अपूरं काम, मोठ-मोठे खड्डे... मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचा चाकरमान्यांना फटका
मुंबई गोवा महामार्गावर सध्या चालू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामाचा फटका प्रवाशांना बसतोय. मुसळधार पावसात कधी रस्त्यावर दरड येते तर कधी माती येते. अश्या परिस्थितीत जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय.
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्याची दयनिय अवस्था झाली आहे. पहिल्याच पावसात रस्त्यांची चाळण झाली आहे. महामार्गावरून प्रवास करताना रस्त्यांवर जागोजागी मोठमोठे खड्डे पाहायला मिळतायत. थोड्याच दिवसात गणेशोत्सव असल्याने कोकणात येणारा चाकरमानी याच रस्त्याने प्रवास करणार. कित्येक वर्षे चालू असलेल्या चौपदरीकरणाचं काम अद्यापही सुरुच आहे. काही ठिकाणी हे काम पूर्ण देखील झाले आहे. असं असलं तरी पहिल्याच पावसात रस्त्यांची चाळण झालेली पाहायला मिळत आहे. मोठ मोठे खड्डे, अर्धवट अवस्थेत असलेले पुलाचे काम यांमुळे या मार्गावरून वाहतूक करताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
मुंबई गोवा महामार्गावर सध्या चालू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामाचा फटका प्रवाशांना बसतोय. मुसळधार पावसात कधी रस्त्यावर दरड येते तर कधी माती येते. अश्या परिस्थितीत जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. गेली वर्षेभर या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. जिल्हात 40% काम पुर्णत्वास गेले आहे.
कोकणात पावासाचा जोर कायमच अधिक असतो. या त्यामुळे पावसात महामार्गावर वारंवार माती खाली येण हि प्रवाशांची डोकेदुखी बनली आहे. घाटात तर दरड कोसळण्याचं प्रमाण अद्याप काही कमी झालेलं नाही. घाटील गावं ही डोंगर दऱ्यांमध्ये वसलेली आहे. दरड कोसळल्याने महामार्गावरील वाहनांबरोबर या घरांनादेखील धोका निर्माण झालाय.
रत्नागिरीच्या लांजा, तळेकांटे रस्त्यावर 90 किलोमीटरपर्यंत खड्डे, खड्ड्यांमुळे वाहन चालकांची अडचण
वशिष्टी नदीवरील पूल वाहतुकीस धोकादायक
मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वात महत्त्वाचा पूल म्हणजे चिपळूणच्या वशिष्टी नदीवरील पूल. दुरुस्तीचं काम असो किंवा पावसात पुरामुळे बंद राहणारा पूल कायमच वशिष्टी नदीवरील पूल बंद झाला की त्याचा थेट परिणाम महामार्गावरील वाहतुकीवर होतो. सध्या हा पूल जीर्ण झाला असून, तो वाहतुकीस धोकादायक आहे. काही दिवसांपूर्वी या पुलाचे पुण्याच्या नामांकित कंपनीकडून ऑडीट करण्यात आले. अहवालात हा पूल वाहतूकीसाठी धोकादायक आहे असे जाहीर केले. तरीसुद्धा यावरून वाहतूक सुरु आहे. एकंदरीतच सबंधित प्रशासन लोकांच्या जिवांशी खेळतय का? असे सवाल इथले रहिवाशी करतायत.