N. D. Patil Death : ज्येष्ठ नेते एन डी पाटील यांचं निधन; लाईव्ह अपडेट्स

N. D. Patil Passed Away : महाराष्ट्राच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेते प्राध्यापक एन.डी.पाटील यांचं निधन झालं.

abp majha web team Last Updated: 17 Jan 2022 12:40 PM
एन डी पाटील यांच्या अंतिमसंस्कार नियोजनात बदल

एन डी पाटील यांच्या अंतिमसंस्कार नियोजनात बदल झाला आहे. सकाळी 8  वाजता अँपल सरस्वती हॉस्पिटलमधून एन डी पाटील यांचे पार्थिव बाहेर काढण्यात येईल. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या शाहू कॉलेज इथल्या पटांगणावर सकाळी 8 ते 1 दरम्यान एन डी पाटील यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाईल. त्यानंतर 20 लोकांच्या उपस्थितीत एन डी पाटील यांचे पार्थिव कसबा बावडा इथल्या स्मशानभूमीत नेण्यात येईल. तिथे एन डी पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहे. 

रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार आणि आई सुनंदा पवार एन डी पाटील यांच्या रुईकर कॉलनी मधील निवासस्थानी दाखल

रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार आणि आई सुनंदा पवार एन डी पाटील यांच्या रुईकर कॉलनी मधील निवासस्थानी दाखल झाले आहेत. आता निवासस्थानी शरद पवार यांच्यासोबत पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार,  प्रतापराव पवार, हसन मुश्रीफ, जयंत पाटील, सतेज पाटील, विश्वजित कदम उपस्थित आहेत. 

ज्येष्ठ नेते प्रा एन. डी. पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ज्येष्ठ नेते प्रा एन. डी. पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली

मुंबई - "शेतकरी व कष्टकरी जनतेचा बुलंद आवाज हरपला आहे. महाराष्ट्राने एक संघर्षशील नेतृत्व गमावले आहे," अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली. 


मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले की, "एन. डी. पाटील हे राज्याच्या पुरोगामी विचारांचे व्यासपीठ होते. महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांची मशाल त्यांनी शेवटपर्यंत पेटत ठेवली. लढणे आणि संघर्ष करणे हेच त्यांचे जीवन होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातले ते एक बिनीचे शिलेदार होतेच, पण त्यानंतरच्या बेळगावसह सीमा लढ्यातील प्रत्येक आंदोलनात एन. डी. आघाडीवर होते. सीमा भागात जाऊन त्यांनी लढे दिले व पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचा चांगलाच स्नेह होता. महाराष्ट्राच्या विरोधात कोणी 'ब्र' काढलाच तर शिवसेनाप्रमुखांच्या बरोबरीने 'एन. डी.' उभे राहिलेच म्हणून समजा. 


"अखंड महाराष्ट्रात बेळगावसह सीमा भाग यावा हा त्यांचा ध्यास होता. एखाद्या वादळासारखे ते शेतकरी, कष्टकऱ्यांच्या लढ्यात उतरत. महाराष्ट्रासाठी त्यांचे नेतृत्व प्रेरणादायी होते. एन. डी. पाटील यांच्या जाण्याने महाराष्ट्र राज्याचे अतोनात नुकसान झाले असून मी त्यांना महाराष्ट्र राज्यातर्फे आणि शिवसेनेतर्फे अभिवादन करतो," अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी शोक व्यक्त केला.

