एक्स्प्लोर

Malik vs Fadnavis : है तैयार हम! नवाब मलिक यांचं देवेंद्र फडणवीस यांना चॅलेंज

Nawab Malik vs Devendra Fadnavis : मुंबई ड्रग्ज प्रकरणानंतर सुरु झालेल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी थांबायचं नाव घेईनात. दररोज नवनवे आरोप आणि खुलासे समोर येत आहेत.

Nawab Malik vs Devendra Fadnavis : मुंबई ड्रग्ज प्रकरणानंतर सुरु झालेल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी थांबायचं नाव घेईनात. दररोज नवनवे आरोप आणि खुलासे समोर येत आहेत. समीर वानखेडे यांच्यावरील आरोपापासून सुरु झालेलं प्रकरण आता देवेंद्र फणडवीस यांच्यापर्यंत पोहचलं आहे. राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर ड्रग्ज कनेक्शसंदर्भात आरोप केले. या आरोपाला देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ प्रत्युत्तर देत दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा दिला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या या इशाऱ्याला आता नवाब मलिक यांनी थेट चॅलेंज दिलेय. 

मी काचेच्या घरात राहत नाही. ज्यांचे संबध अंडरवर्ल्डशी आहेत. अशा लोकांनी माझ्याशी बोलू नये आणि ड्रग्ज संदर्भातही बोलू नये. अंडरवर्ल्ड संदर्भातील पुरावे आपल्यासमोरही मांडेल आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही पाठवणार आहे. दिवाळी संपण्याची वाट पाहा. त्यांनी सुरुवात केली आहे, मी शेवट करेन. दिवाळीच्या दिवशी नवाब मलिक यांनी लवंगी फटाका लावलाय,  दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर नवाब मलिक यांनी 'है तैयार हम!' असं ट्वीट करत देवेंद्र फडणवीस यांना थेट चॅलेंज केलं आहे. विशेष म्हणजे, नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलेय.

अमृता फडणवीस यांचं मलिकांना प्रत्युत्तर?

अमृता फडणवीस यांनीही ट्विट करत मलिकांना प्रत्युत्तर दिलं आहे. "चोराच्या उल्ट्या बोंबा का असतात बुवा? कारण विनाशकाले विपरीत बुद्धी असते," असं ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलं आहे.

नवाब मलिक यांनी काय केला होता आरोप?
देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरुन राज्यात ड्रग्जचा खेळ सुरु आहे, असा गंभीर आरोप नवाब मलिकांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना अमृता फडणवीसांनी नदी संरक्षणासाठी गाणं गायलं होते. यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनय केला होता. डायरेक्टर सचिन गुप्ता होते. ते गाणं अभिजीत जोशी यांनी लिहिलेले होते. त्याचे फायनान्स हेड ड्रग्स पेडलर जयदीप राणा होता. जयदीप राणा यांच्यासोबत फडणवीसांचा काय संबंध आहे? याची चौकशी व्हायला पाहिजे, असं मलिक म्हणाले होते. देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात ड्रग्सचे धंदे चालतात. जयदीप राणा हे फडणवीसांच्या घरच्या कार्यक्रमात उपस्थित राहतात. ड्रग्स रॅकेटला फडणवीस संरक्षण देतात, असा गंभीर आरोप मलिक यांनी यावेळी केला होता.  

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
नवाब मलिक ज्या प्रकारे म्हणाले की, भाजपचे ड्रग्ज कनेक्शन आहे. जर एखाद्या अनोळखी व्यक्तीबरोबर फोटो काढल्यानंतर जर ड्रग्ज कनेक्शन जोडलं जात असेल, तर नवाब मलिक यांचे जावई ड्रग्जसकट सापडले. जर नवाब मलिक यांचा रेशिओ लावायचा असेल तर संपूर्ण एनसीपी पार्टी ड्रग्ज माफिया झाली पाहिजे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी नवाब मलिक यांनी लवंगी फटाका लावलाय, दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार. मी काचेच्या घरात राहत नाही. ज्यांचे संबध अंडरवर्ल्डशी आहेत. अशा लोकांनी माझ्याशी बोलू नये आणि ड्रग्ज संदर्भातही बोलू नये. अंडरवर्ल्ड संदर्भातील पुरावे आपल्यासमोरही मांडेल आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही पाठवणार आहे. दिवाळी संपण्याची वाट पाहा. त्यांनी सुरुवात केली आहे, मी शेवट करेन, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. 

महत्त्वाच्या बातम्या

सीजेपीच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मनसे आक्रमक, अमित ठाकरेंनी पोलिसांची गाडी अडवली, पोलिसांनाही इशारा
सीजेपीच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मनसे आक्रमक, अमित ठाकरेंनी पोलिसांची गाडी अडवली, पोलिसांनाही इशारा
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Panchayat Raj Abhiyan : पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
Bhandara Crime News:'वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा पत्नीला न देता मला द्या' म्हणत जावयाचा सासऱ्यावर प्राणघातक हल्ला; भंडाऱ्याचं मडेघाट हादरलं!
'वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा पत्नीला न देता मला द्या' म्हणत जावयाचा सासऱ्यावर प्राणघातक हल्ला; भंडाऱ्याचं मडेघाट हादरलं!

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
Mukul Wasnik: कालपर्यंत ज्यांनी विविध राजकीय पक्षांना फोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना आता स्वतःचे खासदार शाबूत ठेवावे लागतील: मुकुल वासनिक
राजकीय पक्ष फोडणाऱ्यांना स्वत:चे खासदार शाबूत ठेवाण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, मुकुल वासनिक यांचा भाजपला टोला  
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
Ashutosh Ranka on PM Modi: आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट करुन टाकला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट केला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका

Embed widget