे... दरवर्षी देशभरातील निवडक स्वयंसेवक संघशाच्या कार्यकर्ता विकास वर्गात सहभागी होतात.. या कार्यकर्ता विकास वर्गाचा तुम्हारे 25 दिवसांचा अंतिम टप्पा नागपुरात पार पडतो.. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आज स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतील.. यावेळी इंदिरा गांधी आणि पी वी नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात राहिलेले माजी केंद्रीय मंत्री अरविंद नेताम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे.. पहलगाम मधील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारतीय सैन्याने राबवलेले ऑपरेशन सिंदूर नंतर संघाच्या व्यासपीठावरून सरसंघचालक नेमके काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे..
ऐन कुंभमेळाच्या तोंडावर नाशिकच्या पुरोहित संघातील वाद उफाळून आला
पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्यावर अविश्वास ठराव
चंद्रशेखर पंचाक्षरी यांची अध्यक्षपदी झाली निवड
सतीश शुक्ल मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत बोलवण्यात आली सर्वसाधारण सभा
सर्वसाधारण सभेला सतीश शुक्ल अनुपस्थित
बैठकीत सतीश शुक्ल याना हटवून चंद्रशेखर पंचाक्षरी याना।अध्यक्ष करण्याचा झाला ठराव
बोलविण्यात आलेली सभाच घटनाबाह्य असल्याचा सतीश शुक्ल यांचा दावा
नुकतीच देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलविण्यात आली होती त्यात सतीश शुक्ल आणि त्यांचे चिरंजीव दोघेच उपस्थित असल्याने नाराजी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ताम्रपट देऊन नाशिक कुंभमेळ्याच्या तारखा सतीश शुक्ल यांनी केल्या होत्या जाहीर
'शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही"..
"महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, नानाभाऊ पुन्हा एकदा"
काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त नागपुरात त्यांचा अभिष्टचिंतन करणारे होर्डिंग्स ठीकठिकाणी लावण्यात आले आहे.. अजनी परिसरातील प्रमुख चौक आणि मोठ्या सिग्नल्सवर नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेले होर्डिंग्ज तर लक्ष वेधून घेतच आहे. मात्र त्यावर लिहिलेला राजकीय संदेश जास्त लक्षवेधी आहे...
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला चांगले यश मिळेल आणि तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत असं त्यांच्या समर्थकांना वाटत होतं.. मात्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत झालं आणि अवघ्या 16 जागांवर काँग्रेसला समाधान मानावं लागलं... त्यानंतर नाना पटोले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने होर्डिंग्स लावताना त्यांच्या समर्थकांनी "मी अजून हरलो नाही, कारण शरद अजून संपली नाही" असं लक्षवेधी मजकुर होर्डिंगवर लिहिल्यामुळे ते चर्चेचा विषय ठरले आहे.. तर महाराष्ट्राच्या हितासाठी स्वाभिमानासाठी नानाभाऊ पुन्हा एकदा असंही या ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या होल्डिंग्सवर लिहिण्यात आले आहे... त्यामुळे नाना पटोले यांच्याकडेच महाराष्ट्रात काँग्रेसची धुरा असावी असं काँग्रेस मधील काही कार्यकर्त्यांना वाटतंय का?? अशी चर्चाही या होर्डिंग्सला पाहिल्यानंतर सुरू झाली आहे...
बीड शहरातील साठे चौकात किरकोळ कारणावरून दोन गटात वाद झाला आणि याच वादातून एकमेकांवर धार धार शस्त्राने हल्ला करण्यात आला.. या घटनेत चौघेजण जखमी असून जखमींवर जिल्हा रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.. एक बुलेट चालक आणि पिकअप चालक यांच्यात हॉर्न वाजवण्याच्या कारणावरून वाद झाला. आणि याच दरम्यान नारळ सोलण्याच्या कोयत्याने एकाने दोघांवर वार केले.. पोलिसांनी तात्काळ याची गंभीर दखल घेत घटनास्थळी धाव घेतली असून या प्रकरणाचा अधिक तपास केला जातोय..
