एक्स्प्लोर

कशेडी घाटात दरड कोसळल्याने मुंबई-गोवा मार्गावर वाहतूक ठप्प

कशेडी घाटात दरड कोसळल्याने मुंबई-गोवा वाहतूक ठप्प झाला आहे. दरड हटवण्याचे काम सुरु आहे. मात्र वाहतूक बंद असल्याने वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत.

रायगड : सतत पडणाऱ्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील धामण देवी येथे रात्री दरड आणि माती कोसळली. महामार्गाच्या मध्यभागी मोठमोठे दगडी आल्याने वाहतूकीसाठी कशेडी घाट बंद ठेवण्यात आला. रात्रभर एल ॲंड टी कंपनी मार्फत दोन जेसीबीच्या साहाय्याने महामार्गावरील माती आणि दरड बाजूला काम सुरु ठेवण्यात आले आताही काम सुरु आहे. दरड हटवण्याचे काम सुरु असल्याने मार्गावरील वाहतूक बंद असल्याने वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या असून धामणदेवी धडक असलेल्या ठिकाणापासून लोहारेपर्यंत किमान सहा किलोमीटर अंतरावर वाहतुकीचा खोळंबा मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येत आहे. कशेडी घाटात दरड कोसळल्याने मुंबई-गोवा मार्गावर वाहतूक ठप्प अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या कोकणात गेले चार दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. काल रात्री साडे आठ ते पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात महामार्गावरील धामणदेवी गावाच्या हद्दीत ही दरड कोसळली आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. काल रात्रभर पासून आतापर्यंत दरड उपसण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती घटनास्थळावरुन प्राप्त झाली आहे. मध्यभागी मोठमोठे दगडी आल्याने वाहतूकीसाठी कशेडी घाट बंद ठेवण्यात आला. रात्रभर एल ॲंड टी कंपनी मार्फत दोन जेसीबीच्या साहाय्याने महामार्गावरील माती आणि दरड बाजूला काम सुरु ठेवण्यात आले आताही काम सुरु आहे. वाहतूक बंद असल्याने वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या असून धामणदेवी धडक असलेल्या ठिकाणापासून लोहारे पर्यंत किमान सहा किलोमीटर अंतरावर वाहतुकीचा खोळंबा मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतोय. कशेडी घाटात दरड कोसळल्याने मुंबई-गोवा मार्गावर वाहतूक ठप्प महामार्गावरील खेड येथील जगबुडी - नारिंगी नदी धोक्याच्या पातळीवर काल सकाळपासून सह्याद्रीच्या खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. शहराच्या दुसऱ्या बाजूने वाहणारी नारंगी नदीच्या पाण्यातही वाढ झाली असल्याने बाजारपेठेत पाणी घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही. जगबुडी नदीची इशारा पातळी 6 मीटर तर धोका पातळी 7 मीटर आहे. दिवसभर सह्याद्रीच्या खोऱ्यात संततधार पाऊस सुरु असल्याने काल सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी 6.5 मीटर पर्यंत पोहचली. यामुळे नगरपालिका प्रशासन आणि व्यापारी यांच्या चिंतेत भर पडली आहे. एका बाजूला जगबुडीचे पाणी वाढत असताना दुसऱ्या बाजूला असलेल्या नारिंगी नदीच्या पाण्याचीही पातळी वाढू लागली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या पोटात भितीचा गोळा उठला आहे. या दोन्ही नद्यांच्या पाण्याची पातळी वाढू लागली की शहराला कधी पुराचा वेढा पडेल हे सांगता येत नाही. येथील व्यापाऱ्यांचा हा गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आहे त्यामुळे जगबुदी आणि नारिंगी नदीच्या पाण्याची पातळी वाढू लागताच व्यापाऱ्यांनी दुकानातील माल सुरक्षित स्थळी हलविण्याची तयारी सुरु केली आहे. पावसाचा जोर कमी होण्याची चिन्ह नसल्याने बाजारपेठेत पाणी घुसण्याची शक्यता लक्षात घेत नगरपालिका प्रशासनाने खेड शहरातील व्यापारी आणि नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. पाणी पात्रात वाढ झाल्याने नदी पात्र सोडून वाहत असल्याने शहरात पाणी भरायला सुरुवात झाली आहे. कुंडलिका नदीच्या पाण्याची पातळीत वाढ रायगड रोहा शहरालगत वाहणारी कुंडलिका नदीच्या पाणी पातळीत दिवसेंदिवस वाढत आहे. या नदीची इशारा पातळी 23 मीटर (ढोह तलाव बंधारा) तर धोका पातळी 23.95 मीटर आहे. दिवसभर संततधार पाऊस सुरु असल्याने काल रात्री कुंडलिका नदीच्या पाण्याची पातळी 23.40 मीटर पर्यंत पोहचली. यामुळे नगरपालिका प्रशासन यांच्या चिंतेत भर पडली.प्रशासनाने नदीकाठच्या गावाना सतर्कतेचा इशारा दिला आहे. चिपळूण शहरातील वाशिष्टी नदी पात्राचे पाणी बाजारपुलाला लागले सतत पडणाऱ्या पावसामुळे चिपळूण वाशिष्टी नदीच्या पाणी पात्रात वाढ झाल्याने शहरातील नवीन असलेल्या बाजार पुलाला पाणी लागले. वाशिष्टी नदीला कोयना धराणाच्या पाण्याचा विसर्ग असल्याने पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते. जिल्ह्यातील छोट्या धरणाच्या सांडव्यावरुन पाण्याचा विसर्ग जिल्ह्यातील छोटी छोटी धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणे ओव्हरफ्लो होऊ लागल्याने धरणाच्या सांडव्यावरुन पाणी वाहत आहे.त्यामुळे त्यामुळे आजूबाजूच्या नद्यांच्या पाणी पात्रात वाढ झाली आहे. नद्याच्या बाजूला असणाऱ्या गावाना सर्तकतेचा इशारा प्रशासनामार्फत देण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Embed widget