उपेक्षित बांधवांसाठी लढणारं संघर्षशील नेतृत्वं हरपलं, सीमाभागातील मराठीभाषक बांधवांचा आधारवड कोसळला- उपमुख्यमंत्री अजित पवार

“महाराष्ट्राच्या पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील साहेब म्हणजे सामान्य माणसाचा संघर्षाचा कृतीशील विचार होता. सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी जीवनाच्या अखेरपर्यंत ते संघर्ष करीत राहिले. त्यांच्या निधनानं शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, कष्टकरी, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांसाठी लढणारं संघर्षशील नेतृत्वं हरपलं आहे. सीमाभागातील मराठीभाषक बांधवांचा आधारवड कोसळला आहे. प्रा. एन. डी. पाटील साहेब निर्भिड, नि:स्पृह, निडर नेते होते. महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांशी प्रामाणिक राहून त्यांनी काम केलं. वयाच्या नव्वदाव्या वर्षीही रस्त्यावर उतरुन संघर्ष करणाऱ्या प्रा. एन. डी. पाटील साहेबांचं निधन ही महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीची मोठी हानी आहे. आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील पुलोद सरकारमध्ये त्यांनी सहकारमंत्री म्हणून काम केलं. आमदार म्हणून काम केलं. विधानमंडळातील प्रत्येक क्षण आणि प्रत्येक शब्द हा वंचित बांधवांना हक्क मिळवून देण्यासाठी उपयोगात आणला. प्रा. एन. डी. पाटील साहेब हे आमच्या कुटुंबातील सदस्य होते. त्यांचं निधन हे महाराष्ट्रातल्या, सीमाभागातल्या प्रत्येक कुटुंबाची हानी आहे. मी प्रा. एन. डी. पाटील साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करीत प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.

लोकचळवळी व लढ्यांमध्ये प्रा.एन. डी. पाटील यांचे मोलाचे योगदान- जयंत पाटील

महाराष्ट्रातील ऋषितुल्य असे व्यक्तिमत्व, शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते, महाराष्ट्र सरकार मधील माजी मंत्री प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे. ते अखेरपर्यंत राज्यातील कष्टकरी व शेतकऱ्यांसाठी लढत राहिले. महाराष्ट्राच्या  विविध लोकचळवळी व लढ्यांमध्ये प्रा.एन. डी. पाटील यांचे मोलाचे योगदान राहिले. आयुष्याच्या अखेरपर्यंत ते शेतकरी कामगार पक्षाच्या विचारधारेशी कटिबद्ध राहिले. 





महाराष्ट्राच्या राजकारणात प्रा. पाटील यांचे महत्त्वाचे योगदान - केंद्रीय मंत्री नारायण राणे

महाराष्ट्राच्या राजकारणात प्रा. पाटील यांचे महत्त्वाचे योगदान - केंद्रीय मंत्री नारायण राणे






राज्याच्या सामाजिक व राजकीय जीवनावर प्रा. पाटील यांचा मोठा प्रभाव - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 

ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. राज्याच्या सामाजिक व राजकीय जीवनावर प्रा. पाटील यांचा मोठा प्रभाव राहिला आहे. शेतकरी - कामगार यांचे अनेक प्रश्न त्यांनी वेळोवेळी मांडले व ते सोडवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 





जनहिताशी अखेरपर्यंत बांधिलकी जपणारा तत्त्वनिष्ठ व निस्वार्थी नेता आज हरपला - शरद पवार
डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी वर्गाप्रती आस्था असलेला, जनहिताशी अखेरपर्यंत बांधिलकी जपणारा तत्त्वनिष्ठ व निस्वार्थी नेता आज हरपला आहे. उपेक्षित लोकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी विधिमंडळातही आवाज उठवला, आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी सभागृह गाजवले.




एनडी पाटील यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार होणार, हसन मुश्रीफ यांची माहिती, कोरोनाचे नियम पाळत दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार 

एनडी पाटील यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार होणार, हसन मुश्रीफ यांची माहिती, कोरोनाचे नियम पाळत दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार 

एनडी पाटील सरांचं निधन फार मोठा धक्का, ते आम्हा चळवळीतील लोकांचे भीष्माचार्य होते- राजू शेट्टी

एनडी पाटील सरांचं निधन फार मोठा धक्का, ते आम्हा चळवळीतील लोकांचे भीष्माचार्य होते- राजू शेट्टी