राज्यात भूकंपाच्या वाढत्या हालचालींमुळे राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून भूकंपाचा धोका लक्षात घेता नागरिकांना विशेष सूचना जारी करण्यात आलेले आहेत नागरिकांनी भूगर्भातील हालचालींना घाबरून न जाता काय काळजी घ्यावी याचा उल्लेख आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आला आहे.
मला एक गाडी गिफ्ट दिली होती माझ्या जुन्या गाडीला खूप मेंटेनन्स होता लोकांनी गाडी दिल्यानंतर त्याच दरम्यान सारथीला निधी उपलब्ध होतो. महाज्योतीला दुजाभाव केला जातो. म्हणून मी अर्थमंत्री याला उपदेशून एक प्रेस केली, त्यानंतर अमोल मिटकरी यांनी माझ्या गाडीचा नंबर वाय झेड ठेवा अशा पद्धतीचे त्याने वक्तव्य केले होते. अजितदादा पवार चोरांचा दरोडेखोरांचा सरदार आहे. अजितदादा यांना उगडानागडा केल्याशिवाय राहणार नाही.
Loc पार करून पाक व्याप्त पाकिस्तानात गेलेल्या नागपूरच्या महिलेने सोशल मीडिया द्वारे पाकिस्तानी नागरिकांसोबत चॅटिंग केली आहे.. सुरुवातीला व्यवसायानिमित्ताची ( रत्न, खडे यांच्या व्यवसाय बद्दल) चॅटिंग आहे.. मात्र नंतर वेगळ्या पद्धतीची चॅटिंग आहे.. सोशल मीडिया चॅटिंग वरून तिचे पाकिस्तानी नागरिकांसोबत संबंध दिसून येत आहे..
14 मे रोजी एलओसी क्रॉस केली. कारगिल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.. विशेष कायदे अन्वये तो गुन्हा दाखल करण्यात आला आहे... कारगिल टीम संबंधित महिलेला ताब्यात घेण्यासाठी नागपुरात आली असून प्राथमिक चौकशी ही केली आहे आणि आता लीगल प्रोसिजर करून तिला सोबत घेऊन जाणार आहे....
तिचे मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले होते. त्यावरूनच सोशल मीडिया चॅटिंग्स मिळून आल्या आहे..
एलओसी क्रॉस करण्यासाठी तिला काही स्थानिक लोकांनी (काश्मीर मधील लोकांनी) मदत केल्याचे समोर आले आहे.. कारगिल पोलीस त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करणार आहे.. त्यानंतर लोकल सपोर्ट संदर्भात स्पष्टता येईल..
त्या महिलेचे पाकिस्तान मधील जुल्फिकार नावाच्या व्यक्तीच्या व्यतिरिक्त एका धर्मगुरू (ख्रिश्चन धर्मगुरू) सोबतही चॅटिंग झाल्याचे समोर आले आहे.. त्या सोबतच्या चॅटिंग मध्ये पाकिस्तानात कसं जायचं या संदर्भातलीच चर्चा आहे इतर दुसरे काहीही नाही...
ही महिला नऊ दिवस पाकिस्तानी एजन्सीसच्या ताब्यात होती, त्यानंतरच पाकिस्तानी एजन्सीने महिला आणि तिचा मोबाईल भारताला सोपवलं आहे... जेव्हा ही महिला पाक व्याप्त काश्मीर मध्ये गेली होती, त्यावेळेस अत्यंत तणावाचे वातावरण होते.. त्या काळातच नऊ दिवस पाकिस्तानी एजन्सीची ताब्यात होती.. त्यामुळे पाकिस्तानी एजन्सी ने तिच्या मोबाईल मध्ये काही स्पायवेअर किंवा मालवेअर टाकले आहे का याची चौकशी आम्ही करून घेतली आहे.. मोबाईल मध्ये काही संशय निर्माण करणारे ॲप्स आढळले आहे.. त्या ॲप्सचा तपास सुरू आहे... फॉरेन्सिक तपास मध्ये त्याबद्दल स्पष्टता येईल...
