महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
नाशिकमधील मुंबई नाका येथे क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या अर्धाकृती ब्राँझ धातूच्या शिल्पांचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते करण्यात आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोकणातील कुडाळ येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार बाळकृष्ण पांचाळ यांनी ११ महिने कालावधीत अर्धाकृती ब्राँझ धातूचे शिल्प तयार केले. या पुतळ्यांसाठी राजस्थानी कारागिरांकडून ग्रॅनाईट मार्बलमध्ये भव्य चौथरा उभारण्यात आला आहे.
आर्किटेक्ट शाम लोंढे यांनी सल्लागार म्हणून स्मारकाच्या उभारणीची जबाबदारी पार पाडली. या स्मारकाचे काम सुरू असताना मी व समीर भुजबळ यांनी वेळोवेळी पाहणी करत काम दर्जेदार होण्याबाबत दक्षता घेतली, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.
सुमारे 2710 मीटर जागेवर हे स्मारक उभारण्यात आले असून यामध्ये महात्मा फुले यांचा 18 फुट उंच तर सावित्रीमाई फुले यांचा 16.5 फुट उंच पुतळा आहे. या दोन्ही पुतळ्यांची रुंदी प्रत्येकी 14 फूट आहे.
महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे वजन 8 टन एवढे असून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे वजन 7 टन एवढे आहे.
नाशिकच्या मुंबई नाका चौकातील हे स्मारक उभारण्यासाठी 4 कोटी 68 लाख रुपये एवढा खर्च आला आहे.
दरम्यान, हा पुतळा अतिशय भक्कम होण्यासाठी 8 फुट कॉंक्रीटचा चौथरा उभा करून त्याला ग्रेनाईट लावण्यात आले आहे. तसेच 30 ते 40 फूट पाईल फाऊंडेशन करण्यात आले आहे.