Maharashtra Mumbai Rains LIVE : आज मान्सूनने व्यापला संपूर्ण देश, मध्य महाराष्ट्रासह घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज

Rains LIVE : राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे  मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात सध्या मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 02 Jul 2022 03:05 PM
धुळ्यात पावसाची हजेरी, पेरणीसाठी आणखी पावसाची गरज

Dhule Rain : धुळे शहरात पावसाने आज दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पावसामुळं नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात अद्याप शेतीसाठी पूरक असा पाऊस झाला नसून 100 मिमी पेक्षाही कमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. अचानक सुरु झालेल्या पावसामुळे सर्वसामान नागरिकांची एकच तारांबळ उडाली. 

जळगाव जिल्ह्यात अनेक भागात दमदार पाऊस, बळीराजा सुखावला

Jalgaon Rain : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज अखेर जळगाव जिल्ह्यात विविध भागात दमदार पावसाने हजेरी लावली. यामुळं शेतकरी वर्गात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. जून महिना संपला तरी दमदार पाऊस न झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे. जूनमध्ये झालेल्या एक दोन पावसानंतर पुढील काळात पाऊस येईल या आशेनं अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. तर अनेक भागात मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत पेरण्या खोळंबल्या होत्या.

आज मान्सूनने व्यापला संपूर्ण देश, सरासरी तारखेपेक्षा आधीच दाखल

आज ( २ जुलै) संपूर्ण देशात मान्सून दाखल झाला आहे. मान्सूनने संपूर्ण देश व्याप्त केला आहे. सरासरी तारखेपेक्षा मान्सून संपूर्ण देशात अगोदर दाखल झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. सरासरी 8 जुलैला मान्सून देशात दाखल होत असतो. यावेळी मात्र, 2 जुलैला मान्सून संपूर्ण देशात दाखल झाला आहे.

Aurangabad: जायकवाडी धरणाचा 33 टक्के पाणीसाठा

Jayakwadi Dam: जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 33.80 टक्के (02/07/2022)
















































































1धरणाची पाणी पातळी फुटामध्ये1507.04
2धरणाची पाणी पातळी मीटरमध्ये459.347
3एकूण पाणीसाठा दलघमी1471.846
4जिवंत पाणीसाठा दलघमी733.740
5टक्केवारी33.80%
6मागील वर्षी आजच्या दिवशीचा उपयुक्त पाणीसाठा दलघमी

714.258
7

मागील वर्षी आजच्या दिवशीची उपयुक्त टक्केवारी


32.90
8आजचे पर्जन्यमान मि.मि.NIL
9एकूण पर्जन्यमान मि.मि.93
10बाष्पीभवन

0.601


11उजवा कालवा विसर्गनिरंक 
12डावा कालवा विसर्गनिरंक 
13जलविद्युत केंद्र विसर्गनिरंक 
14सांडवा विसर्ग क्युसेकनिरंक 
15पाण्याची आवक क्युसेकनिरंक 
रोहा, अलिबागमध्ये पावसाच्या हलक्या सरी

रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडत आहे. रोहा, अलिबाग येथे हलक्या सरी पडत आहेत. तर महाड, उरण, खोपोली परिसरात पावसानं विश्रांती दिली आहे. 

महाड तालुक्यातील बावले गावाजवळच्या डोंगराला भेगा

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील बावले गावाजवळच्या डोंगराला भेगा पडल्या आहेत. किल्ले रायगडाजवळ असलेल्या बावले गावजवळील डोंगराला भेगा पडल्या आहेत. डोंगराला भेगा गेल्याने गावकऱ्यांवर भितीचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांना सतर्क राहण्याच्या प्रशासनानं सुचना दिल्च्याया आहेत. 



पालघरमधील सफाळेमध्ये पहिल्याच पावसात पूरजन्य परिस्थिती

Palghar Rain : पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील सरतोडी भागांमध्ये शुक्रवारी रोजी झालेल्या पहिल्याच पावसात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. गावकरी तसेच शाळेतील मुलांना दोरीचा आधार घेत मानवी साखळी करुन पुरातील पाण्यातून रस्ता काढत जावे लागले.धुळे शहरात काल सायंकाळी पावसाने चांगली हजेरी लावली आहे. जिल्ह्यात अद्याप दमदार पाऊस झाला नसून दिवसभर ढगाळ वातावरण कायम असत. जिल्ह्यात 100 मिमी पेक्षा कमी पाऊस झाला असून पेरण्या पूर्ण झाल्यानं शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे.






 


नाशिकमध्येही पावसाने जोरदार हजेरी, शेतकऱ्यांना दिलासा

मुंबई पाठोपाठ नाशिकमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची संततधार सुरु आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra Mumbai Rains LIVE : जूनमध्ये उघडीप दिलेल्या पावसाचा जुलैमध्ये जोर वाढला आहे. कालपासून राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे  मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात सध्या मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यावन, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, साताऱ्यातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


दरम्यान, शुक्रवारी मुंबईमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. तर भायखळा आणि कुलाब्यात 200 मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली.  204 मिमीहून अधिक पाऊस झाल्यास अतिवृष्टी म्हटले जाते. कालपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे. काल दिवसभर झालेल्या पावसामुळं मुंबईतील सखल भागात पाणी साचले आहे. मुंबईत पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. तर दुसरीकडे कोकण किनारपट्टीसह पुणे, पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.  


मुंबई शहरासह परिसरात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. कालपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे.  सलग  दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे (Heavy rain) मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटवली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणीसाठ्यात  10.90 टक्के वाढ झाली आहे.  पावसाने  मुंबईकरांना आणखी पाच दिवस पुरेल एवढा पाणीसाठा झाला आहे.  सध्याचा साठा  मुंबईकरांना पुढील 40 दिवस टिकेल पुरेल एवढा आहे. मात्र, 27 जूनपासून मुंबईकरांना 10 टक्के पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे. ही पाणीकपात अजुनही सुरूच आहे.


पालघरमध्ये जोरदार पावसाची हजेरी 


पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील सरतोडी भागांमध्ये शुक्रवारी रोजी झालेल्या पहिल्याच पावसात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. गावकरी तसेच शाळेतील मुलांना दोरीचा आधार घेत मानवी साखळी करुन पुरातील पाण्यातून रस्ता काढत जावे लागले.धुळे शहरात काल सायंकाळी पावसाने चांगली हजेरी लावली आहे. जिल्ह्यात अद्याप दमदार पाऊस झाला नसून दिवसभर ढगाळ वातावरण कायम असत. जिल्ह्यात 100 मिमी पेक्षा कमी पाऊस झाला असून पेरण्या पूर्ण झाल्यानं शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.