एन आय ए मुंबईने नागपूर पोलिसांना संपर्क साधून त्यांच्या प्रश्नावली पाठवली आहे... त्या उत्तराच्या आधारावर एन आय ए पुढचा निष्कर्ष काढणार आहे.. आणि मग स्पेशल टीम नागपुरात पाठवली जाणार आहे...
भारतात राहून पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र एटीएसला तपासात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय अंतर्गत काम करणाऱ्या पाकिस्तान इंटेलिजेंस ऑपरेटिव्ह (PIO) च्या महिला एजंट्सनी आरोपी रवी वर्माला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी भारतीय सिमकार्डचा वापर केला होता. तपासात असे दिसून आले आहे की, पीआयओच्या महिला एजंट्सनी जाणूनबुजून भारतीय सिमकार्डचा वापर केला जेणेकरून रवी वर्मा आणि भारतीय सुरक्षा यंत्रणांना हे संभाषण पाकिस्तानमधून होत आहे हे कळू नये.
महिला एजंट्सनी स्वतःला भारतीय नागरिक म्हणून ओळख देऊन वर्मा यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना आमिष दाखवले आणि युद्धनौका आणि पाणबुड्यांसारखी संवेदनशील संरक्षण माहिती, फोटो आणि व्हिडिओ मागितले. एटीएसच्या सूत्रांनुसार, आरोपीशी संपर्क साधण्यात आलेले सर्व ५-६ मोबाईल नंबर हे भारतीय सिमकार्ड आहेत. हे सिमकार्ड पाकिस्तानी एजंट्सना कोणी आणि कसे पुरवले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एटीएसने या संदर्भात तपास अधिक तीव्र केला आहे.
सूत्रांनी पुढे सांगितले की, तपासात असे ठोस संकेत मिळाले आहेत की, पाकिस्तानी एजंट्सनी भारतीय नंबर वापरून रवी वर्माला हनी ट्रॅपमध्ये अडकवले होते. या खुलाशानंतर, एटीएसने एक सार्वजनिक सूचना देखील जारी केली आहे, ज्यामध्ये नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी अज्ञात भारतीय आणि परदेशी नंबरवरून येणारे मेसेज किंवा कॉल गांभीर्याने घ्यावेत आणि त्यांना प्रतिसाद देऊ नयेत.
तसेच, अशा कोणत्याही संशयास्पद कॉल किंवा मेसेजबद्दल तातडीने पोलिसांना कळवावे. सूत्रांनी पुढे सांगितले की, ही एक वेगळी घटना नाही. तपासात असे दिसून आले आहे की पीआयओ एजंट केवळ रवी वर्माच नाही तर भारतातील विविध भागांमध्ये अशाच प्रकारे भारतीय सिम कार्डद्वारे अनेक लोकांना लक्ष्य करत आहेत.
ही त्यांची नवीन कार्यपद्धती आहे, जी पहलगाम हल्ल्यानंतर उघडकीस आली आहे.
दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने मंगळवारी हसन नावाच्या एका व्यक्तीला अटक केली, जो पाकिस्तानी एजंटना भारतीय सिम कार्ड पुरवण्यात सहभागी होता. आता महाराष्ट्र एटीएस दिल्ली पोलिसांशी सतत संपर्कात आहे जेणेकरून हसनचा रवी वर्मा प्रकरणाशी काही संबंध आहे का हे शोधता येईल. सूत्रांनी सांगितले की, नोव्हेंबर २०२४ ते मार्च २०२५ दरम्यान, रवी वर्माला पाकिस्तानी एजंट्ससोबत गुप्त माहिती शेअर करण्याच्या बदल्यात सुमारे ९,००० रुपये देण्यात आले होते, असेही तपासात उघड झाले आहे. हे पैसे मृत खात्यातून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आले, ज्याचे विश्लेषण अजूनही सुरू आहे.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live Updates: हेरगिरी प्रकरणात महत्त्वाची अपडेट, रवी वर्माला अडकवण्यासाठी सिमकार्डचा वापर