आमचा मार्गदर्शक आवाज, आधार ,  आमचा आदर्श, घरातील व्यक्ती हरपला, - डॉ. मेघा पानसरे

 आमचा मार्गदर्शक आवाज, आधार ,  आमचा आदर्श, घरातील व्यक्ती हरपला,  पानसरेच्या खुनाच्या केस मध्ये पानसरेना न्याय मिळावा , याबाबत सतत पाठपुरावा केला- डॉ. मेघा पानसरे

कोल्हापुरातील शाहू महाविद्यालयात एन डी सरांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल,  महाविद्यालयाच्या मैदानात अंत्यसंस्कार केले जाण्याची शक्यता..

कोल्हापुरातील शाहू महाविद्यालयात एन डी सरांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल,  महाविद्यालयाच्या मैदानात अंत्यसंस्कार केले जाण्याची शक्यता..

माझ्यावर त्यांचा खूप प्रेम होतं, विरुद्ध विचारांची आम्ही असलो तरी खरं  ते खरं खोटं ते खोटं असं त्यांचं म्हणणं होतं - चंद्रकांत दादा पाटील

माझ्यावर त्यांचा खूप प्रेम होतं, विरुद्ध विचारांची आम्ही असलो तरी खरं  ते खरं खोटं ते खोटं असं त्यांचं म्हणणं होतं - चंद्रकांत दादा पाटील


टोलची खोकी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार असे ते म्हणाले होते


टोलच्या प्रश्नात आम्ही एकत्र आलो होतो, पक्ष विचार जरी वेगळे असले तरी


सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी ते संघर्ष करत राहिले 


पानसरे यांच्या जाण्याने त्यांना खूप दुःख झाले होते त्यांना न्याय मिळावा यासाठी ते झटत राहिले 


एक अभ्यासू माणूस, लॉजिक बाहेर ते बोलत नव्हते पक्ष कोणतंही असू

मृत्यूची झुंज अपयशी ठरली, एक झुंजार नेतृत्व अशी त्यांची ओळख

वातावरणात बदल झाल्याने त्यांना थोडी कणकण वाटत होती. त्यामुळे एन.डी. पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र या वयातही एन. डी. पाटील यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती. मात्र यावेळी त्यांची मृत्यूची झुंज अपयशी ठरली. एक झुंजार नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. कामगार, शेतकरी यांचे अनेक प्रश्न त्यांनी सातत्यानं मांडले होते. तसेच अनेक प्रश्न त्यांनी मार्गीही लावले होते. 

प्राध्यापक एन.डी.पाटील यांचं निधन

N. D. Patil Passed Away : महाराष्ट्राच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेते प्राध्यापक एन.डी.पाटील यांचं निधन झालं आहे. ते 93 वर्षांचे होते. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. ब्रेन स्ट्रोक आल्यानं गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूरमधील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. 

पार्श्वभूमी

N. D. Patil Passed Away : महाराष्ट्राच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेते प्राध्यापक एन.डी.पाटील यांचं निधन झालं आहे. ते 93 वर्षांचे होते. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. ब्रेन स्ट्रोक आल्यानं गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूरमधील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. 


वातावरणात बदल झाल्याने त्यांना थोडी कणकण वाटत होती. त्यामुळे एन.डी. पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांना लागण झाली होती. मात्र या वयातही एन.डी. पाटील यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती. मात्र यावेळी त्यांची मृत्यूची झुंज अपयशी ठरली. 


संपूर्ण नाव : नारायण ज्ञानदेव पाटील


जन्म : १५ जुलै १९२९ – ढवळी ( नागाव ), जि.सांगली येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबात जन्म


शिक्षण : एम.ए. ( अर्थशास्त्र ), पुणे विद्यापीठ,१९५५; एल.एल.बी.( १९६२ ) पुणे विद्यापीठ


अध्यापन कार्य



  • १९५४- १९५७ छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा येथे प्राध्यापक तसेच ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख व रेक्टर

  • १९६० साली कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज,इस्लामपूर येथे प्राचार्य

  •  


शैक्षणिक क्षेत्रातील कार्य



  • शिवाजी विद्यापीठ – पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य १९६२

  • शिवाजी विद्यापीठ – सिनेट सदस्य १९६५

  • शिवाजी विद्यापीठ – कार्यकारिणी सदस्य १९६२-१९७८

  • शिवाजी विद्यापीठ – सामाजिकशास्त्र विभागाचे डीन १९७६-१९७८

  • सदस्य, प्राथमिक शिक्षण आयोग,महाराष्ट्र राज्य १९९१

  • रयत शिक्षण संथेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य- १९५९ पासून

  • रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन – १९९० पासून

  • दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ ,बेळगाव अध्यक्ष – १९८५ पासून


 


राजकीय कार्य



  • १९४८ – शेतकरी कामगार पक्षात प्रवेश

  • १९५७ – मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस

  • १९६०-६६,१९७०-७६,१९७६-८२ अशी १८ वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य

  • १९६९- १९७८, १९८५ – २०१० – शे.का.प.चे सरचिटणीस

  • १९७८-१९८० – सहकारमंत्री ,महाराष्ट्र राज्य

  • १९८५-१९९०- महाराष्ट्र विधानसभा सदस्य (कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधी )

  • १९९९-२००२ – निमंत्रक लोकशाही आघाडी सरकार

  • महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य व सीमा चळवळीचे प्रमुख नेते


 


मिळालेले सन्मान / पुरस्कार



  • भाई माधवराव बागल पुरस्कार – १९९४

  • स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ,नांदेड – डी.लीट.पदवी, १९९९

  • राष्ट्रीय बियाणे महामंडळ ( अध्यक्षपद )भारत सरकार – १९९८ – २०००

  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – डी.लीट.पदवी, २०००

  • विचारवेध संमेलन ,परभणी अध्यक्षपद- २००१

  • शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – डी.लीट.पदवी

  • शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार


 


भूषविलेली पदे



  • रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य

  • समाजवादी प्रबोधिनी ,इचलकरंजी – उपाध्यक्ष

  • अंधश्रद्धा निमूर्लन समिती,महाराष्ट्र – अध्यक्ष

  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी , सातारा – अध्यक्ष

  • जागतिकीकरण विरोधी कृतिसमिती – मुख्य निमंत्रक

  • म.फुले शिक्षण संस्था ,इस्लामपूर – अध्यक्ष

  • दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था ,बेळगाव – अध्यक्ष

  • महाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समिती – सदस्य


 


प्रसिद्ध झालेले लेखन



  • समाजविकास योजनेचे वस्त्रहरण (पुस्तिका)

  • शेतजमिनीवरील कमाल मर्यादा आणि महाराष्ट्र सरकारचा प्रतिगामी कायदा (पुस्तिका ) १९६२

  • कॉंग्रेस सरकार आणि शेतकऱ्यांची लूट (पुस्तिका ) १९६२

  • शेतीमालाला किफायतशीर किमतीची हमी आणि घाऊक व्यापाराचे राष्ट्रीयीकरण (पुस्तिका ) १९६३

  • वाढती महागाई आणि ग्राहकांची ससेहोलपट ( पुस्तिका ) १९६६

  • महाराष्ट्र सरकारच्या श्वेतपत्रिकेचे ( White Paper ) कृष्णस्वरूप (पुस्तिका) १९६७

  • शेतीमालाच्या किफायतशीर किमतीची कैफियत ( पुस्तक )१९७०

  • शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी ? ( पुस्तिका ) १९९२

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ( पुस्तिका )

  • नववे विचारवेध संमेलन परभणी, अध्यक्षीय भाषण , २००१ (नवसाम्राज्यवादी युगातील भारतीय लोकशाही समोरील आव्हाने )


 


 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.