Mahatma Gandhi : बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत 'या' अभिनेत्यांनी साकारली गांधीजींची भूमिका
Mahatma Gandhi : आज 30 जानेवारी रोजी महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अहिंसेची शिकवण दिली. त्यांच्या विचारांवर अनेक पुस्तके लिहिली गेली शिवाय चित्रपटही बनले. गांधीजींची भूमिका बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत अनेक कलाकारांनी साकारली जाणून घ्या कोण आहेत हे कलाकार.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिलीप प्रभावळकर (लगे रहो मुन्नाभाई) : 'लगे रहो मुन्नाभाई' या चित्रपटामधून दिलीप प्रभावळकर यांनी गांधींजीची भूमिका उत्तम प्रकारे साकारली.
नसुरुद्दीन शाह (हे राम) : हे राम चित्रपटात महात्मा गांधींची व्यक्तिरेखा निभावताना नसुरुद्दीन शाह यांनी भाषा आणि देहबोलीचा उत्तम समतोल राखला.
अन्नू कपूर (सरदार) : विजय तेंडूलकर लिखिति आणि दिग्दर्शित सरदार या चित्रपटात अन्नू कपूर यांनी गांधीजींची भूमिका साकारली. हा चित्रपट सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर आधारित आहे.
मोहन गोखले (डॉ. बाबासाहेब आंबेडकर) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रपटात मोहन गोखले बापूंच्या भूमिकेत झळकले. या चित्रपटात महात्मा गांधीच्या व्यक्तिरेखेची नकारात्मक बाजू दाखवण्यात आली आहे.
दर्शन जरीवाला (गांधी : माय फादर) : 'गांधी : माय फादर' या चित्रपटात दर्शन जरीवाला यांनी महात्मा गांधींची भूमिका साकारली. हा चित्रपट गांधीजींचा मुलगा हरीलाल आणि त्यांच्या नात्यावर आधारित आहे.
रजत कपूर (द मेकिंग ऑफ महात्मा) : रजत कपूर यांनी 'द मेकिंग ऑफ महात्मा' यांच्या भूमिकेला न्याय दिला. या चित्रपटाचे दिग्दर्शन श्याम बेनेगल यांनी केले होते.
नीरज काबी (संविधान) : नीरज काबी यांनी दोन वेळा महात्मा गांधी यांच्या व्यक्तिरेखा साकारली आहे. 'संविधान' या 10 भागांच्या मालिकेत त्यांनी गांधीजींची भूमिका साकारली. या शिवाय 'पार्टिशन 1947' या चित्रपटातही ते बापूंच्या भूमिकेत दिसले.
सुरेंद्र राजन : महात्मा गांधींची व्यक्तिरेखा सुरेंद्र राजन यांनी अधिक काळ साकारली आहे. त्यांनी शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरीसह अनेक चित्रपटांमध्ये गांधीजींची भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली.
जे. एस. कश्यप (नाईट अवर टू रामा) : 1963 साली आलेल्या 'नाईट अवर टू रामा' या चित्रपटात जे. एस. कश्यप यांनी गांधीजींची व्यक्तिरेखा उत्तम निभावली. हा चित्रपट 'नाईट अवर टू रामा' या स्टॅन्ली वॉल्पर्ट यांच्या कादंबरीवर आधारित आहे.
बेन किंग्स्ले (गांधी) : गांधी गांधींजींची भूमिका केवळ भारतीय नाही तर इंग्रज कलाकारांनीही साकारली आहे. बेन किंग्स्ले या इंग्रज कलाकाराने 'गांधी' चित्रपटात बापूंची भूमिका साकारत अनेक भारतीयांची मने जिंकली.