एक्स्प्लोर
माथेरानमध्ये दरीत कोसळून मुंबईतील पर्यटक महिलेचा मृत्यू
दगडाला ठेच लागून गीता मिश्राचा तोल गेला आणि ती माथेरानमधील आठशे फूट खोल दरीत कोसळली
रायगड : माथेरानमध्ये दरीत कोसळून मुंबईतील पर्यटक महिलेचा मृत्यू झाला. सह्याद्री रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी खोल दरीत उतरुन तीन तासांच्या प्रयत्नांनंतर महिलेचा मृतदेह बाहेर काढला.
मुंबईतील दिवा भागात राहणारी गीता मिश्रा ही महिला पती, दोन लहान मुली आणि एक मित्र यांच्यासोबत शनिवारी सकाळी माथेरानला फिरण्यासाठी आली होती. माथेरानमधील बेलविडीयर पॉईंटला सर्व जण दुपारी फिरायला गेले.
एका लहान दगडाला ठेच लागून गीताचा तोल गेला आणि ती आठशे फूट खोल दरीत कोसळली. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
स्थानिक पोलिस आणि माथेरानमधील सह्याद्री रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी खोल दरीत उतरुन तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर महिलेचा मृतदेह दरीतून बाहेर काढला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भारत
मुंबई
Advertisement