एक्स्प्लोर

दुष्काळासंदर्भात उत्तर देण्यासाठी आणखी किती वेळ हवा?, राज्य सरकारला हायकोर्टचा उद्विग्न सवाल

दुष्काळासंदर्भात उत्तर देण्यासाठी हायकोर्टाकडून राज्य सरकारला मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच हायकोर्टाने शुक्रवारपर्यंत प्रतिज्ञञापत्र सादर करण्याचे निर्देश देत सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब केली आहे.

मंबई : दुष्काळासंदर्भात उत्तर देण्यासाठी राज्य सरकारला आणखीन किती वेळ हवा? असा सवाल करत मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला शुक्रवारपर्यंतची संधी दिली आहे. तसेच यासंदर्भातील सुनावणी पुढच्या सोमवारपर्यंत तहकूब केली आहे. पुढील सुनावणीत सरकारकडून दुष्काळ निवारणासाठी सुरु असलेल्या उपाययोजनांची माहिती सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला देण्यात आले आहेत. राज्यात दुष्काळामुळे अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र असे असतानाही राज्य सरकारला निर्देश देऊनही त्यांचं उत्तर तयार नसल्यानं हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली. याप्रकरणी नियुक्त केलेले 'विशेष सरकारी वकिल उपलब्ध नाही' अशी सबब पुन्हा एकदा सरकारी वकिलांनी कोर्टाकडे व्यक्त करण्यात आली. राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती, दुष्काळ आणि जलसंवर्धन आदींबाबत चिंता व्यक्त करत डॉ. संजय लाखे पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती संदिप शिंदे आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे  सुट्टीकालीन न्यायालयात यावर सुनावणी झाली. मराठवाडा आणि विदर्भामध्ये जलसाठ्यांची परिस्थिती अत्यंत भयावह असून काही ठिकाणी पाणी शून्य टक्क्यांवर आलं आहे. सरकारच्या संकेतस्थळावरही याबाबतची आकडेवारी उपलब्ध आहे. तरीही सरकारकडून पाणीपुरवठ्याच्या सुविधा आणि अन्य जीवनावश्‍यक वस्तुंबाबत तातडीने उपाययोजना सुरु करण्यात आलेल्या नाहीत, असा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे. सर्वोच्च न्यायालयानेही दुष्काळग्रस्त भागांसाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे आदेश सरकारला दिलेले आहेत. मात्र त्याचीही पूर्तता करण्यात आलेली नाही, असेही याचिकाकर्त्यांनी कोर्टाला सांगितले. दुष्काळी परिस्थितीचा आढावा सातत्याने घेणारी यंत्रणा स्वतंत्र आपत्तकालीन नियंत्रण कक्षामार्फत निर्माण करण्याची मागणीही याचिकेत केलेली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Gadchiroli Snake Bite Student Death: आश्रम शाळेतील 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू; गडचिरोतील धक्कादायक घटना, मध्यरात्री झोपल्यानंतर काय घडलं?
आश्रम शाळेतील 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू; गडचिरोतील धक्कादायक घटना, मध्यरात्री झोपल्यानंतर काय घडलं?
Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Crime News: विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस

व्हिडीओ

Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
IND vs SL Sarfaraz Khan : टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
BMC iPads News: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
IND vs SL : शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
Garam Masala Actress Nikita Rawal Viral Video: प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत हादरवणारं कृत्य, सेल्फी घेताना चाहतीकडून बळजबरीनं किस, जबरदस्तीनं ओठ चघळले अन्... VIDEO
प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत हादरवणारं कृत्य, सेल्फी घेताना चाहतीकडून बळजबरीनं किस, जबरदस्तीनं ओठ चघळले अन्... VIDEO
Embed widget