एक्स्प्लोर

Election : राज्यातील मुदत संपलेल्या नगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार

राज्यातील मुदत संपलेल्या नगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. जवळपास 200 नगरपालिका , नगरपरिषद आणि नगरपंचायत प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगानं दिले आहेत.  

पंढरपूर : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट असल्याने अनेक ठिकाणी लॉकडाऊनमुळे जनजीवन ठप्प असताना राज्य निवडणूक आयोगाने मात्र मुदत संपलेल्या नगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायतीत प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आता मुदत संपणाऱ्या राज्यातील जवळपास 200 नगरपालिका आणि नव्याने मंजुरी दिलेल्या 20 नगरपंचायत आणि नागरपरिषदांना प्रभाग रचना आणि सदस्य संख्या तयार करून घ्यावी लागणार आहे.

 याबाबत आयोगाने प्रभाग रचना कशी करायची याबाबत अजून डिटेल्स दिलेले नसले तरी येत्या दोन तीन दिवसात याचाही तपशील मिळू शकणार आहे. राज्यातील डिसेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 पर्यंत ज्यांची मुदत संपत आहे आणि ज्या नगरपरिषद आणि नगरपंचायत याना नव्याने मंजुरी दिली आहे अशा सर्व ठिकाणी ही प्रभाग रचना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही प्रभाग रचना आता ऑनलाईन गुगलवरून आयोगाला सादर करायची असून याचे नकाशे देखील द्यावे लागणार आहेत. 

सर्वसाधारणपणे 2011 च्या जनगणनेनुसार ही प्रभाग रचना असून यंदा सिंगल वॉर्ड प्रभाग रचना करायची असल्याने नागरसेवकांवरील ताण कमी होऊन प्रत्येकाला आपल्या वैयक्तिक प्रभागातच काम करावे लागणार आहे. 

सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर , बार्शी , अक्कलकोट , सांगोला , करमाळा , कुर्डुवाडी , मैंदर्गी , मंगळवेढा या नागरपरिषदांची मुदत फेब्रुवारी 22 अखेर संपत आहे. नव्याने स्थापन झालेल्या अकलूज नगरपरिषद सह महाळुंग श्रीपूर , नातेपुते आणि वैराग या तीन  नगरपंचायतींना  प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. यावेळी केवळ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती एवढेच आरक्षण राहण्याची शक्यता असून इतर मागास प्रवर्ग रद्द झाल्याने खुल्या प्रभागाला जादा प्रभाग उपलब्ध होणार आहेत. हे काम 23 ऑगस्टपासून सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून निवडणूक आयोगाने मंजुरी दिल्यावर प्रभाग रचना नागरिकांच्या आक्षेपासाठी प्रसिद्ध केली जाईल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
Suresh Dhas & Satish Bhosale : सुरेश धसांचा सतीश भोसलेला 100 टक्के आशीर्वाद, म्हणाले, ऐ खोक्या, माझा...; ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
सुरेश धसांचा सतीश भोसलेला 100 टक्के आशीर्वाद, म्हणाले, ऐ खोक्या, माझा...; ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
Babita Tade : KBC मध्ये 2019 ला करोडपती बनल्या, पण आजही शाळेत खिचडी बनवतात; मराठमोळ्या बबितांची जमिनीशी घट्ट नाळ
KBC मध्ये 2019 ला करोडपती बनल्या, पण आजही शाळेत खिचडी बनवतात; मराठमोळ्या बबितांची जमिनीशी घट्ट नाळ
संजय राऊतांविरोधात सरसेनापती हंबीरराव मोहितेंचे वंशज आक्रमक, दहा कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार; नेमकं प्रकरण काय?
संजय राऊतांविरोधात सरसेनापती हंबीरराव मोहितेंचे वंशज आक्रमक, दहा कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार; नेमकं प्रकरण काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03PM 07 March 2025Rohit Sharma School Update | रोहित शर्माच्या शाळेतील तोडलेलं क्रिकेट टर्फ पुन्हा बांधून देणार, म्हाडाकडून हमी सुपूर्दNitesh Rane | हे कसली तक्रार करतात, यांनी लोकांचे छळ केले; अनिल परब VS नितेश राणे यांच्यात खडाजंगीAmbadas Danve | तर मी दिलगिरी व्यक्त करतो, परबांच्या व्यक्तव्याचा अनर्थ होतोय, दानवेंचं स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
Suresh Dhas & Satish Bhosale : सुरेश धसांचा सतीश भोसलेला 100 टक्के आशीर्वाद, म्हणाले, ऐ खोक्या, माझा...; ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
सुरेश धसांचा सतीश भोसलेला 100 टक्के आशीर्वाद, म्हणाले, ऐ खोक्या, माझा...; ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
Babita Tade : KBC मध्ये 2019 ला करोडपती बनल्या, पण आजही शाळेत खिचडी बनवतात; मराठमोळ्या बबितांची जमिनीशी घट्ट नाळ
KBC मध्ये 2019 ला करोडपती बनल्या, पण आजही शाळेत खिचडी बनवतात; मराठमोळ्या बबितांची जमिनीशी घट्ट नाळ
संजय राऊतांविरोधात सरसेनापती हंबीरराव मोहितेंचे वंशज आक्रमक, दहा कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार; नेमकं प्रकरण काय?
संजय राऊतांविरोधात सरसेनापती हंबीरराव मोहितेंचे वंशज आक्रमक, दहा कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार; नेमकं प्रकरण काय?
Dharavi Redevelopment Project : धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, कंत्राट रद्द करण्याची केली होती मागणी
धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, कंत्राट रद्द करण्याची केली होती मागणी
कोरटकर असो वा सोलापूरकर कोणालाही सोडणार नाही; शिंदेंचा सभागृहातून इशारा, सदस्यांनी वाजवल्या टाळ्या
कोरटकर असो वा सोलापूरकर कोणालाही सोडणार नाही; शिंदेंचा सभागृहातून इशारा, सदस्यांनी वाजवल्या टाळ्या
माझा इम्पॅक्ट : रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी जिथं क्रिकेटर्स घडवले, तिथल्या तोडकाम केलेल्या टर्फला म्हाडाची एनओसी
माझा इम्पॅक्ट : रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी जिथं क्रिकेटर्स घडवले, तिथल्या तोडकाम केलेल्या टर्फला म्हाडाची एनओसी
राज्यासमोर आर्थिक संकट वाढले, महसुली उत्पन्नापेक्षा खर्च जास्त, भांडवली खर्चासाठी दुसरे कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही!
राज्यासमोर आर्थिक संकट वाढले, महसुली उत्पन्नापेक्षा खर्च जास्त, भांडवली खर्चासाठी दुसरे कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही!
Embed widget