Sharad Pawar : उभं करायला अक्कल लागते. पण उभं केलेलं उद्ध्वस्त करायला अक्कल लागत नाही. रोहित पवार (Rohit Pawar) चांगले काम करत आहे. त्याला मदत करता आली नाही तर त्याच्या कामात खोडा घालू नका असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अप्रत्यक्षपणे भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्यावर टीका केली. अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा, इथं शरद पवार बोलत होते. 


काळजी करु नका 2 महिन्यात चित्र बदलणार


कारखाने वेगवेगळ्या ठिकाणी असले पाहिजे हाच विचार करुन रोहित पवारांनी दोन तालुक्याच्यामध्ये एमआयडीसी आणण्याचा प्रयत्न केल्याचे रोहित पवार म्हणाले. पण त्या एमआयडीसीला अडथळा आणण्याचे काम झाले. मी रोहितला सांगितले की, काळजी करु नको दोन महिन्याने चित्र बदलणार असल्याचे शरद पवार म्हणाले. 2 महिन्यात राज्याचे चित्र बदलेले की राज्यातील सर्व जिल्हे विकासाकडे वाटचाल करतील. हे काम करण्यासाठी मला तरुणांची साथ हवी आहे. ही ताकद कुणात असेल तर ती रोहित पवारांमध्ये आहे. त्यामुळं तुमची साथ रोहित पवारांना द्या असं आवाहन शरद पवार यांनी केलं. 


एमआयडीसीला जुन्या लोकप्रतिनिधीकडून विरोध अडचणी आणण्याचे काम सुरु


कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये एमआयडीसी होतेय म्हटल्यावर जुन्या लोकप्रतिनिधीला आनंद व्हायला हवा होता. कारण यामुळं अनेक लोकांच्या हाताला काम मिळणार आहे. पण एमआयडीसी होतेय म्हटल्यावर त्याला विरोध करणे, अडचणी आण्याचे काम सुरु असल्याचे शरद पवार म्हणाले. रोहित पवारांच्या प्रयत्नामध्ये अनेकांनी अडथळे आणण्याचे काम केल्याचे शरद पवार म्हणाले. दोन महिन्यांनी राज्यातील चित्र बदलणार आहे. मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात असल्याचे शरद पवार म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या:


पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल