Mumbai Missing School Bus Highlights : सांताक्रूझमधील पोदार शाळेची बस सापडली, विद्यार्थी सुखरूप
सांताक्रूझमधील पोदार शाळेची बस विद्यार्थ्यांसह बेपत्ता आहे. दुपारी 12 वाजता विद्यार्थ्यांसह निघालेली बस अद्याप बेपत्ता आहे.

Background
मुंबई : शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाणारी बस अजूनही न पोहोचल्याने पालकांची चिंता वाढली आहे. सांताक्रूझमधील पोद्दार शाळेची ही बस आहे. शाळा सुटल्यानंतर ही बस विद्यार्थ्यांना घेऊन घरच्या दिशेने निघाली, पण अजूनही घरी पोहोचली नाही. त्यामुळे चिंतेत असलेल्या पालकांनी तातडीने शाळेकडे धाव घेतली.
नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील सांताक्रूझमध्ये पोद्दार स्कूल आहे. या शाळेची विद्यार्थ्यांना ने-आण करणारी बस आहे. आज नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना घरातून घेऊन शाळेत आली. दुपारी 12 वाजता शाळा सुटल्यानंतर, विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी ही बस निघाली. मात्र बस शाळेतून बाहेर जरी पडली असली तरी ती बस घरापर्यंत पोहोचलीच नाही.
बस नेमकी कुठे आहे?
शाळा सुटून जवळपास 4 तास होत आले तरी बसचा अद्याप पत्ता लागलेला नाही. ही बस नेमकी कुठे आहे, तिचं लोकेशन काय आहे याचा तपास सुरु आहे. या घटनेची माहिती मिळताच पालकांसह सांताक्रुझ पोलिसांनी शाळेत धाव घेतली आहे.
पालक चिंतेत
दरम्यान, शाळेला गेलेली लहान मुलं अजूनही घरी न पोहोचल्याने विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत आहेत. पालकांकडून शाळा प्रशासनाला, स्कूल बसचालकाला फोन लावण्याचा प्रयत्न करत आहेत. हे विद्यार्थी सकाळी 6 वाजता शाळेत गेले आहेत. मात्र अजूनही घरी न परतल्याने पालकांची चिंता वाढली आहे.
ड्रायव्हरचा फोन स्विच ऑफ
शाळेला गेलेली मुलं अजूनही घरी न परतल्याने, पालकांनी आपआपल्या परीने संपर्क साधण्याचा प्रयत्न होत आहे. पालकांनी स्कूलबसच्या ड्रायव्हरला फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र ड्रायव्हर आणि बसमधील कर्मचाऱ्यांचा फोन स्विच ऑफ येत आहे.
परिवहन मंडळाचे मंत्री अनिल परब यांनी ट्वीट करत दिली माहिती
सांताक्रूझ येथील पोदार शाळेची बस बेपत्ता प्रकरणी मी पोलीस आयुक्त, डिसीपी या पोलीस यंत्रणांसह शाळेच्या प्रशासनाशी तातडीने बोललो आहे. त्यातून जी माहिती समोर आली त्यानुसार बसचा ड्रायव्हर नवीन असल्याने नेहमीच्या मार्गापेक्षा अन्य मार्गाने बस गेली. विद्यार्थी सुखरूप असून आपापल्या पालकांकडे पोहचले आहेत. चिंता करण्याचे कारण नाही, असे पोलीस, शाळा यांनी सांगितले आहे. जरी असे असले तरी संबंधित ड्रायव्हर, बसचा कंत्राटदार यांच्यावर कारवाई करा, असे शाळेच्या प्रशासनाला सूचित केले आहे, अशी माहिती परिवहन मंडळाचे मंत्री अनिल परब यांनी ट्वीट करत दिली आहे.
Mumbai : बसचालकाची होणार चौकशी
बसचालकाची चौकशी होणार असल्याची माहिती परिवहन मंडळाचे मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.






















