पुणे : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील (Mumbai-Pune Express way Accident)  भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. लोणावळा लगतच्या शिलाटने हद्दीत सकाळी आठ वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. मुंबईवरून पुण्याला कारमध्ये हे पाच जण येत होते. तेव्हा चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि दुभाजक ओलांडून गाडी विरुद्ध दिशेच्या मार्गावर गेली. समोरून येणाऱ्या कंटेनरच्या खाली ही गाडी आली. काही कळायच्या आता गाडीचा चक्काचूर झाला आणि गाडीतील पाचही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झालेली आहे.


या अपघातात एकाच परिवारातील चार लोकांचा मृत्यू झाला आहे. 


अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मयतांची नावे -


मासीदेवी तिलोक - वय 82
सीमाराज तिलोक - वय 32
शालीमराज तिलोक - वय 19
महावीरराज तिलोक - वय 38
वाहन चालक -रिहान अन्सारी - वय 26



इतर महत्त्वाच्या बातम्या : 




 




LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha