एक्स्प्लोर
पोटच्या चिमुकलीला नदीत फेकून आईची आत्महत्या
आदिलाबादवरून पिंपळखुंटी येथे मुलीसह येताना सपनाजवळ पैसे नसल्याने तिने ऑटो चालकाला पैसे नाही म्हणून तिच्या कानातील सोन्याचे दागिने भाडे म्हणून दिले.

यवतमाळ : यवतमाळमधील पैनगंगा नदीच्या पुलावरुन एका महिलेने पोटच्या साडेतीन वर्षीय चिमुकलीला नदीत फेकले आणि त्यानंतर स्वत:ही नदीत उडी मारुन आत्महत्या केली. ही महिला तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथील होती. आदिलाबाद येथील रहिवासी असलेली 40 वर्षीय सपना रमेश गोंटीमुकलवार असे या महिलेचे नाव असून तिच्या साडेतीन वर्षीय आदित्या असे मुलीचे नाव आहे. पैनगंगा नदीत सपनाचा मृतदेह सापडला असून, तिची चिमुकली आदित्या हिचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. आदित्याच्या मृतदेहाचा शोध सुरु आहे. आदिलाबादवरून पिंपळखुंटी येथे मुलीसह येताना सपनाजवळ पैसे नसल्याने तिने ऑटो चालकाला पैसे नाही म्हणून तिच्या कानातील सोन्याचे दागिने भाडे म्हणून दिले. त्यानंतर ऑटो चालक गेल्यावर तिने पैनगंगा नदीच्या पुलावरून 50 फूट खोल नदीत प्रथम मुलीला फेकले आणि स्वतःही तिने नदी च्या पुलावरून उडी घेऊन जीवन संपविले.
आणखी वाचा























