एक्स्प्लोर

ST Bus News: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर शिवनेरीसह कोणत्या एसटी बस धावणार? एसटी महामंडळाने दिली महत्त्वाची माहिती

ST Bus News: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरून सरसकट सगळ्या साध्या एसटी बसची वाहतूक बंद केली नसल्याचे एसटी महामंडळाने म्हटले आहे. नियोजित मार्गांनुसार एसटी बस एक्स्प्रेसवे वरुन धावणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

ST Bus Mumbai Pune Express Way: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरून (Mumbai Pune Express Way) प्रवासी वाहतूक करण्यास काही एसटी बसेसना मनाई केल्यानंतर एसटी महामंडळाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवनेरीसह काही मार्गावरील शिवशाही आणि इतर एसटी बसेसची वाहतूक पूर्वीप्रमाणे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरून करण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे. फक्त ज्या बसचे चालक नियमबाह्य पद्धतीने मार्ग बदलून एक्स्प्रेसवेवरून धावत आहेत, त्यांच्याविरोधात कारवाई होणार असल्याचे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे. 

काही एसटी बसेस या जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून चालवण्यात येतात. मात्र, यातील काही एसटी बसेस या एक्स्प्रेसवेवरून वाहतूक करतात. यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय होते. त्याशिवाय, प्रवासी भारमानही कमी झाले आहे. अशा एसटी बसबाबत माहिती समोर आल्यानंतर एसटी महामंडळ प्रशासनाने काही पावले उचलली आहे. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या मार्गांशिवाय इतर मार्गावरून बस चालवल्यास टोलच्या रक्कमेतील फरक आणि शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले होते. 

मुंबईहून पुणे आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणी जाण्यासाठी बोरघाटातून नवीन मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आणि जुना मुंबई-पुणे महामार्ग हे दोन रस्ते आहेत. एसटी महामंडळाच्या बहुतांशी बसेस या मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरून धावतात. तर, काही बसेसना जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून (खोपोली-लोणावळा-तळेगाव मार्गे) जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या बसेस या मार्गांवरून जाण्याऐवजी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे वरून धावतात, असे महामंडळाच्या निर्देशनास आले. त्यानंतर नियमांप्रमाणे वाहतूक न करणाऱ्या एसटी चालकांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर या बसेस धावणार

एसटी महामंडळाच्या शिवनेरीसह मुंबई-सातारा, बोरिवली-सातारा या मार्गावर धावणाऱ्या शिवशाही बसेससह अन्य बसेस मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे वरून पूर्वीप्रमाणेच धावणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. त्याशिवाय, इतर साध्या बसेस ज्या मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे वरून जातात, त्यादेखील पूर्वीप्रमाणे एक्स्प्रेसवरून वाहतूक करतील असे महामंडळाने सांगितले. 

प्रवासी भारमान घटले 

नवीन एक्सप्रेसवे वरून जाताना पनवेल ते पुणे या तब्बल 130 किलोमीटर अंतरावर एकही प्रवासी चढउतार होत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.  त्या तुलनेत जुन्या हायवे वरून जाताना खोपोली, लोणावळा, तळेगाव या ठिकाणी प्रवासी भारमान अधिक असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता एसटी महामंडळाने जुन्या मार्गावरून एक्स्प्रेसवेवरून एसटी बस चालवणाऱ्या चालकांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. 

लोणावळा येथे शनिवार- रविवार मोठ्या संख्येने प्रवासी आणि पर्यटक जात असतात. शिवाय इतर दिवशी देखील मोठ्या संख्येने स्थानिक नागरीक प्रवास करत असतात. मात्र परस्पर एक्स्प्रेसवे वरून वाहतूक करणाऱ्या एसटीच्या बसेसमुळे प्रवाशांना जादा पैसे देऊन खाजगी वाहनांनी जावे लागते. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Dharashiv News: चर्चा ऑपरेशन टायगरची, पार पडलं ऑपरेशन लोटस! कळंब नगरपरिषदेत विरोधी पक्षच उरला नाही, सगळ्या नगरसेवकांच्या हाती कमळ
चर्चा ऑपरेशन टायगरची, पार पडलं ऑपरेशन लोटस! कळंब नगरपरिषदेत विरोधी पक्षच उरला नाही, सगळ्या नगरसेवकांच्या हाती कमळ
Bhandara News: बटाट्यांना बुरशी, मुदत संपलेले मसाले, किचनमध्येही अस्वच्छता, भंडाऱ्यात मध्यान्ह भोजन' योजना की शाळकरी मुलांच्या जिवाशी खेळ? खासदार प्रशांत पडोळे आक्रमक
बटाट्यांना बुरशी, मुदत संपलेले मसाले, किचनमध्येही अस्वच्छता, भंडाऱ्यात मध्यान्ह भोजन' योजना की शाळकरी मुलांच्या जिवाशी खेळ? खासदार प्रशांत पडोळे आक्रमक
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Embed widget