एक्स्प्लोर
मुंबई-पुणे शिवनेरी प्रवास 134 रुपयांनी महागण्याची चिन्हं
एसटी महामंडळाच्या प्रस्तावित भाडेवाढीमुळे मुंबई-पुणे शिवनेरी प्रवास 134 रुपयांनी महागण्याची शक्यता आहे.
धुळे : मुंबई-पुण्यादरम्यान आरामशीर प्रवासासाठी 'शिवनेरी' बसचा पर्याय निवडणाऱ्या प्रवाशांना मोठा धक्का बसणार आहे. एसटी महामंडळाच्या प्रस्तावित भाडेवाढीमुळे मुंबई-पुणे शिवनेरी प्रवास 134 रुपयांनी महागण्याची शक्यता आहे.
डिझेल दरवाढीबरोबरच कर्मचाऱ्यांची वेतनवाढ आणि महामार्गावरील टोलदरात झालेल्या वाढीमुळे एसटी महामंडळावर मोठा आर्थिक बोजा पडत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने 30 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव गुरुवारी परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्यासमोर मांडला.
एसटी महामंडळाचा प्रस्ताव मान्य झाल्यास मुंबई ते पुणे मार्गावरील शिवनेरी बसचे दर 456 वरुन 590 रुपयांवर पोहचू शकतात. इतर मार्गावरील साध्या आणि वातानुकूलित बसच्या भाड्यातही वाढ होऊन प्रवाशांच्या खिशाला कात्रीच लागण्याची चिन्हं आहेत.
एसटी महामंडळाच्या माहितीनुसार डिझेल दरवाढीमुळे एसटी महामंडळाचे आर्थिक गणित कोलमडलं आहे. यामुळे सुमारे 470 कोटी रुपये अतिरिक्त रक्कम खर्च होणार आहे. वाहनांच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किमती आणि महामार्गावरील टोलदरात झालेली वाढ यामुळे तब्बल 2200 कोटी रुपये संचित तोटा सहन करणाऱ्या एसटीला नाइलाजास्तव भाडेवाढ करावी लागत असल्याचं सांगण्यात आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement