एक्स्प्लोर

मुंबई आणि ठाणे वगळता सर्वच महापालिकांमध्ये भाजप नंबर वन

मुंबई: मुंबई आणि ठाणे वगळता राज्यातील 10 महापालिकांपैकी 8 महापालिकांमध्ये भाजपने विजयी घोडदौड सुरु ठेवली आहे. भाजपने मुंबई आणि ठाणे सोडून नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, उल्हासनगर, सोलापूर, नागपूर, अकोला, अमरावती आदी महापालिकांमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. मुंबई महापालिकेत भाजपला चांगले यश मिळाले आहे. गेल्या निवडणुकीत भाजपचे केवळ 31च नगरसेवक होते. पण शिवसेनेने युती तोडल्यानंतर भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली. सध्या भाजपचे 77 जागांवर आघाडी मिळवली आहे. मुंबईजवळच्याच उल्हासनगर महापालिकेत भाजपची सरशी झाली आहे. या निवडणुकीत भाजपने पप्पू कलानी यांच्यासोबत आघाडी केल्याने, भाजपवर चहूबाजूंनी टीका होत होती. पण इथे भाजपची सरशी होऊन भाजप आघाडीला 33 जागांवर विजयी आघाडी मिळाला आहे. तर सर्वाधिक चर्चिल्या गेलेल्या नाशिक महापालिकेत भाजपने राज ठाकरेंच्या मनसेकडून सत्ता अक्षरश: हिसकावून घेतली आहे. गेल्या निवडणुकीत नाशिक महापालिकेत मनसेचे 40 तर भाजपचे केवळ 14 नगरसेवक होते. पण यंदा भाजपने 40 जागांवर विजयी आघाडी मिळवली आहे. तर मनसेच्या इंजिनाला मोठा ब्रेक लागला आहे. मनसेच्या सध्या तीनच उमेदवारांनी आघाडी मिळवली आहे. भाजपने सर्वाधिक मुसंडी ही पुणे महापालिकेत मारल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या निवडणुकीत पुणे महापालिकेमध्ये भाजपचे फक्त 26 च नगरसेवक होते. पण यंदाच्या निवडणुकीत भाजपने 77 जागांवर विजयी आघाडी मिळवली आहे. पुण्यात सध्या भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. तर पिंपरी-चिंचवड महापालिकेतही भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धोबीपछाड दिला आहे. भाजपचे गेल्या महापालिका निवडणुकीत केवळ 3 नगरसेवक होते. पण यंदाच्या निवडणुकीत भाजपने सध्या 31 जागांवर आघाडी मिळवली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर महापालिकेतही भाजपने काँग्रेसचा दणकून पराभव केला आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि पालकमंत्री सुभाष देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पण या निवडणुकीत भाजपने 28 जागांवर आघाडी मिळवली आहे. तर काँग्रेसचे 11 उमेदवार आघाडीवर आहेत. तिकडे विदर्भातही भाजपला घवघवीत यश मिळालं आहे. नागपूर महापालिकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती. पण भाजपनं आपलं पुन्हा एकदा नागपूर महापालिकेवर वर्चस्व सिद्ध केलं आहे. भाजपनं गेल्या निवडणुकीत 62 जागांवर विजय मिळवला होता. सध्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार भाजपने 48 जागांवर आघाडी मिळवली आहे. यासोबतच अमरावती महापालिकेवरही भाजपची बहुमताकडे वाटचाल सुरु आहे. सध्या भाजपने 30 जागांवर आघाडी मिळवलेली आहे. तसेच अकोला महापालिकेतही भाजपला यश मिळालं आहे. भाजपने 36 जागांवर विजयी आघाडी मिळवली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
Embed widget